ध्यान म्हणजे काय आणि कसे करावे मराठी | Meditation Kase Karave

Meditation kase karave : ध्यानाच्या प्रमुख उद्देश व्यक्तितील सुप्त शक्तींना जागृत करून परमेश्वराशी योग घडवणे हा असतो. आजच्या या लेखात आपण ध्यान म्हणजे काय आणि ध्यान कसे करावे मराठी याबद्दलची माहिती मिळवणार आहोत. मेडीटेशन कसे करावे हे जाणून घेतल्यावर आपणही घरच्या घरी ध्यान धारणा करू शकतात.

meditation kase karave

ध्यान म्हणजे काय ? meditation meaning in marathi

आजच्या धावपळीच्या व्यस्त जीवनशैलीत व्यक्तीला अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आजचा मनुष्य अत्याधिक चिंता, विचार, क्रोध, इर्षा इत्यादी समस्यांनी ग्रस्त आहे. जर या सर्व समस्यांपासून मुक्ती आणि मानसिक शांती प्राप्त करायचे असेल तर त्याचा एकमेव मार्ग ध्यान आहे.

ध्यान ला इंग्रजी भाषेत mediation (मेडिटेशन) म्हटले जाते. नियमित मेडिटेशन करणारा व्यक्ती तणाव, चिंता इत्यादी समस्यांपासून तर दूर राहतोच परंतु याशिवाय दैनंदिन जीवनातील अनेक समस्या देखील तो सोडवू शकतो.

ध्यान करण्याचे फायदे – Benefits Of Meditation in Marathi

 • तणाव आणि डिप्रेशन पासून मुक्ती मिळते.
 • शारीरिक रोगांपासून लढण्याची क्षमता विकसित होते.
 • धूम्रपान आणि नशा सुटतो
 • नकारात्मक विचारांपासून सुटका होते
 • मानसिक रोग जसे डिमेन्शिया, अवसाद, ओसीडी आणि सिजोफ्रेनिया होत नाहीत.
 • स्मरणशक्ती अधिक तेज बनते.
 • डोकेदुखी पासून मुक्ती मिळते.
 • जीवनाचा खरा अर्थ समजण्यात सहाय्य होते.
 • चिंता दूर होते.
 • आत्मज्ञानाची प्राप्ती होते.
 • प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त होतो.

ध्यान कसे करावे ? – Meditation Kase Karave

ध्यानाचे सर्व फायदे आपणास तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही त्याला योग्य पद्धतीने कराल. पुढे आम्ही आपणास ध्यान कसे करावे (meditation kase karave) या बद्दल माहिती देत आहोत.

meditation kase karave
meditation kase karave
 1. योग्य व शांत स्थान निवडावे
  ध्यान करण्यासाठी एका शांत जागेची आवश्यकता असते. म्हणून जर आपण ध्यान करण्याचा विचार करीत असाल तर सर्वात आधी एका शांत खोलीची निवड करावी. जेथे बाहेरचे आवाज येणार नाहीत.

 2. योग्य वेळेची निवड
  जर आपण मेडिटेशन सुरू करीत असाल तर आपणास योग्य वेळेची निवड करावी लागेल. ध्यान करण्याची योग्य वेळ सकाळी 4 वाजेच्या सुमारास सांगितली जाते. ह्याच वेळेला ब्रह्म मुहूर्त देखील म्हटले जाते. याशिवाय आपण रात्री झोपण्याच्या अगोदर ही ध्यान करू शकतात.

 3. योग्य कपडे घालावेत
  ध्यान करीत असताना सैल कपडे वापरावेत जीन्स तसेच टी-शर्ट घालून ध्यान करू नये. याशिवाय ध्यान नेहमी खाली पोट करावे. म्हणजेच जेवण केल्यानंतर लगेजच ध्यान करू नये.

 4. ध्यान करणे श्वसन क्रिया
  मांडी घालून ध्यानाला बसल्यानंतर दोन्ही हात समोर ठेवावेत. यानंतर डोळे बंद करावेत. हळुवार श्वास आत घ्यावा व बाहेर सोडावे आपले संपूर्ण चित्त श्वासावर एकाग्र करावे. मनात कोणताही विचार येऊ देऊ नका संपूर्ण फोकस श्वासावर ठेवा.

 5. ध्यानाची समाप्ती
  ध्यानातून बाहेर निघताना हळुवार डोळे उघडावेत. घाई गडबड अजिबात करू नये.

  meditation kase karave हा जर आपला प्रश्न असेल तर ध्यानाचा एकमात्र उद्देश हाच आहे की आपण आपले विचार थांबवून निर्विचार स्थिती ला प्राप्त करावे. ही गोष्टदेखील सत्य आहे की विचार येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि आपण आपल्या विचारांना पूर्णपणे रोखू शकत नाहीत. परंतु दोन विचारांमध्ये जो गॅप असतो त्याला वाढवण्याचा प्रयत्न आपण नक्की करू शकतो.

  नियमित ध्यान केल्याने आपण आपल्या जीवनात अनेक नवीन बदल पाहणार. ध्यानाची अशीच एक चमत्कारिक पद्धत म्हणजेच सहज योग ध्यान होय. सहज योग ध्यानाची माहिती आपण पुढे वाचूया..

कायम निरोगी राहण्यासाठी काही उपाय <<वाचा येथे

सहज योग ध्यान पद्धती – (Sahajayoga Mediatation in Marathi)

सहज योग ध्यानाची सुरुवात परम पूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्याद्वारे सन 1970 साली करण्यात आली. श्री माताजी यांना सहज योग ध्यानाच्या संस्थापिका म्हणून ओळखले जाते. “सह” चा अर्थ होतो आपल्या सोबत आणि “ज” म्हणजे जन्मलेला म्हणजेच आपल्या सोबत जन्मलेला योग म्हणजेच “सहज योग” होय.

प्रत्येक मानव शरीरात जन्मताच तीन नाड्या आणि सात चक्र असतात. यासोबतच परमेश्वराची शक्ती “श्री कुंडलिनी” ही सुप्तावस्थेत व्यक्तीच्या मूलाधार चक्रात साडेतीन कुंडलांमध्ये स्थित असते.

कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर ती मध्य सुषुम्ना नाडी द्वारे सात चक्रांचे भेदन करीत सहस्त्रार चक्रात येते. कुंडलिनी जागृत झाल्यावर हात आणि डोक्याच्या टाळू भागात शितल परमेश्वरी चैतन्याची अनुभूती होते. कुंडलिनी शक्ती चा उल्लेख प्रत्येक धर्मात करण्यात आला आहे. हिंदू धर्मात “परम चैतन्य” इस्लाम मध्ये “रुहानी” आणि बायबल मध्ये “कुल ब्रिझ ऑफ दि होली घोस्ट”अशा पद्धतीने या परम चैतन्याचे वर्णन करण्यात आले आहे.

सहज योग ध्यान अतिशय सोपी ध्यान पद्धति असून आपण आपल्या घरी दैनंदिन कार्य करीत हे ध्यान करू शकतात. सहज योग ध्यानाचे अनेक मानसिक शारीरिक आणि अधिभौतिक लाभ आहेत. सहज योग ध्यानाचे केंद्र जगभरात आणि प्रत्येक गावागावात आहेत. ध्यान शिकण्यासाठी आपण आपल्या जवळच्या सहज योग ध्यान केंद्राशी संपर्क करू शकतात. ऑनलाइन आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी पुढील विडियो पहा:

आजच्या या लेखात आपण ध्यान म्हणजे काय आणि ध्यान कसे करावे – meditation kase karave या बद्दलची मराठी माहिती प्राप्त केली. आशा आहे की ही माहिती आपणास फार उपयुक्त ठरली असेल. जर आपले काही प्रश्न असतील तर आपण आम्हास कमेन्ट करून विचारू शकतात.

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *