च्यवनप्राश खाण्याचे फायदे आणि माहिती | Chyawanprash Benefits in Marathi

chyawanprash benefits in marathi व च्यवनप्राश चे फायदे : अनेक जडीबुटी एकत्रित करून बनवण्यात आलेले च्यवनप्राश एक आयुर्वेदिक उत्पादन आहे. सर्दी खोकला पासून वाचण्यासाठी आणि रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्यासाठी च्यवनप्राश खाण्याचा सल्ला दिला जातो. एका च्यवनप्राशला बनवण्यासाठी 40 ते 50 घटकांना एकत्रित केले जाते. आजच्या या लेखात आपण च्यवनप्राश खाण्याचे फायदे आणि उत्तम च्यवनप्राश कोणते आहे याबद्दल माहिती मिळवणार आहोत तर चला सुरू करुया…

chyawanprash benefits in marathi | च्यवनप्राश खाण्याचे फायदे आणि माहिती
chyawanprash benefits in marathi

च्यवनप्राश चा इतिहास

असे म्हटले जाते की च्यवनप्राश चा सर्वात आधी शोध च्यवन नावाच्या एका ऋषींनी लावला होता. परंतु अजून एका प्राचीन कथेनुसर्त सांगितले जाते की चवनप्राश चा शोध अश्विनीकुमार यांनी च्यवन ऋषिंसाठी केला होता. जेव्हा च्यवन ऋषी अत्यंत वृद्ध झाले तेव्हा अश्विनीकुमार यांनी त्यांना पुन्हा यौवन प्राप्त करण्यासाठी च्यवनप्राश हे औषध बनवले. च्यवन ऋषी यांनी पहिल्यांदा या औषधाचा वापर केल्याने याचे नाव “च्यवनप्राश” ठेवण्यात आले.

च्यवनप्राश मधील सामुग्री

तसे पाहता वेगवेगळ्या कंपनीच्या च्यवनप्राश मध्ये वेगवेगळे पदार्थ वापरले जातात. एका च्यवनप्राश मध्ये जवळपास 50 प्रकारचे वेगवेगळे पदार्थ वापर केले जातात. यामधील काही सामग्री पुढील प्रमाणे आहे-

 1. आवळा
 2. अडुळसा
 3. तुळशी
 4. अश्वगंधा
 5. निंब
 6. केसर
 7. घी
 8. मध
 9. लवंग
 10. इलायची
 11. बेल
 12. कलमी
 13. पिंपळपान
 14. द्राक्ष
 15. तेज पत्ता
 16. हळद
 17. नाग केसर
 18. शतावरी
 19. तिळाचे तेल

च्यवनप्राश खाण्याचे फायदे | chyawanprash benefits in marathi

 • रोग प्रतिरोधक क्षमता वाढवते
  च्यवनप्राश एक आयुर्वेदिक स्वास्थ्यवर्धक टॉनिक आहे जे आरोग्यात सुधार करण्यासोबतच रोग प्रतिरोधक क्षमता वाढवते. ऋषी चरक यांच्यानुसार च्यवनप्राश एक संपूर्ण स्वास्थ्य सप्लीमेंट आहे जे रोगांना दूर ठेवते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवते.

 • हृदयाचे स्वास्थ
  च्यवनप्राश खाल्ल्याने होणार्या फायद्यामध्ये हृदयाचे स्वास्थ देखील समाविष्ट आहे. एन सी बी आय द्वारे करण्यात आलेल्या एका शोधानुसार च्यवनप्राश हृदयाच्या नसांना मजबूत करते आणि हृदयातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवते. याशिवाय हृदयाची होत असलेली धडधड देखील नियंत्रणात ठेवण्याचे कार्य च्यवनप्राश करीत असते.

 • पचन सुधारते
  नियमित च्यवनप्राश चे सेवन केल्याने पचनशक्ती सुधारते. चवनप्राश खाल्ल्याने अन्न व्यवस्थित पचते आणि मलत्याग द्वारे नियमित पोट साफ होते. नागकेसर, तेजपत्ता, दालचिनी यासारख्या जडीबुटी पचन सुधारतात आणि कब्ज च्या समस्येपासून मुक्ति देतात. संडास साफ होण्यासाठी उपाय <<येथे वाचा

 • मेंदूसाठी च्यवनप्राश चे उपयोग
  chyawanprash in marathi च्यवनप्राश शारीरिक स्वास्थ्य सोबतच मानसिक स्वास्थ्य देखील सुधारते. याच्या नियमित उपयोगाने मानसिक क्षमता वाढते. अनिद्रा, स्मरणशक्तीची कमतरता, पागल पण, अल्जाइमर आणि मेंदू संबंधी रोगांमध्ये च्यवनप्राश उपयोगी आहे. च्यवनप्राश मध्ये एंटीऑक्सीडेंट असतात जे कमी होत असलेल्या स्मरणशक्तीला वाढवतात आणि मेंदूतील पेशींना पोषण प्रदान करतात.

 • श्वसन संबंधी रोगांमध्ये च्यवनप्राश आहे उपयोगी
  श्वसन म्हणजेच श्वासाश्वासा संबंधित परेशानी खास करून म्हाताऱ्या लोकांमध्ये होते. अश्या लोकांना नियमित च्यवनप्राश खाण्याचा सल्ला दिला जातो. यात असलेली पिंपळपान जडीबुटी श्वसन संक्रमणापासून वाचवते. ज्या लोकांना श्वास संबंधी विकार असतात त्यांना हलक्या कोमट पाण्यात चवनप्राश खाण्याची सल्ला दिली जाते. सोबतच दूध आणि दही चे सेवन बंद करण्याचा सल्लाही दिला जातो.

 • हाडांना मजबूत करते
  च्यवनप्राश खाण्याच्या फायद्यांमध्ये हाडांना मजबूत करणे देखील समाविष्ट आहे. याचे नियमित सेवन केल्याने हाडांमधील कॅल्शियम आणि प्रोटीन वाढवण्यात मदत मिळते. ज्या लोकांना हाडांसंबंधी विकार असतील त्यांना दुधासोबत चवनप्राश खाण्याची सल्ला दिली जाते.

 • त्वचेला बनवते चमकदार
  चवनप्राश खाण्याचा फायद्यामध्ये त्वचेचे आरोग्य देखील समाविष्ट आहे. बदलता ऋतु आणि वाढते प्रदूषण, धूळ, माती इत्यादी कारणांमुळे शरीराची त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसाया लागते. शोधानुसार च्यवनप्राश चे सेवन केल्याने चेहरा उजळून निघतो. याशिवाय कमी वयात चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या देखील घालवण्यात च्यवनप्राश उपयोगी आहे. चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय <<येथे वाचा

च्यवनप्राश कसे खावे / सेवन करावे

मित्रांनो च्यवनप्राश खाण्याचे फायदे तर आपण पाहिले आता आपण जाणून घेऊया की चवनप्राश खाण्याची योग्य पद्धत कशी आहे.

 • च्यवनप्राश सकाळी खाली पोट खायला हवे.
 • दिवसातून एक वेळा च्यवनप्राश चे सेवन पर्याप्त आहे.
 • च्यवनप्राश चे सेवन दुधासोबत हि केले जाऊ शकते.
 • च्यवनप्राश खाल्ल्यावर लगेच मसालेदार आणि खट्टे पदार्थ खाऊ नये.
 • कोमट पाण्या सोबतही च्यवनप्राश खाल्ले जाऊ शकते.
 • च्यवनप्राश ला पोळीवर लावूनही खाल्ले जाऊ शकते.
 • 1 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या बाळाला च्यवनप्राश देऊ नये.
 • 1 ते 5 वर्षे वय असणाऱ्या मुलांना 2.5 ते 5 ग्राम पर्यंत म्हणजेच अर्धा चमचा च्यवनप्राश दिले जाऊ शकते.
 • 6 ते 12 वयोगटातील मुलांना एक चमचा च्यवनप्राश पुरेसे आहे.
 • 12 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना 1 ते 2 चमचे च्यवनप्राश दिवसातून एकदा दिले जाऊ शकते.
 • गरोदर असणाऱ्या महिलांना अर्धा चमचा च्यवनप्राश पुरेसे असते.

डाबर च्यवनप्राश खाण्याचे फायदे | dabur chyawanprash benefits in marathi

dabur chyawanprash benefits in marathi
dabur chyawanprash benefits in marathi

च्यवनप्राश खाण्याचे अनेक फायदे आहेत. म्हणून कुटुंबातील प्रत्येक सदस्याने नियमित एक चमचा च्यवनप्राश सेवन करायला हवे. आपल्या देशात बनणारे जूने आणि सर्वात चांगले च्यवनप्राश डाबर चे आहे. डाबर चे एक किलो च्यवनप्राश ऑनलाइन 280 रुपयात उपलब्ध आहे. 1 KG डाबर च्यवनप्राश>> येथे खरेदी करा

तर मित्रहो हे होते chyawanprash benefits in marathi आशा आहे की च्यवनप्राश खाण्याचे फायदे व च्यवनप्राश विषयीची ही माहिती आपणास उपयोगी ठरली असेल. ह्या महितीला आपल्या कुटुंबियांसोबतही शेअर करा. धन्यवाद…

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

1 thought on “च्यवनप्राश खाण्याचे फायदे आणि माहिती | Chyawanprash Benefits in Marathi”

 1. Kiran Patange

  मूळव्याधावर आयुर्वेदिक उपाय सांगा…. त्रास खूप होतो

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *