एरंडेल तेलाचे फायदेcastor oil in marathi : निरोगी राहण्यासाठी हजारो वर्षांपासून लोक अनेक घरगुती उपाय करीत आहेत. आयुर्वेदातील एरंडेल तेल केस आणि त्वचा रोगांसोबतच शरीराच्या अनेक रोगांना दूर करण्याची क्षमता ठेवते. एरंडेल तेल हे एका वनस्पती वृक्षापासून मिळवले जाते. आजच्या लेखात आपण एरंडेल तेल काय आहे (castor oil in marathi), erandel tel use in marathi आणि एरंडेल तेलाचे फायदे आणि उपयोग पाहणार आहोत. तर चला सुरु करूया… castor oil meaning in marathi
castor oil in marathi
Table of Contents
एरंडेल तेल काय आहे ? castor oil in marathi
एरंड वनस्पती पासून बनवण्यात आलेले एरंडेल तेल औषधी रूपात खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. जवळपास प्रत्येक रोगात एरंडेल तेल चा उपयोग केला जातो. खास करून याचा उपयोग डोळ्यांची समस्या, मूळव्याध, खोकला, पोट दुखणे इत्यादी समस्यांमध्ये केला जातो. एरंडेल तेल कप, वात आणि पित्त नियंत्रणात आणण्याचे कार्य देखील करते. याशिवाय अनेक औषधी बनवण्यासाठी देखील एरंडेल तेल चा उपयोग केला जातो.
एरंडेल तेलाचे फायदे
Castor oil meaning in marathi : एरंडेल तेलाचे फायदे खूप चमत्कारिक आहेत. विविध रोगांमध्ये एरंडेल तेल चा उपयोग आणि त्याचे फायदे पुढे देण्यात आले आहेत.
सूजन कमी करण्यासाठी
जर शरीराच्या कोणत्याही अवयवावर सुजन आली असेल. तर एरंडेल तेलाच्या मालिश ने सुजन दूर करता येते. जर हाता पायाला कुठे ही सुजन आलेली असेल तर एका वाटीत थोडे एरंडेल तेल घेऊन त्याला हलके गरम करावे. हे गरम तेल हलक्या हाताने प्रभावित जागेवर लावावे आणि मालिश करावी. एरंडेल च्या या तेलात रिकिनोलिक एसिड असते. जे सुजन दूर करण्यात सहाय्यक ठरते.
दुखणे दूर करते
एरंडेल तेल (castor oil in marathi) सुजन कमी करण्यासोबतच शरीराच्या स्नायूंमध्ये होत असलेले दुखणे देखील कमी करण्यात सहाय्यक आहे. जर गुडघे, मान, कोपर इत्यादी स्नायूंमध्ये सारखे दुखत असेल तर एरंडेल तेलात लसणाच्या दोन पाकळ्या टाकून त्याला गरम करावे. व यानंतर हे तेल दुखत असलेल्या जागेवर लावावे. दररोज एरंडेल तेल लावल्याने दुखणे नक्कीच कमी होते.
बद्धकोष्टता आणि संडास साफ न होणे
पोट साफ होण्यासाठी एरंडेल तेल : बऱ्याच लोकांना पोट साफ न होण्याची समस्या असते. जर आपणही बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून त्रस्त असाल तर एरंडेल तेल हे तुमच्यासाठी एक आयुर्वेदिक व कोणताही साइड इफेक्ट नसलेली चमत्कारी औषध आहे. पोटासाठी एरंडेल तेल च्या उपयोग मध्ये ज्या लोकांना संडास साफ होत नसेल त्यांनी दररोज रात्री झोपण्याआधी एक चमचा एरंडेल तेल प्यावे. तुम्ही याचे सेवन दुधासोबत ही करू शकतात. एरंडेल तेल मध्ये लेक्सटिव असते. याच्या सेवनाने तुमचे पोट नक्कीच साफ होईल. संडास साफ होण्यासाठी उपाय<<वाचा येथे.
वजन कमी करण्यासाठी एरंडेल तेल चा उपयोग
जर आपण अनावश्यक चरबी आणि वाढत्या वजनापासून त्रस्त असाल तर वजन कमी करण्यासाठी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवा या पाण्यात अद्रक टाकून त्याला उकळून घ्यावे. जेव्हा हे पाणी अर्धे होऊन जाईल तेव्हा गॅस बंद करावा आणि पाण्याला एका भाड्यात गाळून घ्यावे. यानंतर या पाण्यात ग्रीन टी आणि एरंड तेलाचे काही थेंब टाकावे व दररोज सकाळी खाली पोट हे पाणी प्यावे. नियमित हा उपाय केल्याने वजन कमी होऊ लागेल. पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय<<वाचा येथे.
सर्दी खोकल्यात एरंडेल तेलाचा उपयोग
सर्दी खोकला झाल्यावर एरंडेल तेल गरम करून नाक आणि छातीवर लावावे. असे केल्याने नाक उघळून जाईल आणि सर्दी खोकल्यात आराम मिळेल.
चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी उपयोग
एरंडेल तेल चे फायदे चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी गुणकारी आहेत. चेहऱ्यावर डाग आल्यावर एक चमचा एरंडेल तेलात थोडासा खाण्याचा सोडा टाकावा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. हे तेल लावल्याने चेहऱ्यावर असलेल्या मृत पेशी निघून जातात आणि वांग व काळे डाग फिकट होऊन जातात.
erandel tel use in marathi
केसांसाठी एरंडेल तेल चा उपयोग
केसांच्या आरोग्यासाठी एरंडाचे तेल खूप उपयोगी आहे हे तेल केसांना योग्य पोषण देते. या तेलात रेसिनोलेईक ॲसिड सोबतच ओमेगा 6 आणि आवश्यक फॅटी ऍसिड असतात. जे डोक्यातील रक्त प्रवाह सुरळीत ठेवून केसांचे आरोग्य सुधारतात. केसांमध्ये एरंडेल तेल (castor oil in marathi) लावल्याने केसांची पौष्टिकता वाढते आणि केस वाढवण्यासाठी मदत मिळेल.
याशिवाय जर केसांमध्ये डेंड्रफ आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले असेल तर एका वाटीत थोडेसे नारळाचे तेल घ्यावे या तेलात एरंडेल तेल मिसळावे. दोघी तेल चांगल्या पद्धतीने एकत्रित करावे आणि केसांमध्ये लावावे. असे केल्याने केसांमधील डेंड्रफ इन्फेक्शन इत्यादी समस्या दूर होतात सोबतच केसांमधील खाज देखील समाप्त होते. केस गळतीवर उपाय <<वाचा येथे.
बेंबीत ऐरंडेल तेल टाकण्याचे फायदे
जर पोटात दुखत असेल किंवा अपचन ची समस्या होत असेल तर ऐरंडेल तेल बेंबीत टाकून मालिश केल्याने आराम मिळतो.
यासाठी रात्री झोपण्याआधी 10-15 थेंब ऐरंडेल तेल बेंबीत टाकावे आणि यानंतर पोट व ओटीपोटावर मालिश करावी. सरकलेले बेंबी बटन जागेवर आणावे आणि रात्रभर हे तेल पोटात जिरवू द्यावे.
एरंडेल तेल ची किंमत
एरंडेल तेल कोणत्याही कॉस्मेटिक दुकान, मेडिकल आणि आयुर्वेदिक शॉप वर सहज मिळून जाते. याशिवाय ऑनलाईन देखील एरंडेल तेल खरेदी केले जाऊ शकते. Amazon, flipkart सारख्या वेबसाईट वर डिस्काउंट किमतीत आपल्याला एरंडेल तेल मिळून जाईल. चांगल्या दर्जाचे एरंडेल तेल ₹ 200 रुपयात 250ml मिळून जाते. ऑनलाइन खरेदीसाठी पुढील बटणावर क्लिक करा..
तर मित्रांनो आजच्या या लेखात आपण castor oil in marathi अर्थात एरंडेल तेलाचे फायदे व एरंडेल तेल उपयोग मराठी मध्ये पाहिलेत. आशा आहे की आपणास erandel tel use in marathi उपयोगी ठरले असतील. व castor oil meaning in marathi लेखाला वाचल्यानंतर एरंडेल तेल कसे घ्यावे आणि एरंडेल तेलाचे फायदे काय आहेत या विषयी च्या आपल्या सर्व शंका दूर झाल्या असतील. आपण ही माहिती आपले कुटुंबीय व मित्रमंडळी सोबतही शेअर करू शकतात. धन्यवाद…
धन्यवाद, एरंडेल तेलाच्या छान माहितीसाठी 🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐