डोळ्यांची काळजी कशी घ्यावी आणि नजर वाढवण्यासाठी उपाय | Eye care tips in marathi

how to take care of eyes in marathi : डोळ्यांची काळजी कशी घ्यावी सुंदर जग पाहण्यासाठी डोळ्यांचे सुरक्षित असणे फार महत्त्वाचे आहे. डोळे शरीराचा महत्त्वपूर्ण आणि नाजूक अवयव आहेत म्हणून त्यांची काळजी घेणे फार आवश्यक आहे. परंतु बदलती लाइफ स्टाईल आणि दीर्घकाळ स्क्रीन कडे बघितल्याने आजची तरुण पिढी मध्ये डोळ्यांचे त्रास व डोळ्यात जळजळ होण्याची समस्या निर्माण होत आहे. आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय – eye care tips in marathi आणि डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याची माहिती घेऊन आलो आहोत.

डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय | how to take care of eyes in marathi
डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय

डोळ्यांची नजर कमी होण्याची कारणे

वाढत्या वयासोबत डोळ्यात बदल येऊ लागतात. ज्यामुळे हळूहळू दृष्टी कमजोर होऊ लागते. याशिवाय तरुण वयातील लोकांमध्ये अधिक काळापर्यंत मोबाईल, लॅपटॉप व टीव्ही स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांना त्रास होतो आणि डोळ्यांची नजर कमी होऊ लागते. परंतु जर आहारात पौष्टिक पदार्थ आणि योग्य जीवनशैली अवलंबली तर डोळ्यांची काळजी घेता येते आणि डोळ्यांची नजर कमी होण्याची समस्या देखील टाळता येते.

नजर कमी होण्याची लक्षणे

 • कोणतीही गोष्ट वाचताना अंधुक दिसणे व योग्य पद्धतीने वाचू न शकणे.
 • दूरच्या वस्तू पाहणे कठीण होणे.
 • डोळ्यात नेहमी दुखणे.
 • कमी प्रकाश आणि अंधुक दिसणे.
 • वाचतांना डोके दुखणे.
 • डोळ्यातून पाणी निघणे.
 • डोळ्यात सूज येणे डोळे लाल होणे.
 • डोळ्यात जळजळ आणि खाज येणे.

तर ही होती डोळ्यांची नजर कमी होण्याची कारणे व लक्षणे. आता आपण जाणून घेऊया की डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय कोणते आहेत व डोळ्यांची काळजी कशी घ्यावी.

डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय – eye care tips in marathi

 • गाजर आणि गाजरचा ज्यूस
  डोळ्यांची दृष्टी तेज करण्यासाठी (eye care tips in marathi) गाजर खूप उपयुक्त आहे. गाजर मध्ये बीटा कॅरोटीन असते. जे डोळ्यांच्या स्नायूंना मजबूत करते. गाजर शिवाय संत्री, लिंबू आणि इतर कट फळांमध्ये बीटा कॅरोटीन चे प्रमाण असते. म्हणून डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी गाजर व त्याच्या ज्युस सेवन करावा.
 • त्रिफला पावडर
  त्रिफला चे पावडर डोळ्यांची नजर वाढवण्यात खूप सहाय्यक आहे. डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी एक चमचा त्रिफला पावडर ला एक ग्लास पाण्यात टाकून रात्रभर पडू द्यावे. व दुसर्‍या दिवशी सकाळी या पाण्याला गाळून डोळ्यांवर मारावे. असे केल्याने एका महिन्यातच डोळ्यांची दृष्टी सुधारायला लागेल.
 • गरम हातांनी शेकणे
  आपल्या दोन्ही हातांना एकमेकांवर हिवाळ्यात जसे घासतात तसे घासावे. दोन्ही हात गरम झाल्यावर हळुवार दोन्ही डोळ्यांवर ठेवावे. ही एक्सरसाइज केल्याने तुम्ही डोळ्यांवर आराम देणारी उष्णता अनुभव कराल. हातांना तोपर्यंत डोळ्यावर ठेवा जोपर्यंत डोळे पूर्ण उष्णता शोषून घेत नाही. जेव्हा हि तुम्हाला डोळे जळजळ वाटतील तेव्हा हा उपाय 4-5 वेळा करावा.
 • बदाम, अंजीर आणि किशमिश चे मिश्रण
  6-7 बदाम, 2 अंजीर आणि 15 किशमिश घेऊन रात्रभर एक वाटी पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी उठल्याबरोबर खाली पोट हे बदाम, किशमिश आणि अंजीर खावेत. सुक्या मेव्यातील या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि व्हिटॅमिन असतात जे डोळ्यांचे आरोग्य सुधारतात.

अधिक वाचा >> डोळे लाल होण्याची कारणे व उपाय

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी
डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

नेहमी डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. या गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत-

 • डोळ्यांना दिवसातून दोन ते तीन वेळा थंड पाण्याने धुवा.
 • अभ्यास करताना किंवा काहीही वाचतांना पुरेश्या उजेळात वाचावे. अंधुक व कमी प्रकाशात अभ्यास केल्याने डोळ्यांवर ताण निर्माण होतो.
 • धूळ, प्रदूषण आणि उन्हापासून डोळ्यांचे संरक्षण करायला हवे. उन्हात बाहेर जाताना चांगली गुणवत्ता असलेले गॉगल वापरावे. तुम्ही अल्ट्रावायलेट रे प्रोटेक्शन ग्लास डोळ्यांवर वापरू शकतात.
 • दीर्घकाळापर्यंत कॉम्प्युटर तसेच पुस्तक वाचल्याने डोळ्यांवर नकारात्मक प्रभाव पडतो. म्हणून 20-20 मिनिटानंतर 10 मिनिटांच्या एक लहान ब्रेक घ्यावा. या वेळेत स्क्रीनवरून डोळे सरकवून दूरवर दृष्टी टाकावी व पापण्यांची उघडझाप करावी.
 • याशिवाय डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी योग्य आहार घ्यावा. तुमच्या आहारात विटामिन आणि मिनरल चा समावेश असायला हवा. गाजर, गहू, हिरव्या पालेभाज्या, डाळी, काजू बदाम, अक्रोड, अंजीर आणि सोयाबीन इत्यादींना आहारात सामील करावे.
 • डोळ्यांचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी दररोज सकाळी चप्पल न घालता गवतावर चालावे.

अल्ट्रावायलेट किरणांपासून संरक्षण करणारा चष्मा

डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय चश्मा
डोळ्यांची नजर कमी होणे

मित्रांनो जर आपण दीर्घकाळ कॉम्प्युटर व मोबाईल वर काम करत असाल. तर आपल्या डोळ्यांची नजर कमी होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून तुम्हाला काम करीत असताना नेहमी अल्ट्रावायलेट किरणांपासून संरक्षण करणारा चष्मा लावण्याची आवश्यकता आहे. Blue Cut lens म्हणून ओळखले जाणारे हे चष्मे स्क्रीनवरून डोळ्यांवर येणाऱ्या UV किरणांना फिल्टर करण्याचे कार्य करतात. ज्यामुळे तुमचे डोळे सुरक्षित राहतात. आपण जर दीर्घकाळ संगणकावर काम करीत असाल तर असा एक चश्मा घेणे तुमच्या डोळ्यांसाठी फार उपयोगी सिद्ध होईल. तुम्ही ब्ल्यु कट लेन्स ऑनलाइन खरेदी करू शकतात. खरेदी साठी येथे क्लिक करा.

डॉक्टरांकडे केव्हा जावे

जर तुम्हाला डोळ्यातून दिसणे फारच कमी झाले आहे तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण वर देण्यात आलेले घरगुती उपाय फक्त सामान्य समस्यांमध्ये उपयोगी आहेत. जर डोळ्यांची समस्या अधिकच वाढली असेल तर कोणताही उपाय करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Video for Eye Care Tips in Marathi

तर मित्रांनो ह्या लेखात आम्ही तुमच्यासोबत how to improve eyesight in marathi and eye care tips in marathi म्हणजेच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी. आम्ही आशा करतो की डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय आपणास उपयोगी ठरले असतील. आपणास ही माहिती कशी वाटली कमेन्ट करून नक्की सांगा आणि आपले प्रश्न देखील कमेन्ट मध्ये विचारा. धन्यवाद.

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *