उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय आणि योगासने | how to increase height in marathi

उंची वाढवण्यासाठी उपाय : स्त्री असो वा पुरुष प्रत्येकालाच उंच होण्याचा मोह असतो. शरीराची योग्य उंची व्यक्तीच्या सुंदर्तेत आणखी भर करीत असते. म्हणूनच मुलगा असो किंवा मुलगी प्रत्येकालाच चांगली उंची हवी असते.

परंतु अनेक तरुण-तरुणी उंची न वाढण्याच्या या समस्येने त्रस्त असतात. म्हणून आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी उंची वाढवण्याचे उपाय आणि आयुर्वेदिक उपचार आणि औषधांची माहिती घेऊन आलो आहोत. उंची कशी वाढवायची? हा जर आपला प्रश्न असेल तर या लेखातील unchi vadhavnyache upay एकदा नक्की करून पहा. तर चला सुरू करुया…

उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय | unchi vadhavnyache upay
उंची वाढवण्यासाठी उपाय

उंची किती वर्षापर्यंत वाढते

संशोधनातून सिद्ध झाले आहे की मुलांची उंची ही 25 वर्षापर्यंत वाढते, मुलींमध्ये शरीराची उंची ही 21 वर्षाच्या वयापर्यंत वाढते. या विशिष्ट वयानंतर शरीरातील ग्रोथ हार्मोन कमी होऊ लागतात आणि शरीराची वाढ थांबते. तर चला आता आपण जाणून घेवू उंची न वाढण्याची कारणे

उंची न वाढण्याची कारणे

आनुवंशिकता

वय वाढत असतानाही उंची न वाढण्याचे प्रमुख कारण आनुवंशिकता असू शकते. जर कुटुंबातील आई-वडील, आजी-आजोबा यापैकी कोणाचीही उंची कमी असेल तर त्यांचे जीन्स तुमच्यामध्येही प्रवेश करता आणि तुमच्या उंचीला बाधित करतात.

गैर आनुवंशिक कारणे

जर तुमच्या कुटुंबातील कोणालाही कमी उंचीची समस्या नसेल तर तुमच्या कमी उंचीसाठी पुढील कारणे कारणीभूत असू शकतात.

 • आहारात पौष्टिक भोजनाची कमतरता.
 • शारीरिक हालचाल व व्यायाम न करणे
 • उठता, बसता, चालता, फिरता योग्य पोस्चर न ठेवणे.
 • लहानपणी एखाद्या गंभीर रोगाने ग्रस्त होणे
 • आपल्या आजूबाजू पर्यावरणातील वातावरणही उंचीवर परिणाम करते.
 • मानसिक अस्वस्थता.
 • कमी वयातच जिम् मधील व्यायाम सुरू करणे.

वय वजन उंची तक्ता

वयानुसार मुले व मुलींचे वजन आणि उंची किती असायला हवे याबद्दल ची माहिती पुढील तकत्यात देण्यात आली आहे.

वय वजन उंची तक्ता unchi vadhavnyache upay

मित्रांनो योग्य वयात संतुलित आहार, व्यायाम आणि काही आयुर्वेदिक उपायांच्या मदतीने उंची वाढवता येऊ शकते. तर चला जाणून घेऊया उंची वाढवण्याचे उपाय.

उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय

आहार

उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय म्हटला म्हणजे ‘आहार’ अत्यंत महत्वाचा आहे. शरीराला निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार अत्यंत आवश्यक आहे. म्हणून उंची वाढवण्यासाठी आपल्या आहारात बदल करणे गरजेचे आहे. खास करून तरुण व लहान मुलांना आपला आहार सुधारण्याची आवश्यकता आहे. उंची वाढवण्यासाठी फास्ट फूड चे सेवन कमी करावे. संतुलित आणि पौष्टिक आहारात पुढील गोष्टींचा समावेश करावा

 • दूध
 • हिरव्या भाज्या
 • ताजी फळे
 • मटण अंडे
 • सोयाबीन
 • अंकुरित कडधान्य

झोप

झोप ही देखील आपल्या उंचीवर प्रभाव टाकत असते. झोपेच्या स्थितीत शरीराची वाढ अधिक जलद होऊ लागते. सोबतच शरीरातील टिशू नवीन तयार होऊ लागतात. म्हणून दररोज रात्री 8 ते 10 तासांची झोप घ्यायला हवी. झोप शांत वातावरणात घ्यावी व झोपा ना आता ताठ मान वर करून झोपावे. वाकून झोपल्याने शरीराची वाढ कमी होते.

उंची वाढवण्यासाठी व्यायाम

उंची वाढवण्यासाठी व्यायाम हा अत्यंत उपयुक्त आहे. व्यायामात रनिंग, स्ट्रेचिंग, खांबावर लटकने, सायकल चालवणे, एरोबिक्स, टेनिस, क्रिकेट, फुटबॉल व बास्केटबॉल या सारख्या खेळांचाही समावेश होतो.

याशिवाय पोहणे हा देखील सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. पोहताना शरीराच्या सर्व अवयवांचा वापर केला जातो. आणि यामुळे शरीरातील सर्व स्नायू बळकट होतात. म्हणून उंची वाढवण्यासाठी मुलांना लहानपणापासून पोहणे शिकवायला हवे.

उंची वाढवण्याचे पोश्चर

उंची वाढवण्याचे उपायांमध्ये शरीराच्या पोश्चरचे देखील महत्त्व असते. म्हणून मुलांना लहानपणापासूनच योग्य पोश्चरमध्ये बसणे, उठणे, चालणे, फिरणे शिकवायला हवे.

खुर्चीवर बसताना सरळ बसावे. तुमचे खांदे आणि चेहरा समोरच्या बाजूला असावा.
चालताना कधीही वाकून चालू नका. नेहमी कंबर आणि माकड हाड सर्व ठेवावे. जर हे आपण हे पोश्चर नेहमी फॉलो केले तर उंची वाढवण्यात खूप सहाय्य होते.
झोपताना नेहमी चांगल्या दर्जाचे, कमी जास्त उंची नसलेले, सपाट अंथरूण आणि उशी वापरावी. असे केल्याने तुमच्या शरीराचे पोश्चर बिघडणार नाही.

उंची वाढवण्यासाठी योगासन

आयुर्वेदात उंची वाढवण्यासाठी आणि शरीराचे पोश्चर सुधारण्यासाठी अनेक योगासन सांगितले आहेत. काही प्रमुख व उपयुक्त योगासन पुढील प्रमाणे आहेत.

उंची वाढवण्यासाठी योगासने सूर्यनमस्कार

1) सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार मध्ये अनेक व्यायाम केले जातात. ज्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि शरीरात नवचेतना निर्माण होते. उंची वाढवण्याची इच्छा असणाऱ्या तरुण तसेच प्रत्येक वर्गातील व्यक्तीने दररोज 5-10 वेळा सूर्यनमस्कार करायला हवा. सूर्य नमस्कार कसा करावा <<येथे क्लिक करून वाचा.

उंची वाढवण्यासाठी योगासने पश्चिमोत्तानासन

2) पश्चिमोत्तानासन

पोटाची चरबी कमी करण्यासोबतच हे आसन उंची वाढवण्यातही उपयोगी आहे. पश्चिमोत्तानासन केल्याने पोट, पाय आणि पाठीचे स्नायू ताणले जातात. हे आसन करण्यासाठी पाय समोर पसरवून बसावे. आता श्वास आत घेत शरीराला कमरेतून वाकून हातांनी पायांचे पंजे धरावे. या अवस्थेत काही काळ थांबावे व पुन्हा आपल्या पूर्वस्थितीत यावे.

उंची वाढवण्यासाठी योगासने भुजंगासन

3) भुजंगासन

उंची वाढवण्यासोबतच कंबर बारीक करण्यासाठी आणि खांदे चौडे करण्याकरिता भुजंगासन अत्यंत उपयुक्त आसन आहे. याला इंग्रजी भाषेत कोब्रा पोझ देखील म्हटले जाते. हे आसन करण्यासाठी पोटावर झोपा. आता दोन्ही हातांच्या साहाय्याने शरीराला कमरेपासून वर उचला आणि मानेला वर वळवून आकाशाकडे पहा. शक्य होईल तेवढा ताण देऊन या स्थितीत थांबावे. यानंतर पुन्हा आपल्या पूर्वस्थितीत यावे.

4) ताडासन

दोन्ही पायांमध्ये एक फूट अंतर ठेवावं. दोन्ही हात शरीरालगत असावे. शरीर ताठ असावे आणि शरीराचं वजन दोन्ही पायांवर समांतर असावे. आता हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर करावेत. वर नेल्यावर हातांची बोटं एकमेकांत गुंफवा. आता जेवढा हातांना स्ट्रेच देता येईल तितका द्यावा. नंतर दोन्ही पाय म्हणजेच टोजवर उभं राहावं. या आसनस्थितीत काही वेळ थांबावं. आसन सोडताना प्रथम हातांना रिलॅक्स करावं मग पाय खाली आणावेत. थोडा वेळ विश्रांती

उंची कशी वाढवायची & उंची वाढवण्याचे उपाय

प्रत्येक रोग आणि प्रत्येक समस्यासाठी काही न काही घरगुती उपाय असतातच. तर चला पाहूया उंची वाढवण्याचे घरगुती उपाय…

 • हरबऱ्याची काळी डाळ रात्रभर पाण्यात भिजत घालावी व सकाळी खाली पोट डाळीचे सेवन करावे. हा उपाय सतत एक महिना केल्याने शरीरातील प्रोटीन वाढतात.
 • एक ग्लास दुधात अर्धा चमचा हळद, दोन ते तीन थेंब शिलाजीत आणि अर्धा चमचा अश्वगंधा टाका. व दररोज रात्री झोपण्याआधी या दुधाचे सेवन करा. हा उपाय महिनाभर केल्याने शरीराला अनेक लाभ होतात.
 • रोज 6 ते 8 ग्लास पाणी प्यायला हवं. शरीरातले नको ते पदार्थ त्यानं बाहेर फेकले जातात.

तर मित्रहो हे होते काही उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय. आम्ही आशा करतो की वर सांगितलेले उपाय आपण नियमित कराल आणि आपल्या उंचीत बदल घडवून आणाल. तुम्हाला unchi vadhavnyache upay हे how to increase height in marathi माहिती कशी वाटली कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद…

अधिक माहिती वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *