चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय | beauty tips & skin glow tips in marathi

चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय : Glowing skin tips in marathi : प्रत्येकालाच सुंदर आणि नितळ त्वचा हवीहवीशी वाटते. परंतु त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी तिची योग्यप्रकारे देखभाल करणे आवश्यक असते. योग्य काळजी न घेतल्यास वेगवेगळ्या त्वचेसंबंधित समस्या निर्माण होतात. म्हणून skin glow tips in marathi बद्दलची माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.

आजच्या या लेखात आम्ही आपल्याकरिता काही चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय – Beauty tips in marathi आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.

चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय

ग्लोविंग स्कीनसाठी उपाय | Glowing skin tips in marathi

चेहऱ्यावर नितळ सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्या दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे. पुरुष असो वा स्त्री दोन्हीही जर पुढील उपाय (beauty tips in marathi) नियमितपणे आपल्या दिनचर्येत सामील केले तर त्यांना सुंदर त्वचेचे लाभ नक्की होतील.

 1. पुरेशी झोप घ्या
  दिवसभर काम करून रात्री दीर्घ काळापर्यंत जागे राहिल्याने डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होऊ लागतात. यासोबतच याचे विपरीत परिणाम शरीर आणि त्वचेवर पडतात. म्हणून रात्री उशिरापर्यंत जागे राहणे टाळावे आणि रात्रीच्या वेळी मोबाईल चा वापरही करू नये. एका वयस्क शरीराला कमीत कमी 8 तासांची गाढ झोप आवश्यक असते.

  जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा स्किन सेल्स बूस्ट होतात. परंतु जर आपण पुरेशी झोपच घेत नसाल तर ही बुस्टिंग ची प्रक्रिया मंदावते परिणामी शरीर आणि चेहरा थकलेला व अस्वस्थ दिसू लागतो. म्हणून दररोज रात्री पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. रात्री लवकर झोप येण्याचे उपाय <<वाचा येथे.

 2. भरपूर पाणी प्यावे
  अनेक लोक पाणी पिण्यास दुर्लक्ष करतात. ज्यामुळे त्यांच्या शरीराला पुरेसे पाणी मिळत नाही. पाणी शरीरात असलेली गंदगी स्वच्छ करते आणि बॉडी मध्ये नवीन पेशींना बनवते. म्हणून दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.

 3. व्यायाम आणि योग अभ्यास करावा
  व्यायामाचे महत्त्व जेवढे शरीरासाठी आहे तेवढेच तुमची त्वचा आणि मानसिक आरोग्यासाठी देखील आहे. व्यायाम केल्याने चेहर्‍यावर कांती आणि तेज (glowing skin tips in marathi) निर्माण होते. म्हणून आपल्या सौंदर्यात वृद्धी करू इच्छिणाऱ्या नी दिवसातून कमीत कमी अर्धा तास भरपूर व्यायाम करायला हवा.

  व्यायामा दरम्यान तुमचा चेहरा आणि संपूर्ण शरीरावरून घाम निघायला हवा. घाम बाहेर आल्याने शरीरावरील बारीक बारीक छिद्र उघडली जातात. शरीर थकल्याने रात्री झोप देखील चांगली येते. व्यायाम म्हणून आपण सूर्यनमस्कार, मॉर्निंग वॉक, जॉगिंग, दोरी उड्या, डान्सिंग यासारखे व्यायाम आणि चक्रासन, सर्वांगासन, हलासन, शीर्षासन यासारखे योगासन व प्राणायाम करू शकतात.

 4. चेहऱ्यावर साबणाचा वापर करू नये
  चेहऱ्याच्या नाजूक त्वचेसाठी केमिकलयुक्त साबण वापरणे हानीकारक सिद्ध होऊ शकते. साबणात अनेक असे केमिकल असतात जे त्वचेला शुष्क करतात व त्वचेतील नैसर्गिक तेल काढून त्वचेचा पीएच स्थर असंतुलित करतात.

  म्हणून शक्य होईल तेवढे साबणाने चेहरा आणि आंघोळ करणे टाळावे. साबणाऐवजी आपण नैसर्गिक घरगुती गोष्टींचा उपयोग करू शकतात. याशिवाय बाजारातून कोणतीही त्वचेच्या आरोग्य संबंधी ची वस्तू खरेदी करण्याआधी त्यात वापरण्यात आलेले पदार्थ व्यवस्थित चेक करावेत.

 5. झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुवा
  चेहऱ्यावर असलेला मेकअप, प्रदूषण, धूलिकण इत्यादी चेहऱ्याची रोमछिद्र बंद करतात. व रात्री चेहरा स्वच्छ न धुता झोपल्याने चेहऱ्यावर असलेले ते सर्व हानिकारक पदार्थ त्वचेच्या आत शिरून पिंपल्स निर्माण करतात. म्हणून जर आपल्या चेहर्यावरील पुटकुळ्या दूर ठेवायच्या असतील तर झोपण्याआधी फेस वॉश किंवा स्वच्छ पाण्याने चेहरा व हात पाय धुवावेत. चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय <<येथे वाचा.

चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय

क्लिन्सिंग

चेहऱ्यावर असलेली धूळ, प्रदूषण, घाम आणि मेकअप काढून टाकण्यासाठी फेस वॉश च्या मदतीने चेहरा स्वच्छ धुवावा. चेहरा धुतल्याने त्वचेवरील रोम छिद्र उघडून जातात व त्वचा मोकळा श्वास घ्यायला लागते.

 • सकाळी आंघोळ करताना व संध्याकाळी कामावरून आल्यावर अशा प्रकारे दिवसातून दररोज दोन वेळा फेस वॉश ने चेहरा धुवावा.
 • फेसवॉश ची निवड आपल्या चेहऱ्याच्या त्वचेनुसार करावी.
 • चेहऱ्यावरच्या पिंपल असतील तर anti acne फेस वॉश वापरावा.
 • जर चेहऱ्याची त्वचा कोरडी असेल तर मिल्क, क्रीम किंवा oil based facewash ची निवड करावी.
 • जर चेहऱ्याची त्वचा ओईली असेल तर जेल बेस्ड फेस वॉश चा वापर करावा. सोबतच हे देखील पहावे की facewash मध्ये सेलीसिलिक एसिड आहे किंवा नाही.
 • दिवसातून दोन वेळेस पेक्षा जास्त फेसवाश लावू नये. जास्त फेस वॉश वापरल्याने चेहऱ्यावर असलेले नैसर्गिक ओईल देखील निघून जातात व परिणामी त्वचा कोरडी पडते.

मोईश्चरायझिंग

चेहऱ्याला moisturize केल्याने त्वचा नरम आणि कोमल बनते. moisturizer त्या उपयोगाने त्वचेच्या आवश्यकताची पूर्ती होते. सुंदर आणि कोमल त्वचेसाठी मॉइश्चरायझर चा उपयोग करणे आवश्यक आहे.

 • जर तुमची त्वचा नॉर्मल अथवा कोरडी असेल तर दिवसातून एक ते दोन वेळा चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावावे. आपण सकाळ अंघोळ झाल्यावर आणि रात्री झोपताना मॉइश्चरायझर लावू शकता.
 • जर त्वचा तेलकट असेल तर दररोज फक्त एकदाच रात्री झोपण्याआधी मॉइश्चरायझर लावावे.
 • जर तुमची त्वचा कोरडी असेल तर असे मॉइश्चरायझर निवडावे ज्यात सोया बटर, कोको बटर आणि ऑलिव्ह ऑईल असेल.
 • याशिवाय जर त्वचा तेलकट असेल तर वॉटर बेस्ड मॉइस्चरायझर खरेदी करावे.
 • मॉइस्चरायझर चेहर्या सोबतच हात आणि पायांना देखील लावावे.

ओठांची काळजी

चेहऱ्याच्या अपेक्षेत ओठ अधिक कोमल असतात. म्हणून थोडादेखील निष्काळजीपणा झाला तर ओठ फाटायला लागतात. म्हणून नियमित ओठांची काळजी घेणे आवश्यक आहे.

 • ओठांना नरम आणि कोमल ठेवण्यासाठी दररोज 3 ते 4 वेळा लीप बाम लावावा.
 • लीप बाम ला पर्याय म्हणून आपण दररोज रात्री झोपण्याआधी शुद्ध गाईचे घी ओठांवर लावू शकतात.
 • ओठांना जिभेने छाटणी ची सवय मोडावी. असे केल्याने होते त्यांची त्वचा कोरडी होऊ लागते.
 • फ्रुट फ्लेवर असलेली लिपस्टिकचाच वापर करावा.

सनस्क्रीन

सन क्रीम सूर्यापासून निघणार्‍या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण करते. म्हणून फक्त उन्हाळ्यातच नव्हे तर प्रत्येक ऋतू मध्ये सन स्क्रीन चा वापर करणे आवश्यक आहे. सन स्क्रीन वापराने चेहरा डॅमेज होण्याचा धोका देखील टाळता येतो.

 • घरातून बाहेर निघण्याच्या 10 मिनिट आधी उन्हात उघड्या असणाऱ्या संपूर्ण त्वचेला सन स्क्रीन लावावी.
 • जर दीर्घकाळ बाहेर उन्हात काम असेल तर दर 2 ते 3 तासांच्या गॅप मध्ये सन स्क्रीन लावावी.
 • जर तुमच्या चेहऱ्यावर अधिक प्रमाणात पिंपल्स असतील अथवा त्वचा ओईली असेल तर जेल बेस्ट ओईल फ्री सन स्क्रीन चा वापर करावा.
 • फक्त चेहराच नव्हे तर हात आणि पायांना देखील सन स्क्रीन लावावी.

फेसपॅक

चेहऱ्याचा थकवा दूर करण्यासाठी दिवसातून एकदा फेस पॅक लावणे आवश्यक असते. फेस पॅक लावल्याने चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो मिळतो. पुढे आपणास त्वचेच्या प्रकारानुसार फेस पॅक देण्यात आले आहेत.

नॉर्मल त्वचा

जर तुमची त्वचा नॉर्मल असेल तर दररोज नियमितपणे हळद आणि चंदनाचा फेसपॅक लावावा. याप्रकारे फेस पॅक लावल्याने तुमचे सौंदर्य वाढेल आणि त्वचा ग्लो करू लागेल. याशिवाय नॉर्मल त्वचेसाठी आपण इतर कोणताही फेसपॅक वापरू शकता.

कोरडी त्वचा

त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी मिल्क बेस्ड फेसपॅक लावायला हवा. याशिवाय आपण दही आणि मधाचा फेसपॅक देखील वापरू शकतात.

ओईली त्वचा

जर तुमची त्वचा तैलिय असेल तर आपण ऑइल कंट्रोल फेसपॅक वापरू शकता. यामध्ये मुलतानी माती चा फेसपॅक वापरला जाऊ शकतो. ओईली स्किन असणार्‍यांनी एक दिवसाआड फेसपॅक लावला तरी चालेल. मुलतानी मातीचा फेसपॅक कसा बनवावा <<वाचा येथे

पिंपल असलेली त्वचा

जर आपल्या चेहऱ्यावर भरपूर प्रमाणात पिंपल्स असतील तर आपण एक्ने कंट्रोल फेस पॅक वापरू शकतात. यामध्ये लिंबाचा फेसपॅक सामील आहे.

तर मंडळी हे होते चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय (beauty tips in marathi) आणि glowing skin tips in marathi. हे उपाय जर आपण नियमीतपणे कराल तर नक्कीच आपल्या चेहऱ्यावर एक वेगळा ग्लो निर्माण होईल. व सर्वजण आपले सौन्दर्य पाहून चकित होतील. आपण ही पोस्ट इतरांसोबत शेअर करून त्यांनाही या विषयाची माहिती देऊ शकता.

अधिक वाचा

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा