होमिओपॅथी म्हणजे काय, फायदे व औषध उपचार | Homeopathy information/meaning in Marathi

होमिओपॅथी म्हणजे काय ? Homeopathy information in marathi : होमिओपॅथी जर्मनी मध्ये सन 1796 मध्ये डॉ सैमुअल हैनीमैन द्वारे शोधण्यात आलेली एक औषधीय चिकित्सा प्रणाली आहे. संस्कृत भाषेत या तऱ्हेच्या उपचार प्रणाली ला “सम: समं समयति” किंवा “विषस्य विषमौषधम्” म्हटले जाते. याचा अर्थ “विष हेच विष” ला कापते असा होतो.

अनेकांना शंका असते की होमिओपॅथी म्हणजे काय ? व होमिओपॅथी चे फायदे आणि औषध उपचार कसा आहे. म्हणूनच आजचा हा लेख आम्ही homeopathy information in marathi या विषयावर आधारित लिहिलेला आहे.

होमिओपॅथी म्हणजे काय ?

कुठलाही आजार झाला तर आपला कल हा ऑलोपेथी डॉक्टरकडे असतो, आणि ते स्वाभाविक देखील आहे. उपचार लवकर होतो व व्यक्ती लवकर बरी होते. पण अनेकदा एलॉपथी औषधांचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. म्हणून आजकाल उपचारासाठी वापरण्यात येणारी आयुर्वेदिक उपचार पद्धतीसोबतच सर्वात सोयीस्कर व आरोग्याला चांगली अशी होमिओपॅथी ही एक उपचार पद्धत आहे.

होमिओपॅथी ही आजार समूळ नष्ट करते तसेच या औषधामुळे दुष्परिणाम देखील होत नाहीत. शिवाय औषधी घेणाऱ्याला औषधाची सवय होत नाही. होमिओपॅथी ही उपचार पद्धती मनोरचनेवर काम करते. म्हणून होमिओपॅथीचे औषध देताना रोग्याचे व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडी, सवयी आणि एकूण आरोग्य विचारात घेऊन उपचार केले जातात.

होमिओपॅथी चा इतिहास

होमिओपॅथीचा शोध साधारणपणे 200 वर्षांच्या आधी म्हणजेच सन 1976 मध्ये जर्मनीत लागला.सॅम्युअल हॅनिमेन हे होमिओपॅथीचे जनक होते.भारतात सर्वात आधी होमिओपॅथी ही बंगाल मध्ये आली त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या काळात महाराष्ट्रात होमिओपॅथी दाखल झाली. महाराजांवर होमिओपॅथी चे उपचार केले गेले त्यानंतर महाराष्ट्रात पाहिले होमिओपॅथी रुग्णालय सुरू केले. पण त्याकाळी भारतात होमिओपॅथिक औषधांचा तुटवडा असल्यामुळे होमिओपॅथीचा पाहिजे तसा विकास झाला नाही.

होमिओपॅथी औषध उपचार

होमिओपॅथी मध्ये औषधी दिली जाते ती काहीशी त्या रोगांना आजारांना समान अशी दिली जाते. म्हणजेच आजाराला कारक असा घटक शरीरात टाकून त्याद्वारे आजार बरा केला जातो.

होमिओपॅथीच्या औषध

होमिओपॅथीच्या गोळ्या या मेंढी अथवा बकरीच्या दुधापासून पावडर तयार करून त्यास रासायनिक औषधी अर्क टाकून बनवल्या जातात. या औषधी साबुदाण्याच्या आकाराच्या असतात. होमिओपॅथी औषधांमुळे या गोळ्या चवीला गोड असतात. तसेच यांचे साईड इफेक्ट्स देखील नसतात. म्हणून या औषधी लहान मुलांना तसेच गरोदर स्त्रियांना देखील आपण देऊ शकतात.

होमिओपॅथी चे फायदे

 • विशेषज्ञांच्या मते ॲलोपॅथीच्या तुलनेत होमिओपॅथी जास्त प्रभावी आहे ते असे की ॲलोपॅथी फक्त लक्षणांवर उपाय करत असते परंतु होमिओपॅथी ने आजार मुळापासून नष्ट होण्यास मदत होते.
 • होमिओपॅथीच्या औषधांमुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता देखील वाढते.
 • होमिओपॅथिक औषधे ॲलोपॅथीच्या तुलनेत स्वस्त असतात
 • ॲलोपॅथीच्या तुलनेने होमिओपॅथीच्या उपचाराला वेळ जास्त लागतो परंतु रोगाचे कारण मुळासकट नष्ट होते, त्याविरुद्ध ॲलोपॅथीमध्ये फक्त थोड्या वेळेसाठी आराम मिळतो.

होमिओपॅथी ने चांगले होणारे आजार

असे अनेक आजार आहेत जे होमिओपॅथी ने बरे होतात त्यात काही दुर्मिळ आजार देखील आहेत. होमिओपॅथी उपचार द्वारे चांगले होणारे काही प्रमुख आजार पुढीलप्रमाणे आहेत.

 • मायग्रेन
 • एलर्जी
 • मानसिक तनाव
 • स्त्रियांमधील रोग
 • किडनी स्टोन इत्यादी अनेक
 • सोबतच हवामान बदलामुळे होणारे सर्दी ,खोकला, ताप तसेच थकवा यासारख्या लहान रोगांमध्ये देखील होमिओपॅथी उपयोगी ठरते.

होमिओपॅथी औषधे कशी घ्यावी ?

 • होमिओपॅथी ची औषधे घेण्याआधी व घेतल्या नंतर ३० मिनिटापर्यंत काही खाऊ पिऊ नये.
 • कॉफी, कच्चा कांदा व लसूण खाऊ नये.
 • chewing gum तसेच मेंटॉफ्रेश असे चॉकलेट खाऊ नये
 • तंबाखू व गुटखा खाऊ नये या गोष्टी खाल्याने औषधाचा पुरेसा लाभ मिळत नाही.
 • दररोज औषध वेळेवर व न चुकता घ्यावे.
 • झोप पुरेशी घ्यावी.

तर मित्रहो या लेखात आपण होमिओपॅथी म्हणजे काय ? (homeopathy information in marathi) होमिओपॅथी चे फायदे व होमिओपॅथी औषध उपचार कसा करावा या विषयी ची काही माहिती प्राप्त केली. अशा आहे ही माहिती आपणास उपयोगी ठरली असेल. या माहितीला आपले मित्र, कुटुंबीय व इतर गरजू मंडळी पर्यन्त नक्की शेअर करा. धन्यवाद..

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *