लहान बाळांमध्ये सर्दी-खोकला सामान्यतः संक्रमणामुळे होतो. 6 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या लहान बाळाला कफ झाल्यास उपाय डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी न घेण्याची सल्ला दिली जाते. म्हणूनच या वयोगटातील लहान मुलांना सर्दी खोकला झाल्यावर आई-वडील घरगुती उपायांनी त्यांचा सर्दी खोकला दूर करण्याचा प्रयत्न करतात. आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी लहान मुलांना सर्दी खोकला होणे या वरील घरगुती उपाय व लहान बाळाला कफ झाल्यास उपाय घेऊन आलो आहोत. हे उपाय करून तुम्ही बाळाचा सामान्य सर्दी खोकला काही हद्दीपर्यंत नियंत्रणात आणू शकतात.
Table of Contents
लहान बाळांमध्ये सर्दी खोकला होण्याचे कारण
वातावरणातील बदलामुळे अनेक लोक सर्दी खोकल्याचे शिकार होतात. यामागील प्रमुख कारण त्यांची कमी रोगप्रतिकारक क्षमता असते. रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी <<वाचा येथे.
लहान मुलांमध्ये सर्दी खोकला चे संक्रमण व्हायरसमुळे होऊ शकते. यामुळे बाळाला नाक बंद होणे, नाक वाहने, श्वास घेण्यास त्रास होणे आणि अस्वस्थ वाटणे इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते होते. सर्दी खोकला झालेला बाळ जेवण व्यवस्थित करत नाही. त्याला डोकेदुखी व शरीरात थकवा जाणवतो. कधीकधी सर्दी खोकला एक ते दोन आठवडे राहू शकतो. म्हणूनच बाळाला अधिक त्रास होऊ नये यासाठी लवकर इलाज करणे आवश्यक आहे.
लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय
लहान बाळाला सर्दी खोकला व कफ झाल्यास उपाय पुढील प्रमाणे आहेत.
लसूण आणि ओवा ची पुडी
लसूण आणि ओवा सर्दी खोकल्यासाठी शक्तिशाली इलाज आहे. यांच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटिव्हायरल गुणधर्म असतात. हे मिश्रण लहान मुलांच्या सर्दी खोकल्यासाठी देखील उपयोगी आहे.
यासाठी लसणाच्या 2 पाकळ्या आणि 1 चमचा ओवा घेऊन त्यांना तव्यावर भाजून घ्यावे. थंड झाल्यावर भाजलेले लसुन आणि ओवा एका कपड्यात बांधून घ्याव्यात. यानंतर ही पुडी बाळाच्या पाळण्यात त्याच्या नाकाजवळ ठेवावी. जेणेकरून ओवा आणि लसुन ची सुगंध बाळाच्या नाकाद्वारे आत जाईल. ह्या उपायाने बाळाची सर्दी नक्कीच कमी होईल.
मधाचे सेवन
मध मध्ये एंटीऑक्सीडेंट आणि एंटीअमायक्रोबियल गुणधर्म असतात. लहान बाळांसाठी सर्दी खोकल्यात मध अत्यंत गुणकारी औषध आहे. ज्या बाळांना गळ्यात खसखस आणि नाकात सर्दी सारखे वाटत असेल त्यांना रात्री एक चमचा मध मध्ये थोडासा अद्रक चा रस टाकून पिण्यास द्यावे. हा उपाय फक्त एक वर्षाच्या वरील बाळांसाठी आहे.
बाळाला हाइड्रेटेड ठेवा
सर्दी खोकला झाल्यावर शरीरात पाण्याची कमी होते म्हणून बाळाला हाइड्रेटेड ठेवण्यासाठी थोड्या थोड्या वेळात पाणी पाजत राहा. सर्दी खोकला झालेल्या बाळाला कोमट पाणी पाजावे.कोमट पाणी पिल्याने त्याच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यात मदत मिळेल.
बाळाला वाफ द्यावी
छातीत कफ आणि सर्दी खोकला झाल्यावर वाफ घेतल्याने खूप आराम मिळतो. लहान मुलांना देखील ही समस्या होत असेल तर एका भांड्यात पाणी गरम करावे व त्या पाण्याच्या वाफे जवळ बाळाला धरून बसावे. त्याच्या छातीला आणि नाकावर हलकी हलकी स्टीम (वाफ) लागू द्यावी. असे केल्याने बाळाच्या छातीतील कफ मोकळे होतील व त्याला आराम मिळेल. जर तुमच्याकडे vaporizer मशीन असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकतात. ऑनलाइन vaporizer खरेदीसाठी येथे क्लिक करा
मित्रांनो हे होते बाळाला सर्दी खोकला झाल्यावर करण्याचे घरगुती उपाय. आता आपण पाहूया बाळाला सर्दी-खोकला होऊ नये व त्याला सर्दी खोकल्यापासून वाचवण्याचे उपाय.
बाळाला सर्दी खोकला पासून वाचण्याचे उपाय
जर तुम्हाला आपल्या बाळाला सर्दी खोकला पासून सुरक्षित ठेवायचे तर पुढील उपाय करावेत.
- सर्दी खोकला झालेल्या बाळाला भरपूर झोप घेऊ द्यावे. जास्त वेळ झोपल्याने त्याची रोग प्रतिरोधक क्षमता वाढते आणि संक्रमणाची लढण्याची शक्ती मिळते.
- बाळाला सर्दी खोकला झाल्यावर आपल्या मनानुसार औषधी देऊ नये. कारण मोठ्या लोकांच्या आणि लहान बाळांच्या औषधी वेगवेगळ्या असतात. म्हणून कोणते औषध बाळाला देण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
- सर्दी खोकला मध्ये चिकन सूप खूप लाभदायक असते. म्हणून जर तुम्ही सर्दी खोकला पीडित बाळाला चिकन सूप पाजाल तर त्याच्या आरोग्यात लवकर सुधारणा होईल.
- रोगा दरम्यान बाळाला हाइड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. म्हणून त्याला कोमट पाणी पाजत राहावे.
- जर बाळ एक वर्षापेक्षा मोठे असेल तर त्याला तुळशी आणि अद्रक ची चहा पाजावी.
- जर वातावरणात बदल होत असेल व थंडी वाढत असेल तर बाळाला जाड कपडे घालावेत व त्याचे संपूर्ण शरीर झाकलेले राहील याची काळजी घ्यावी.
- मुलांना थंड हवेत बाहेर घेऊन जाऊ नये.
- बाळाला हात लावण्याआधी नियमितपणे हात स्वच्छ धुवावेत.
डॉक्टरांकडे केव्हा जावे
जर तुम्हाला बाळामध्ये पुढील लक्षणे दिसत असतील तर वेळ वाया न घालवता तात्काळ डॉक्टरकडे जावे व योग्य उपचार घ्यावा.
- बाळाचा सर्दी खोकला तीन दिवसांपेक्षा जास्त असेल तर.
- त्याला श्वास घेण्यात परेशानी होत असेल तर.
- सर्दी खोकला सोबत ताप देखील वाढत असेल तर.
- पुन्हा पुन्हा रडणे व चिडचिड करणे सुरू असेल तर.
- बाळाच्या शिंकल्या नंतर तोंडातून पिवळा, हिरवा किंवा भुऱ्या रंगाच्या पदार्थ बाहेर येत असेल तर.
- जर बाळाला उलटी होत असेल तर
- जर बाळाचे ओठ निळे पडले असतील तर
- कानात देखील दुखत असेल तर
तर मित्रांनो ह्या लेखात आपण लहान बाळाला सर्दी घरगुती उपाय व लहान बाळाला कफ झाल्यास उपाय देण्यात आले आहेत. आशा करतो की हे उपाय आपणास उपयोगी ठरले असतील व आपल्या बाळाची सर्दी नियंत्रणात आण्यासाठी आपण हे उपाय नक्की करून पाहणार. मित्रांनो सर्दी ही कोणाला पण होऊ शकते म्हणून जर तुम्हाला देखील सर्दीची समस्या असले तर सर्दीवर घरगुती उपाय <येथे वाचा. धन्यवाद..
Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा