तुरटी, फिटकरी म्हणजे काय व फायदे | Turti che Fayde | Phitkari in Marathi

तुरटी चे फायदे – Phitkari in Marathi : तुरटी चा वापर आपल्या घराघरात केला जातो. तुरटीला हिंदीत फिटकरी असे म्हणतात. अगदी लहानशी पांढऱ्या दगडाप्रमाणे दिसणारी ही तुरटी अतिशय महत्त्वाची आहे. आजच्या या लेखात आम्ही आपल्याकरिता तुरटीबद्दल काही महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. तुरटी चे फायदे काय आहेत, तुरटी कशी बनवतात व alum meaning in marathi या बद्दल आपण माहिती पाहणार आहोत.

फिटकरी म्हणजे काय - turti che fayde

तुरटी / फिटकरी म्हणजे काय ? (alum/fitkari in marathi)

फिटकरी म्हणजे काय तर तुरटीलाच हिन्दी भाषेत फिटकरी म्हटले जाते. तुरटी हा एक रंगहीन रासायनिक पदार्थ आहे. जो दिसायला एखाद्या पांढऱ्या दगडाप्रमाणे असतो. तुरटी चे रासायनिक नाव पोटॅशियम अल्युमिनिअम सल्फेट असं आहे. तर इंग्रजीमध्ये तुरटीला पोटॅशियम अलम असं म्हटलं जातं. अगदी साधारण पांढऱ्या दगडाप्रमाणे दिसली ही तुरटी अतिशय महत्त्वाची आहे. लहानपणापासून आपण सर्वांना कल्पना आहे की, तुरटी अशुद्ध पाण्यावर फिरवल्यानंतर पाणी शुद्ध होते तसेच तुरटीचे पाणी पिण्याची आरोग्यासाठी खूप सारे फायदे देखील आहेत. तसेच तुरटीचे अनेक प्रकार आहेत.

तुरटी कशी बनवली जाते

आता आपण जाणूया की तुरटी कशी बनवतात, बॉक्साइट तसेच ॲल्युनाइटवर प्रक्रिया करून तुरटी बनवली जाते. तुरटीचे स्फटिक समकोन अष्टकोनाकृती असतात. गढूळ पाणी स्वच्छ करण्यास तुरटीचा उपयोग होतो. आपण तुरटी चे पाऊडर वापरुन घरच्या घरी देखील तुरटी बनवू शकतात. 

तुरटीचे प्रकार (Types of alum)

  1. पोटॅशियम अलम
  2. अमोनिअम अलम
  3. क्रोम अलम
  4. अल्युमिनिअम सल्फेट
  5. सोडिअम अलम
  6. सेलेनेट अलम

तुरटी चे फायदे (Benifits turti che fayde)

  • ज्यांना जास्त घाम येतो त्यांनी तुरटी पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ केल्यास घामाचा त्रास कमी होईल.

  • हातावर सूज आणि खाज येत असेल तर त्यासाठी पाण्यात तुरटी टाकून उकडून घ्यावे व त्या पाण्याने हात धुवावेत असे केल्याने हातावर येणारी सूज आणि खाज बंद होते.

  • जखम झाल्यावर त्यावर तुटीची बारीक कूट करुन ते चूर्ण लावल्याने जखमेतून रक्त येणे थांबते.

  • दाढी केल्यावर चेहऱ्यावर तुरटी लावल्याने त्वचा मऊ राहते व दाढी केल्यानंतरही चूडचूड होत नाही.

  • पावसाळ्यात खराब पाणी येत असल्यास त्यावर तुरटी फिरवल्याने किंवा पाण्यात तुरटी टाकल्यास पाणी शुद्ध होते.

  • दात दुखी : तुरटीचा उपयोग दात दुखी साठी तसेच दातांना कीड लागली असेल तर त्यासाठी केला जातो. दात दुखी असेल तर तुरटी व काळी मिरीची पेस्ट करून दातांवर लावावी. असे केल्यास दात दुखी थांबते.

  • तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी : तुरटी गरम पाण्यात टाकून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडातील दुर्गंधी व दातातील किडे नाहीसे होतात.

  • उन्हामुळे काळी पडलेली त्वचा (Surnburn) : उन्हामुळे बऱ्याचदा त्वचा काळी पडते. अशावेळी एक कप पाण्यात दोन चमचे तुरटीची पावडर टाकून त्वचेवर लावावी. याच्या दहा मिनिटानंतर त्वचा स्वच्छ पाण्याने धुवावी. असे केल्यास काळी पडलेली त्वचा हळूहळू नाहीशी होते.

  • ताप, खोकला आणि दमा : सध्या ताप आणि खोकला तर साधारण समस्या झाल्या आहेत. खोकल्यासाठी तुरटी खूप महत्त्वाची ठरते. तुरटी चे पाणी पिणे दमा व खोकल्यावर प्रभावी उपाय आहे. त्याचप्रमाणे दहा ग्रॅम तुरटी व दहा ग्रॅम साखर एकत्र वाटून घ्यावेत. व रोज रात्री गरम दुधात हे चूर्ण घालून पिल्याने ताप खोकला व दमा यांवर नियंत्रण मिळवता येते.
  • केसातील उवा मारण्यासाठी : केसांसाठी देखील तुरटी अतिशय महत्त्वाची ठरते. ऊवा या लहान मुलांना जास्त प्रमाणात होतात. इतकंच नाही तर ऊवा एकाच्या केसातून दुसऱ्यांच्या केसांमध्ये पटकन जातात. यामुळे खाज आणि स्काल्प अशा समस्या उद्भवतात. पण यापासून सुटका मिळवण्यासाठी तुरटीचा उपयोग करा. तुरटीची पेस्ट तुम्ही केसांना लावली आणि नंतर केस धुतले तर तुम्हाला केसातून ऊवा काढण्यासाठी मदत मिळते. तुरटीमुळे केसातील ऊवा नष्ट होऊन तुमचे केस पुन्हा पहिल्यासारखे होऊ शकतात.

  • शेविंग लोशन म्हणून तुरटीचा उपयोग : दाढी केल्यानंतर दाढीच्या त्वचेवर तुरटी फिरवल्यास त्वचा नरम राहते, तसेच दाढी करताना कुठे रक्त आले असल्यास त्यावर तुरटी फिरवल्यानंतर रक्त येणे सुद्धा थांबते.
  • चेहरा उजळ होण्यासाठी पाण्यात थोडी तुरटी टाकून त्या पाण्याने चेहरा धुवावा. असे केल्यास चेहऱ्यावरील मृत त्वचा (Dead skin) निघून चेहरा उजळतो.

  • चेहऱ्यावर मुरूम (pimples)असल्यास तुरटीचे चूर्ण करून त्यात थोडे पाणी मिक्स करावे व जेथे मुरूम अथवा डाग असतील त्याठिकाणी ही पेस्ट लावावे. याच्या वीस मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाकावा. हा उपाय केल्याने मुरूम च्या समस्येपासून सुटका होते. आपण हा उपाय आठ ते दहा दिवस करू शकतात.

  • तोंडातील छाले साठी : तोंडात छाले झाल्यास तुरटी ची बारीक पेस्ट करून त्यावर 30 सेकंद पर्यंत लावावी व नंतर कोमट पाण्याने गुळण्या केल्यास छाले कमी होतात.
  • सुरकुत्या कमी करण्यासाठी : गुलाब जल सोबत थोड्या प्रमाणात तुरटी मिक्स करून ते मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याची सुरकुतलेली त्वचा व्यवस्थित होऊन जाते. पण तुरटी चे मिश्रण डोळ्यात जाता कामा नये याची काळजी घ्यावी.

  • रक्ताच्या उलट्या होत असल्यास
    भाजलेली एक ग्राम तुरटी सकाळ-संध्याकाळ पाण्यासोबत घेतल्याने रक्ताच्या उलट्या थांबतात.

  • टॉन्सिल चा त्रास असल्यास
    टॉन्सिल्स त्रास असल्यास गरम पाण्यात थोडीशी तुरटी आणि मीठ घालून गुळण्या केल्यास टॉन्सिल चा त्रास कमी होतो.

  • फाटलेल्या पायांसाठी
    पाय फाटण्याची समस्या बऱ्याच जणांना असते. त्यावर तुरटी हा सोपा उपाय आहे. तुम्ही नियमितपणे तुरटीचा तुकडा पाय ओले करून त्यावर घासला तर तुमची ही समस्या लवकरच बरी होईल. तसंच तुम्हाला त्रासही होणार नाही

तुरटी चे नुकसान (side effects disadvantages of alum in marathi)

तुरटीचे अनेक फायदे तर आहेतच. परंतु जास्त प्रमाणात वापर केल्यास तुरटी चे काही नुकसान देखील होत असतात ते खालील प्रमाणे-

  • तुरटीचा वास सतत घेतल्याने नाक व तोंडात सूज येऊ शकते.
  • काही लोकांना तुरटी ची एलर्जी असल्याकारणाने त्यांनी तिचा वापर केल्यास त्वचा व डोळ्यांवर जळजळ होऊ शकते.
  • तुरटी लहान मुलांपासून दूर ठेवावी, त्यांच्या डोळ्याला व त्वचेला रॅशेस होण्याची शक्यता असते.
  • अधिक वेळा चेहऱ्यावर तुरटीचा वापर केल्यास चेहरा रुक्ष होऊ शकतो
  • तुरटीचा वापर करण्याआधी आपल्या डॉक्टरांशी एकदा संवाद नक्की साधावा.

तर मित्रांनो या लेखात आपण फिटकरी अर्थात तुरटी म्हणजे काय (fitkari, alum in marathi), तुरटी चे फायदे (turti che fayde) काय आहेत तुरटी कशी बनवतात या बद्दलची काही माहिती मिळवली. आशा आहे आपणास ही माहिती उपयोगी ठरली असेल. या महितीला आपले मित्र व कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद..

READ MORE

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *