ग्राईप वॉटर चे फायदे व उपयोग मराठी | gripe water for baby uses in marathi

This article contains gripe water uses in marathi and how to use gripe water for baby in marathi. here are also mentioned some brands like woodwards / pinku gripe water uses in marathi.

लहान बाळ खूप नाजूक असतात. बऱ्याचदा कोणतेही स्पष्ट कारण नसताना ते रडायला सुरुवात करतात. जास्त रडल्याने त्यांचा स्वभाव चिडचिडे होऊ लागतो व प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीवर ते रडणे सुरू करतात. अशावेळी जर बाळ रडायला लागले तर आई वडील त्याला ग्राईप वॉटर देतात. परंतु बऱ्याच लोकांना माहीत नसते की ग्राईप वॉटर काय आहे? व याचे बाळासाठी फायदे होतात की नुकसान? म्हणूनच ‘माझी काळजी’ च्या आजच्या या लेखात आम्ही आपल्याला ग्राईप वॉटर विषयी योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ग्राईप वॉटर काय आहे ? Gripe water in marathi

ग्राईप वॉटर एक पेय पदार्थ आहे. ज्यामध्ये बडिशोप, ज्येष्ठमध, इलायची, अद्रक, लिंबू, शुद्ध पाणी आणि ग्लिसरीन सारखे पदार्थ वापरले जातात. ग्राईप वॉटर लहान मुलांना होणारी गॅस, अपचन, उचक्या, दात बाहेर येतानाचे दुखणे इत्यादी समस्यांमध्ये आराम देते. वैज्ञानिक शोधातून सिद्ध झाले आहे की लहान बाळांना ग्राईप वॉटर पाजणे योग्य आहे. परंतु कोणतेही ग्राईप वॉटर बाळाला देण्याआधी त्यामध्ये असलेले सर्व पदार्थ व्यवस्थित वाचावेत. याशिवाय लहान बाळांच्या डॉक्टरांना योग्य कंपनीचे ग्राईप वॉटर कोणते आहे याबद्दल विचारूनच त्याचा वापर करावा. असे केल्याने भविष्यात होणारी कोणतीही जोखीम टाळता येईल.

ग्राईप वॉटर चे फायदे – gripe water benefits in marathi

जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संतुलित प्रमाणात ग्राइप वाटर चा उपयोग केला गेला, तर लहान बाळासाठी हे अत्यंत फायदेशीर सिद्ध होईल. पुढे आपणास ग्राइप वाटर चे काही फायदे देत आहोत.

  • ग्राईप वॉटर बाळांना होणाऱ्या पोटदुखी, अपचन, गॅस, उचकी इत्यादी समस्यांना दूर करते. या समस्या झाल्यावर बाळ दीर्घकाळापर्यंत रडत असते. परंतु ग्राईप वॉटर दिल्यावर त्याचे हे दुखणे काही हद्दीपर्यंत नियंत्रणात येते. परंतु कोणतेही ग्राईप वॉटर डॉक्टरांना विचारल्यावरच बाळाला पाजावे.
  • जेव्हा बाळाला नवीन दात येऊ लागतात तेव्हा त्याच्या हिरड्यांमध्ये दुखायला लागते. यादरम्यान होणाऱ्या दुखण्याच्या समस्येला कमी करण्याकरिता लहान बाळाला ग्राइप वाटर पाजणे उपयुक्त ठरते.
  • लहान बाळांना ग्राइप वाटर पाजल्याने त्यांचे पचन सुधारते. व बाळाचा सर्वांगीण विकास होतो.

बाळ गुटगुटीत होण्यासाठी काय करावे <<वाचा येथे

gripe water uses in marathi – लहान बाळांना ग्राइप वाटर केव्हा द्यायला हवे?

ग्राइप वाटर बनवणाऱ्या कंपनीनुसार याला एक आठवड्यापेक्षा मोठ्या असलेल्या बाळाला देणे सुरू केले जाऊ शकते. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक महिन्यापेक्षा लहान असलेल्या बाळाला ग्राइप वाटर देणे टाळावे. कारण एवढ्या लहान बाळाचे पचन तंत्र अजून विकसित झालेले नसते व ते अत्यंत संवेदनशील असते म्हणून असेही मानले जाते की सहा महिन्यांपर्यंत बाळाला फक्त आईचे दूध द्यावे. सहा महिन्यानंतरच ग्राईप वॉटर व इतर सप्लीमेंट्स देणे सुरू करावे.

जेव्हा बाळाचे सारखे रडणे सुरु असेल व त्याला अपचन, चिडचिडेपण आणि पोटाच्या समस्या होत असतील तेव्हा ग्राइप वॉटर दिले जाऊ शकते. तुम्ही एक चमचा अथवा ड्रॉपर च्या मदतीने बाळाला ग्राइप वॉटर पाजू शकतात. बाजारात अनेक ब्रँडेड ग्राईप वॉटर उपलब्ध आहेत. यांच्या पॅकेट व बाटलीवर बाळाला किती प्रमाणात ग्राईप वॉटर द्यायचे आहे याबद्दलची माहिती लिहिलेली असते. ग्राईप वॉटर चा वापर करण्याआधी ही माहिती व्यवस्थित वाचावी.

सामान्य स्थितीत ग्राईप वॉटर दिवसातून अनेक वेळा दिले जाऊ शकते. परंतु कधीकधी काही ब्रांड याला दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा वापरण्याची सल्ला देतात. अशा परिस्थितीत आपल्या डॉक्टरांशी एकदा संपर्क करून योग्य सल्ला घ्यावा. याशिवाय अनेक ग्राईप वॉटर कंपन्या ग्राईप वॉटर ला पावडर वाल्या दुधासोबत न देण्याची सल्ला देतात. कारण बऱ्याचदा पावडर वाल्या दुधात ग्राईप वॉटर टाकल्याने याची रिॲक्शन होऊ शकते.

ग्राईप वॉटर खरेदी करण्याआधी त्याची expiry date (समाप्ती मुदत) अवश्य चेक करावी. यासोबतच त्यात असलेली सामग्री देखील एकदा वाचावी.

ग्राइप वॉटर चे नुकसान – gripe water side effects, disadvantages in marathi

बाळाला ग्राइप वाटर पाजण्याचे फायदे आणि नुकसान दोन्ही आहेत. जर याचा संतुलित व योग्य पद्धतीने उपयोग केला तर हे बाळासाठी अत्यंत उपयोगी ठरेल. परंतु गरजेपेक्षा जास्त उपयोग केल्यास ग्राईप वॉटर चे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. ग्राईप वॉटर चे बाळावर होणारे नुकसान पुढील प्रमाणे आहेत.

  • ओठ आणि जिभेत सुजन
  • शरीरावर खाज
  • डोळ्यातून पाणी येणे
  • उलटी होणे
  • श्वास घेण्यात परेशानी होणे
  • सुजन
  • एलर्जी व बॅक्टेरिअल इन्फेक्शन

ग्राईप वॉटर साठी इतर पर्याय

अनेक विशेषज्ञ बाळाला ग्राइप वाटर देणे योग्य मानत नाहीत. जर आपणही बाळाला ग्राइप वाटर देऊ नये अश्या विचारात असाल तर आम्ही आपल्याला पुढे ग्राईप वॉटर चे काही इतर पर्याय देत आहोत. जर आपण हे उपाय केले तर आपल्या बाळाला ग्राइप वाटर पाजण्याची आवश्यकता राहणार नाही.

  • जर बाळाच्या पोटात दुखत असेल व गॅस झाली असेल तर त्याच्या पोटावर हलकी मालिश करावी. तुम्ही गोलाकार पद्धतीने त्याचे पोट मसाज करू शकतात.
  • बाळाला पुरेसे पांघरूण ठेवावे.
  • बाळाला स्तनपान करणाऱ्या आईच्या आहारात खाद्य पदार्थ जसे मसालेदार भोजन, डेअरी मधून आणलेले पदार्थ आणि इतर भाज्या सामील करू नयेत.
  • बाळाला कमीत कमी सहा महिने आईचे दूध पाजावे.
  • दूध पाजल्यानंतर बाळाच्या पाठीवर हलक्या हाताने थापडून ढेकर घ्यायला विसरू नये.

ह्या लेखात आपण ग्राईप वॉटर चे फायदे व gripe water uses in marathi आणि ग्राईप वॉटर ची सर्व माहिती मिळवली. आम्ही आशा करतो की ही माहिती आपणास उपयोगी ठरली असेल. ह्या माहितीला आवश्यकता असणाऱ्या सर्वासोबत शेअर करा व जर आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेन्ट करून विचारा. धन्यवाद..

READ MORE :

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

1 thought on “ग्राईप वॉटर चे फायदे व उपयोग मराठी | gripe water for baby uses in marathi”

  1. Sanika rajendra bhosale

    बाळ 2.15 महिन्याच आहे जास्त रडत किर किर करत. गॅस आहे तर बाळाला ग्राईप वॉटर देणं योग्य आहे का

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *