पोट व संडास साफ होण्यासाठी घरगुती उपाय | how to clean stomach in marathi

संडास साफ होण्यासाठी उपाय : शरीरात होणाऱ्या अनेक गंभीर रोगांचे मुख्य कारण पोट साफ न होणे हेच आहे. बदलत्या जीवनशैलीतील ही समस्या सामान्य आहे आणि प्रत्येक वयोगटातील लोक या समस्येने त्रस्त आहेत. चुकीचे अन्न ग्रहण करणे, पाण्याची कमतरता, जेवणाची वेळ योग्य नसणे इत्यादी यामागील काही कारणे आहेत.

आजच्या लेखात आम्ही आपल्याला पोट व संडास साफ होण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. हे बद्धकोष्ठता घरगुती उपाय करून आपण आपले संपूर्ण पोट स्वच्छ करू शकता. तर चला सुरू करुया…

पोट संडास साफ होण्यासाठी घरगुती उपाय how to clean stomach in marathi

संडास साफ होण्यासाठी उपाय

1) मीठ आणि कोमट पाणी उपाय :

हा उपाय सकाळी उठल्यावर जेव्हा तुमचे पोट खाली असेल तेव्हा काहीही न खाता पिता करायचा आहे.
उपाय

 • सर्वात आधी एक पेलाभर कोमट पाणी घ्यावे.
 • या पाण्यात 1 चमचा मीठ टाकावे.
 • चमच्याच्या मदतीने संपूर्ण मिठ पाण्यात विरघळून घ्यावे.
 • यानंतर मिठ मिसळलेले हे पाणी प्यावे.
 • अधिक चांगला निकाल हवा असल्यास आपण एकाच्या या जागी दोन ग्लास पाणी पिऊ शकता.

समुद्राचे मीठ पोट साफ करण्यासाठी अत्यंत उपयोगी असते. यावर केलेल्या एका शोधानुसार गरम पाण्यात मीठ घेतल्याने आतड्यांची चांगली स्वच्छता होते व शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर टाकले जातात आणि संडास साफ होते.

2) कोमट पाणी

दररोज सकाळी खाली पोट एक ग्लास अथवा एक तांब्या कोमट पाणी प्यावे. दररोज केलेले कोमट पाण्याचे सेवन पोट स्वच्छ करण्यात सहाय्यक असते. यावर केलेल्या एका शोधानुसार गरम पाणी शरीरातील विषारी पदार्थ नष्ट करून पचनशक्ती वाढवते.

3) मध आणि लिंबू

उपाय

 • एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा लिंबू चा रस मिक्स करा.
 • लिंबू आणि गरम पाण्याच्या या मिश्रणात मीठ आणि मध टाकावे.
 • दररोज सकाळी हे पाणी प्यावे.

लिंबू मध्ये अनेक प्रकारचे औषधी गुण असतात, जे पोटाला साफ करण्यासाठी सहाय्यक सिद्ध होतात. शोधानुसार लक्षात आले आहे की लिंबू मध्ये आढळणारे ऍसिड पोटातील मळ साफ करते आणि विटामिन सी वाढवते. मध शरीरातील बॅक्टेरियल संतुलन निर्माण करते ज्यामुळे अन्नाचे पचन वाढते.

4) ओवा

सामुग्री

 • एक चमचा ओव्याचे पावडर
 • एक चमचा जिऱ्याचे पावडर
 • अर्धा चमचा अद्रक पावडर

उपाय

 • वर दिलेली सर्व सामग्री एकत्रित मिक्स करावी.
 • रोज सकाळ संध्याकाळ हे मिश्रण हलक्या गरम पाण्यात प्यावे.
 • जर वाटले तर आपण जेवणानंतर काही प्रमाणात ओवा डायरेक्ट खाऊ शकता.

हा उपाय केल्याने पोटाची समस्या आणि पोटातील जंतू नष्ट होतात. आतड्यांमध्ये असलेले प्यारासाइट्स बाहेर निघतात व पचन क्रिया वाढते. म्हणून पचन क्षमता वाढवण्यासाठी हा उपाय अत्यंत उपयोगी आहे.

5) एरंडेल तेल

सामुग्री

 • अर्धा चमचा एरंडेल तेल
 • अर्धा चमचा लिंबूचा रस

उपाय

 • एरंडेल तेल व लिंबू रस एकत्रित करावे.
 • आणि रोज सकाळ संध्याकाळ हे मिश्रण प्यावे.
 • लक्षात असू द्या एकावेळी एक चमचा पेक्षा जास्त पिऊ नये. अन्यथा जास्त संडास होऊ लागतील.

एरंडेल तेल पोट साफ करण्यासाठी फार फार गुणकारी आहे. एरंडेल तेलात लैक्सेटिव गुणधर्म असतात, जे पोटातील मळ काढण्यात सहाय्यक असतात. याशिवाय आतड्यांमध्ये विषारी पदार्थांना देखील ते नष्ट करते. आपण दरोराज रात्री एक चमचा एरंडेल तेल पिऊ शकतात. चांगल्या दर्जाचे एरंडेल तेल खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा> डाबर एरंडेल तेल

मित्रांनो, पोट साफ न होणे अनेक गंभीर लोकांची कारण बनू शकते. आम्हास खात्री आहे की वरीलपैकी कोणताही एक उपाय करून आपले पोट आणि संडास नक्कीच स्वच्छ होईल. वर देण्यात आलेले हे उपाय संडास साफ होण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. याशिवाय जर हे उपाय करूनही संडास साफ होण्याची समस्या दूर होत नसेल. तर एकदा डॉक्टरांशी संपर्क नक्की करा. धन्यवाद…

अधिक वाचा :

8 thoughts on “पोट व संडास साफ होण्यासाठी घरगुती उपाय | how to clean stomach in marathi”

 1. Arjun Vitthalrao Tamhane

  सकाळी गरम पाण्याबरोबर एक चमचा मीठ पोट साफ होण्यासाठी . हा उपाय मी दररोज करत आहे .त्याचे साईड इफेक्ट काय आहे का?

  1. अति जास्त प्रमाणात मीठ पानी प्यायल्याने उच्च रक्तदाबाची समस्या होऊ शकते. म्हणून एक ते दोन दिवसाआड अथवा शक्य होईल तर आठवड्यातून एकदाच मीठ पाण्याचा हा प्रयोग करावा. याशिवाय इतर काही साइड इफेक्ट नाही आहेत.

  1. पोस्ट मध्ये सांगितलेले उपाय नियमित करा. मिठाचे पाणी पिणे आणि एरंडेल तेल चे सेवन हे पोट साफ होण्यासाठी फार प्रभावी आहेत.

 2. Vishnu Lokhande.

  मला सारखं संडासला जावं लागते. नास्ता, जेवून व फळ खाल्ले कि तास अर्ध्या तासात संडास लागते. त्यात मला मुलव्याधी पण आहे. सद्ध्या अलोपथीची ट्रिटमेंट सुरु आहे. रक्त चेक केले हिमोग्लोबीन फक्त ८ आहे. संडासात रक्त जाते तसेच मुलव्याधीचा त्रास आहेच. कृपया मदत करा. आपला आभारी राहील.

 3. प्रफुल कामडी

  5 वर्षाच्या मुला करीता हा एरंडेल तेल पाजण्याचा उपाय चालेल का त्याच्या आतड्यात सुजन किंवा काहीं अडकल्यासारखे सोनोग्राफी त दिसत आहे कृपया1 सांगा

  1. नाही, गंभीर रोग असणाऱ्यांना व लहान मुलांना एरंडेल तेल पाजण्याआधी डॉक्टरांची सल्ला घ्यावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *