गर्भधारणा झाली कसे ओळखावे व गरोदर असल्याची लक्षणे | pregnancy symptoms in marathi

pregnancy symptoms in marathi : आई बनणे ही स्त्री च्या आयुष्यातील अत्यंत आनंदाची गोष्ट असते.एका महिलेला जसेही गर्भवती असल्याची सूचना मिळते तिच्या त्या आनंदाला सीमा नसते. परंतु गर्भधारणा ही आपल्यासोबत अनेक समस्या आणि शारीरिक बदल घेऊन येते. मासिक पाळी न येणे निश्चितच गरोदर असल्याचे संकेत आहे परंतु याशिवाय देखील गर्भधारणा झाली हे ओळखण्यासाठी अनेक वेगवेगळी गरोदर असल्याची लक्षणे दिसू लागतात.

आजच्या या लेखात आपण गर्भधारणा झाली कसे ओळखावे (symptoms of pregnancy in Marathi) आणि गरोदर पहिला महिना लक्षणे जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया…

pregnancy symptoms in marathi | गर्भधारणा झाली कसे ओळखावे
pregnancy symptoms in marathi

गरोदर पहिला महिना लक्षणे | pregnancy symptoms in marathi

गर्भधारणा झाली हे कसे ओळखावे हा प्रश्न जर आपणास सतावीत असेल तर पुढे आम्ही आपल्यासाठी गरोदर असल्याची लक्षणे देत आहोत-

 1. मासिक पाळी थांबणे
  ह्याला गरोदरपणाचे सुरुवाती संकेत मानले जाते. जेव्हा एखादी स्त्री गर्भवती होते तेव्हा तिच्या शरीरात प्रोजेस्टोरेन हार्मोन तयार होऊ लागतात. ज्यामुळे मासिक पाळी थांबते.

 2. रक्तस्त्राव आणि शरीरात जकडण
  ज्यावेळी गर्भाशयात गर्भ तयार होतो तेव्हा महिलेला हलका रक्तस्राव होऊ शकतो. यासोबतच शरीरात जकडन होते. हे लक्षण गर्भधारणेच्या एक आठवड्यानंतर दिसू लागतात. परंतु जर अधिक ब्लीडींग होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा कारण अधिक रक्तस्त्राव मुळे गर्भपात होऊ शकतो.

 3. स्तन दुखणे
  जेव्हा एखादी महिला गर्भवती होते तेव्हा हार्मोनल बदलाव मुळे पहिल्या महिन्यात स्तनात दुखणे सुरू होते. यासोबतच स्तन टाईट होणे, काही महिलांच्या स्तनावर नसा दिसू लागणे आणि काही महिन्यानंतर स्तनांचा आकार बदलणे यासारखे लक्षण दिसू लागतात.

 4. थकवा जाणवणे
  जेव्हा स्त्री गर्भवती होते तेव्हा तिला काहीही काम न करता थकवा येणे. शरीरात सुस्ती आणि ऊर्जेची कमी वाटणे. चालण्या फिरण्यात खूप ताकत लावावी लागत आहे असे वाटणे व फक्त झोपून रहावेसे वाटू लागते.

 5. पुन्हा पुन्हा लघवी लागणे
  शरीरातील प्रोजेस्टोरेन हार्मोन चा स्तर वाढल्याने गर्भवती स्त्री ला पहिल्या महिन्यात पुन्हा पुन्हा लघवी लागण्याची समस्या होऊ लागते.

 6. चिडचिडेपण (मूड स्विंग)
  pregnancy symptoms in marathi मध्ये मूड स्विंग हे गर्भावस्थेतील एक प्रमुख लक्षण आहे. गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात अनेक स्त्रियांचा मूड व व्यवहार बदलणे सुरू होते. पुन्हा पुन्हा राग येणे, लहानसहान गोष्टींवर चिडचिडेपणा करणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.

 7. निप्पल चा रंग बदलणे
  यादरम्यान स्तनाच्या निप्पल वरही अनेक बदल दिसू लागतात. हार्मोन मधील बदलामुळे मेलानोसाइट्स प्रभावित होते. यामध्ये त्वचेचा रंग प्रभावित करणाऱ्या मेलेनिन चे उत्पादन होते. यामुळे त्वचेचा रंग डार्क गडद दिसू लागतो. निप्पल चा रंगही आधीपेक्षा गडद होतो.

 8. छातीत जळजळ
  गर्भवती स्त्रीच्या छातीत जळजळ होणे ही समस्या निर्माण होते. गर्भावस्थेतील ही सामान्य बाब आहे. म्हणून जास्त घाबरण्याची आवश्यकता नाही. परंतु जर छातीतील जलन अधिकच वाढली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 9. जास्त भूक लागणे
  गरोदर स्त्रीची भूक अचानक वाढून जाते. हार्मोन्स मधील बदलामुळे तिला परत परत भूक लागते. याशिवाय त्या स्त्री ची खाण्यापिण्या मध्ये आवड वाढू लागते. जी गोष्ट तिला आधी खायला आवडत नसे तो पदार्थ ती खाऊ लागते.

गर्भधारणा झाली कसे ओळखावे व संपूर्ण खात्री

जर वरील लक्षणे आपल्याला दिसत असतील आणि गरोदरपणाची संपूर्ण खात्री आपण करू इच्छित असाल तर आपण घरच्या घरी प्रेग्नेंसी टेस्ट किट च्या मदतीने खात्री करू शकतात.

आजकाल बाजारात अनेक प्रेग्नेंसी टेस्ट किट उपलब्ध आहेत ज्यांच्यामध्ये तिने स्वतः घरच्या घरी गरोदरपणाची तपासणी करता येते. यासाठी सकाळच्या लघवीतील काही थेंब टेस्ट किट मध्ये टाकून तपासणी करता येते. घरच्या घरी टेस्ट कसे करावे जाणून घेण्यासाठी येथे वाचा>> प्रेगा न्यूज प्रेग्नेंसी टेस्ट किट कसे वापरावे

गर्भधारणे विषयी प्रश्न उत्तरे

गरोदर आहे हे किती दिवसात कळते ?

जर आपणास पाळी चुकण्याच्या कालावधी पर्यन्त वाट पहावायची नसेल तर आपण संभोगच्या 1 ते 2 आठवड्यापर्यंत वाट पाहू शकतात. जर तुम्ही गरोदर असाल तर शरीराला HCG चे योग्य स्तर निर्माण करण्यासाठी 7 ते 12 दिवसांचा कालावधी लागतो. या कालावधी नंतर आपण pregnancy चा होम टेस्ट करू शकतात.

गर्भ किती दिवसात तयार होतो ?

गर्भ हा संभोगानंतर तत्काळ तयार नाही होत. शुक्राणू आणि स्त्री बीज एकत्रित होण्यासाठी जवळपास 7 दिवसांचा कालावधी लागतो. व यानंतरच गर्भ तयार होऊ लागतो.

तर हे होते गरोदर असल्याची लक्षणे | pregnancy symptoms in marathi. आम्ही अशा करतो की ही माहिती आपणास उपयुक्त ठरली असेल व गर्भधारणा झाली कसे ओळखावे हे आपल्याला समजले असेल. जर गर्भधारणा विषयी आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद..

7 thoughts on “गर्भधारणा झाली कसे ओळखावे व गरोदर असल्याची लक्षणे | pregnancy symptoms in marathi”

 1. समजा आज सेक्स झालंय .आणि उद्या मासिक पली व्हायची वेळ आहे. किंवा 4-5 दिवसात मासिक पाळी व्हायची वेळ आहे .तर ती मासिक पाळी होते का?
  म्हणजे तुम्हीच म्हणालात की 7 दिवस लागतात या प्रोसेस साठी….

 2. सेक्स केल्यानंतर 1किंवा2थेंब योनीत गेल्यावर गर्भधारणा होते काय

  1. होय होऊ शकते, गर्भधारणेसाठी फक्त एका वीर्यची आवश्यकता असते. म्हणून जर आपण नको असलेल्या pregnancy ला टाळू इच्छिता तर योग्य चिकित्सक सल्ला घ्यावा. अधिक माहितीसाठी वाचा i pill tablet use in marathi

 3. Premonth 5 mg Suru Astana unprotected sex zhala tr pregnancy hou शकते का आणि होत असेल तर unwanted घेतली तर चालते का

 4. एकदम फर्स्ट टाइम सेक्स केल्यानंतर ज्यावेळी वर्जिनिटी लूज होते त्यावेळी मुलगी गरोदर राहू शकते का??

 5. Sex kelya nntr 3 days mdhe period aale Atta period cha 4th day aahe.. Khup thakwa janawat aahe.. Pregnant ashu shkte ka ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *