बाळ गुटगुटीत होण्यासाठी बाळसे येण्यासाठी उपाय : नऊ महिने गरोदर राहिल्या नंतर जेव्हा स्त्री बाळाला जन्म देते आणि ज्यावेळी तिचे बाळ तिच्या हातात दिले जाते तेव्हा तो आनंद गगनात मावेनासा असतो. नऊ महिन्यांच्या हा दीर्घकाळ स्त्रीसाठी अत्यंत कठीण आणि महत्त्वपूर्ण असतो.
परंतु बाळाच्या जन्मानंतरही अनेक गोष्टी अश्या आहेत ज्या आपण लक्षात ठेवायला हव्यात. नवजात बाळाचे शरीर अत्यंत संवेदनशील असते. जर आपण आपल्या बाळाला गुटगुटीत करू इच्छिता व बाळाला बाळसे येण्यासाठी काय करावे हे शोधत असाल तर या लेखात देण्यात आलेली सर्व माहिती योग्य पद्धतीने वाचा आणि हे सर्व उपाय नियमित करा.
बाळ गुटगुटीत होण्यासाठी उपाय
Table of Contents
बाळ गुटगुटीत होण्यासाठी व बाळाला बाळसे येण्यासाठी काय करावे
बाळाला कसे धरावे
जर आपण काही कार्य करून आले असाल तर बाळाला हात लावण्याआधी हातांना स्वच्छ साबणाने धुवावे. लहान बाळांची रोग प्रतिरोधक क्षमता कमी असते म्हणून त्यांना खराब हातांनी स्पर्श करू नये.
नवजात बाळाच्या मानेला व्यवस्थित धरावे. कारण जन्माच्या काही महिन्यांनंतरच त्यांच्या मानेचा योग्य पद्धतीने विकास होतो. बाळ उचलताना मानेला आधार न दिल्याने त्याच्या मानेत इजा होऊ शकते.
बाळाला जास्त वर उचलणे, जोर जोरात हलवणे इत्यादी करू नये. असे केल्याने त्याच्या डोक्यात रक्त जमू शकते.
बाळ झोपलेले असताना जोराचा पंखा लावू नये. पंख्याची गती कमी ठेवावी. जास्त हवा लागल्याने बाळाला श्वास घेणे कठीण होते.
बाळाचे पालन पोषण
प्रत्येक नवजात बाळाला Baby massage oil ने मालीश करायला हवी. असे केल्याने बाळाचे स्नायू बळकट होतात आणि बाळ गुटगुटीत होण्यासाठी हे उपयोगी आहे. परंतु मालिश करताना हलक्या हाताने करावी. जास्त जोर लावणे टाळावे.
शिशु काळजी कशी घ्यावी याबद्दल आणि पुस्तके ऑनलाईन उपलब्ध आहेत. आपण त्यांना खरेदी करू शकतात. याशिवाय baby care expert डॉक्टरांचा सल्ला देखील घ्यावा. पुढे एका पुस्तकाची लिंक देत आहोत : आपल बाळ
लहान बाळांना लोकांच्या गोष्टी व मधुर गाणे ऐकायला आवडते. तुम्ही त्यांना लोरी देखील ऐकू शकतात. परंतु काही बाळांचा स्वभाव वेगळा असतो त्यांना जास्त आवाज सहन होत नाही. म्हणून शिशु समोर बोलतांना हळू आवाजातच बोलावे.
जर आपल्या परिसरात डास, माशी किंवा लहान मोठे किडे माकोडे असतील तर आपल्या बाळासाठी एक लहान नेट नक्की खरेदी करा. या नेट मध्ये बाळाला झोपवल्याने त्याला डास चावण्याच्या धोका टाळता येतो. पुढे एक नेट ची लिंक देत आहोत : baby net buy here
बाळाची अंघोळ कशी करावी
बाळाच्या पहिल्या वर्षात त्याला आठवड्यातून 2 ते 3 वेळा अंघोळ घालावी. परंतु जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर 4-5 वेळा अंघोळ करावी.
अंघोळ घालण्याकरिता बेबी साबण, शाम्पू इत्यादींचा वापर करावा. अंघोळ केल्यानंतर बाळाला स्वच्छ साबणाने पुसावे. आंघोळीनंतर बेबी तेल लाऊन बाळाची हलकी मालिश करावी.
अंघोळ करतांना बाळाच्या काना नाकात पाणी जाऊ नये याची काळजी घ्यावी. डोक्यावरून पाणी टाकू नये. कोमल कापड अथवा कापसाने बाळाचे डोळे आणि चेहरा पुसावा.
बाळ थोडे मोठे झाल्यावर (6 महिन्यापर्यंत) तुम्ही त्याला tub मध्ये बसवू शकतात. टब मध्ये बसून आंघोळ करायला आणि खेळायला बाळाला खूप आवडते. अंघोळ करीत असताना बाळाला एकटे सोडू नये.
नवजात बाळाला दूध पाजणे
नवीन जन्मलेल्या बाळाला दूध पाजताना अनेक गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
तुम्ही बाटली वापरा अथवा स्तनपान, बाळाला त्याच्या भुकेनुसारच दूध द्यावे. जेव्हा बाळाला भूक लागते तेव्हा ते रडू लागतात आणि आपल्या हाताची बोटे तोंडात घालतात.
नवीन जन्मलेल्या बाळाला तीन ते चार तासांमध्ये एकदा दूध देणे आवश्यक असते. जर आपण स्तनपान करीत असाल तर एका स्तनावर 10-15 मिनिटे स्तनपान करावे. यानंतर दुसऱ्या बाजूला 10-15 मिनिटे करावे. जर तुम्हाला वाटत असेल की बाळ व्यवस्थित दूध पीत नाही आहे तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.
जवळपास सर्वच शिशु स्तनपान करीत असताना तोंडाद्वारे हवा पोटात भरून घेतात, ज्यामुळे त्यांचे पोट फुलून जाते. म्हणून स्तनपान झाल्यावर बाळाला वर उचलून उभे धरावे. आणि त्याच्या पाठीवर 5 ते 10 मिनिटे हळुवार थापडावे. असे केल्याने बाळाच्या पोटात असलेली हवा तोंडाद्वारे बाहेर निघते आणि बऱ्याचदा बाळ ढेकर देते.
बाळाला बाळसे येण्यासाठी काय करावे तर त्याची पूर्णपणे झोप होऊ द्यावी. एक नवजात शिशू दिवसातून 16 तास किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ झोपते. प्रत्येक 3-4 तासांनंतर बाळ उठते. जर 3-4 तासानंतरही बाळ उठत नसेल तर त्याला दुध पाजण्यासाठी उठवावे.
बाळाला दिवस-रात्र समजायला वेळ लागतो. जन्माच्या जवळपास 3 महिन्यांपर्यंत जास्त करून बाळ हे दिवसाला झोपतात आणि रात्री जागे राहतात. म्हणून यात जास्त चिंता करण्याची आवश्यकता नाही.
नवजात बाळाच्या अंथरुणावर कोणत्याही प्रकारची उशी अथवा इतर उंच वस्तू ठेवू नये. बाळाचे अंथरूण सपाट असावे. बाळाला एकाच कानीवर जास्त वेळ झोपू देऊ नये. काही वेळेच्या कालावधी त्याला उजव्या आणि डाव्या बाजूला करीत राहावे. बाळाचा रूमात हवा खेळती असावी. याशिवाय बाळाचा पंखा जास्त वेगाने फिरता नसावा.
तर मित्रहो हे होते बाळ गुटगुटीत होण्यासाठी उपाय व बाळाला बाळसे येण्यासाठी काय करावे आपणास बाळाची काळजी कशी घ्यावी याबद्दलची ही सोपी माहिती कशी वाटली आम्हास कमेन्ट करून नक्की सांगा. याशिवाय जर आपल्या बाळाच्या आरोग्यासंबंधी अधिक तक्रारी असतील तर डॉक्टरांशी संपर्क करा. धन्यवाद..