This article contains best home remedies for kidney stone in marathi and kidney stone home treatment in marathi also we added some kidney stone symptoms in marathi. you will get some clear idea about mutkhada gharguti upay.
प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात दोन किडनी असतात. किडनीचे कार्य शरीरातील हानीकारक पदार्थ बाहेर टाकून शरीरातील पाणी आणि तरल पदार्थ योग्य प्रमाणात ठेवणे असते. परंतु काही लोकांमध्ये भोजनातील बदल आणि काही पदार्थांच्या जास्त सेवनामुळे किडनी मधील स्टोन अर्थात मुतखडा (Kidney Stone) ची समस्या होऊन जाते.
आजच्या या लेखात किडनी स्टोन बद्दल ची मराठी माहिती व मुतखडा पोटदुखी उपाय (kidney stone home treatment in marathi) आणि मुतखड्याचे घरगुती, आयुर्वेदिक व औषधी ट्रीटमेंट बद्दलची माहिती देण्यात आली आहे.

Table of Contents
मुतखडा (Kidney Stone) म्हणजे काय ?
मुतखडा हा मिनरल्स आणि मिठा पासून बनलेला एक टणक पदार्थ असतो. याचा आकार रेती येवढा छोटा तर एका लहान आकाराच्या चेंडू एवढा मोठा असू शकतो. बऱ्याचदा लहान आकारातील मुतखडा हा पाण्यासोबत विरघळुन बाहेर निघून येतो. परंतु जर मुतखड्याचा आकार 5 mm पेक्षा अधिक असेल तर यामुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो व परिणामी तीव्र वेदना, लघवी करताना अडचण आणि उलटी यासारख्या समस्या होतात.
असंतुलित आहार, अत्यधिक वजन, काही रोग आणि काही औषधे किडनी स्टोन चे प्रमुख कारण आहेत.
मुतखड्याची लक्षणे – kidney stone symptoms of Marathi
मुतखड्याची लक्षणे नेहमी दिसतीलच असे नाही. ज्या किडनी स्टोन चा आकार लहान असतो त्या व्यक्तीला जास्त त्रास होत नाही. परंतु ज्याचा मुतखडा मोठ्या आकाराचा असतो त्याला अधिक त्रास होतो.