मासिक पाळी म्हणजे काय ? | menstruation meaning in marathi

This article contains information about menstruation meaning in marathi and what is periods in girls.

किशोरावस्थेतील मुलां मुलींमध्ये युवा अवस्थेत प्रवेश करताना अनेक शारीरिक बदल होऊ लागतात. किशोरवयीन मुलींमध्ये होणारा असाच एक बदल म्हणजे ‘मासिक पाळी‘ होय. मासिक पाळी ही प्रत्येक स्त्रीमध्ये होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु अनेक मुली या बद्दल चे प्रश्न विचारायला घाबरतात. म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही आपल्या करिता मासिक पाळी म्हणजे काय ? (Menstruation meaning in marathi) आणि पाळी येणे काय आहे याबद्दलची मराठी माहिती घेऊन आलो आहोत.

menstruation meaning in marathi
menstruation meaning in marathi

मासिक पाळी म्हणजे काय ? menstruation meaning in marathi

प्यूबर्टी (puberty) म्हणजेच करण्यात येणाऱ्या प्रत्येक मुलीमध्ये मासिक पाळी सुरू होते. मासिक पाळी ची सुरुवात 11 ते 14 या वयात होते. यानंतर त्या युवतीचे शरीर दर महिन्याला गर्भावस्थेसाठी तयार होते. परंतु गर्भावस्था न झाल्याने गर्भाशय अविकसित (unfertilized) अंडे (स्त्रीबीज) आणि गर्भाशयातील टिश्यू (lining of the uterus) ला स्त्री योनी द्वारे रक्तासोबत बाहेर काढते. या प्रक्रियेला मासिक पाळी (menstruation meaning in marathi) म्हटले जाते.

लैगिक शिक्षण मराठी <<वाचा येथे

मासिक पाळी चक्र – menstruation cycle meaning in marathi

मासिक पाळीच्या चक्राच्या पहिल्या दिवशी रक्त वाहण्यास सुरुवात होते, ज्याला पहिला दिवस म्हणतात. हे चक्र पुढील मासिक पाळीच्या जरा आधी थांबते. हे ऋतुस्त्राव चक्र साधारणपणे २५ ते ३६ दिवसांचे असते. फक्त १० ते १५ टक्के स्त्रियांमध्ये मासिक पाळीचे हे चक्र अचूक २८ दिवसांचे असते. वयात आल्यानंतरच्या लगेचच्या काळात तसेच पाळी थांबण्याचा वेळी हा फरक ठळकपणे दिसून येतो आणि दोन पाळ्यांमधील कालावधी देखील अधिकतम असतो. रक्तस्राव ३ ते ७ दिवस किंवा सरासरी ५ दिवस सुरु राहतो. या दरम्यान सुमारे ०.५ ते २.५ औंस रक्त जाते. एका सॅनिटरी नॅपकिनमध्ये – ज्याला टॅंपन असे ही म्हणतात – त्याच्या प्रकारानुसार १ औंस रक्त शोषले जाऊ शकते.

मासिक पाळी मध्ये वाहणारे रक्त नेहमीच्या जखमेतून येणार्‍या रक्तापेक्षा वेगळे असते व स्त्राव भरपूर असल्याशिवाय त्याची सहजपणे गांठ तयार (क्लॉटिंग) होत नाही. मासिक पाळीच्या आवर्तनाचे नियमन संप्ररेकांमार्फत म्हणजेच हार्मोन्समार्फत केले जाते. ल्युटिनायझिंग आणि फॉलिकल-स्टिम्युलेटिंग प्रकारची ही संप्रेरके पिट्युटरी ग्रंथींमधून स्त्रवतात आणि ह्यांमुळे बीजांड निर्मितीच्या प्रक्रियेस (ओव्ह्यूलेशन)चालना मिळते व बीजांडकोश (ओव्हरीज्) उत्तेजित होऊन इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनची निर्मिती होते. इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनमुळे गर्भाशय व स्तनांना उत्तेजना मिळून त्यांना भावी फलनासाठी सज्ज केले जाते.

स्त्रिया छाती कशी वाढवावी <<वाचा येथे

  • मुलींची मासिक पाळी कधी सुरु होते?
    सामन्यत: मुलींना दहा ते पंधरा वर्षे वयाच्या दरम्यान मासिक पाळी येण्यास सुरुवात होते. सरासरी 12 वर्षे वयामध्ये मुलींना पहिली मासिक पाळी येते. परंतु प्रत्येक मुलीच्या शारीरिक स्थितीनुसार यात फरक आढळून येतो. प्रत्येक मुलीला या वयातच पाळी यायला हवी असे एकही नाही. पहिली मासिक पाळी सुरु होण्याच्या दोन दिवस आधी संकेत मिळायला सुरुवात होते. जसे की मासिक पाळी सुरु होण्याच्या दोन वर्षांआधी पासून स्तन वाढण्यास सुरुवात होते. याशिवाय अंडरवियरमध्ये वजाइनल डिस्‍चार्ज येणे सुद्धा मासिक पाळीचाच संकेत आहे. हा डिस्‍चार्ज मासिक पाळी सुरु होण्याच्या जवळपास सहा महिने वा एक वर्षे आधी सुरु होतो.

  • पाळीच्या काळात स्वच्छतेसंबंधी काय काळजी घ्यावी ?
    पाळीच्या काळात रोज सकाळी गरम पाण्याने आंघोळ करावी. या काळात कापडाच्या घडया वापराव्या लागतात. त्या सुती कापडाच्या, पातळ आणि मऊ असाव्यात. त्याचे कापड नीट स्वच्छ धुवून घ्यावे. पाळीचे कपडे मोकळ्या हवेशीर जागी, शक्यतो सुर्यप्रकाशात वाळवावे. घाणीत, अडगळीच्या ठिकाणी कपडे वाळवू नयेत. जाळीदार कापड बाजारातून आणून त्यात कापूस घालून चौकोनी लांबट घडया करता येतात. बाजारात मिळणारे सानीटरी नापकीन हे चांगले असले तरी अनेकांना परवडणारे नसतात. त्यामुळे कापड स्वच्छ धुवून, कोरडे केलेलेच वापरावे व प्रत्येक २-३ तासांनी बदलावेत.

मासिक पाळी कॅल्कुलेटर | Period Calculator in Marathi

या लेखात आम्ही वयात येणाऱ्या मुली मधील शारीरिक बदल मासिक पाळी म्हणजे काय? (menstruation meaning in marathi) या बद्दलची माहिती आपणास दिली. आशा आहे की मराठी माहिती आपणास उपयोगी ठरली असेल. आपले काही प्रश्न असतील तर कमेन्ट करून विचारा. धन्यवाद..

अधिक वाचा :

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *