अश्वगंधा वनस्पती चे फायदे व मराठी माहिती | ashwagandha benefits in marathi

This article contains some ashwagandha benefits in marathi and withania somnifera in marathi. this ashwagandha information in marathi is very helpful to find remedy on many diseases.

अश्वगंधा हे आयुर्वेदातील एक प्रसिद्ध औषध आहे. त्याच्या अगणित फायद्यांमुळे त्याचा उपयोग विश्वभरात केला जातो. अनेक शास्त्रज्ञ देखील अश्वगंधाला एक गुणकारी आयुर्वेदिक औषध म्हणून मानतात. अश्वगंधा व्यक्तीला निरोगी ठेवण्यासाठी फार उपयुक्त आहे. म्हणून प्रत्येकाने योग्य प्रमाणात अश्वगंधाचे सेवन करायला हवे. आजच्या लेखात आपण अश्वगंधा चे फायदे (Ashwagandha benefits in Marathi)अश्वगंधा मराठी माहिती पाहणार आहोत.

अश्वगंधा काय आहे ? – ashwagandha in marathi

अश्वगंधा आयुर्वेदिक औषधांमधील एक प्रसिद्ध औषध आहे. फार प्राचीन काळापासून अश्वगंधा चा उपयोग आयुर्वेदिक जडीबुटी म्हणून केला जातो. अथर्ववेद मध्ये देखील अश्वगंधा चे उपयोग सांगण्यात आले आहे. अश्वगंधा मध्ये अनेक प्रकारचे एंटीऑक्सीडेंट असतात. हे गुणधर्म शरीरातील कोलेस्ट्रॉल चा स्तर नियंत्रणात ठेवतात ज्यामुळे हृदयासंबंधी विकार होण्याची शक्यता कमी होते.

अश्वगंधा चे झाड कसे असते ?

अश्वगंधा ची झाडी मोठी असतात परंतु त्यांची खोड बारीक आणि पातळ असते. हे झाड बाग-बगीचे, शेत आणि पहाडी क्षेत्रांमध्ये सहज आढळते. या झाडाची पाने क्रॅश केल्यावर त्यातून घोड्याच्या लघवी सारखी गंध येते. ही गंध या वृक्षाची मुख्य ओळख आहे.
अश्वगंधा वनस्पती दाखवा म्हणून कोणाचा प्रश्न असेल तर पुढील चित्रात दाखवल्याप्रमाणे ही वनस्पती दिसते.

ashwagandha in marathi

अश्वगंधा चे फायदे – (ashwagandha benefits in marathi)

आयुर्वेदात अश्वगंधा चे उपयोग अश्वगंधा चे पान, अश्वगंधा चूर्ण इत्यादी पद्धतीने केला जातो. अश्वगंधाचे जेवढे फायदे आहे तेवढेच त्याचे नुकसान किंवा दुष्परिणाम देखील आहेत म्हणून विशेषज्ञाच्या योग्य सल्ल्यानुसारच याचे सेवन करावे. तर चला आता आपण अश्वगंधा चे फायदे कोणते आहेत याबद्दल जाणून घेऊया…

 • रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अश्वगंधा चे फायदे
  कोणताही रोग आणि शारीरिक समस्येशी लढण्याकरिता व्यक्तीची रोगप्रतिकारशक्‍ती चांगली असणे आवश्यक आहे. अश्वगंधाच्या उपयोगाने रोगप्रतिकारशक्ती वाढवता येऊ शकते. शोधातून लक्षात आले आहे की अश्वगंधा शरीरातील लाल रक्त पेशी वाढवण्याचे कार्य करते ज्यामुळे ऍनिमिया सारख्या रोगांना दूर ठेवता येते. व शरीरातील रक्त वाढले की इतर शारीरिक रोगदेखील कायमचे दूर होतात. रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्याचे घरगुती उपाय <<येथे वाचा

 • लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी अश्वगंधा चूर्ण चे फायदे
  अश्वगंधा एक शक्तिवर्धक आयुर्वेदिक औषध आहे जी पुरुषांची लैंगिक शक्ती वाढवण्याचे कार्य देखील करते. 2010 मध्ये केलेल्या एका शोधातून लक्षात आले आहे की अश्वगंधा चूर्ण चे सेवन शरीरातील वीर्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरते.

 • स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अश्वगंधा चे उपयोग
  मेंदूची कार्यक्षमता कमी होणे, एकदा पाहिलेल्या गोष्टी लक्षात न राहणे इत्यादी समस्यांमध्ये अश्वगंधा उपयोगी ठरते. अश्वगंधा चे सेवन केल्याने झोप चांगली येते व विस्मरण आणि स्मरणशक्तीची कमतरता कायमची दूर होते.

 • थायराइड च्या रोगात अश्वगंधा चे फायदे
  हायपोथायरॉईडीझम च्या रोगांमध्ये अश्वगंधा चा उपयोग थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करण्याकरिता केला जातो. अश्वगंधा च्या खोडांचे एक्सट्रॅक्ट नियमित घेतल्याने थायरॉईड हार्मोन चे स्त्राव वाढवण्यात सहाय्य होते. थायरॉईड मराठी माहिती <<वाचा येथे

 • हाडांची मजबुती
  अश्वगंधा शरीराच्या स्नायूंना बळकट करण्याचे कार्य देखील करते. शोधातून लक्षात आले आहे की अश्वगंधा खाल्ल्याने शरीराच्या खालील अवयवांची कार्यक्षमता वाढते. पुरुषांनी अश्वगंधा चे नियमित सेवन केल्यास त्यांचे स्नायू आधी पेक्षा अधिक बळकट होतात आणि शरीराची अनावश्‍यक चरबी कमी होऊ लागते.

अश्वगंधा चे नुकसान दुष्परिणाम

 • शरीरात उष्णता असणाऱ्या व्यक्ती साठी अश्वगंधाचे सेवन नुकसानदायक ठरू शकते.
 • अश्वगंधा चे जास्त सेवन केल्यास उलटी येणे, पोट खराब होणे, डायरिया यासारख्या समस्या होऊ शकतात.काही लोकांना अश्वगंधा खाल्ल्याने अलर्जी देखील होऊ शकते.
 • गर्भवती महिलांना अश्वगंधा चे सेवन न करण्याची सल्ला दिली जाते. कारण यामध्ये गर्भ पाडणारे गुण देखील असतात.
 • अश्वगंधा सेवन करण्या आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. विशेष करून मधुमेह, हाय बीपी चिंता मानसिक तणाव आणि त्रास इत्यादी समस्यांनी पीडित लोकांनी एकदा डॉक्टरांशी चर्चा अवश्य करावी.

तर मंडळी ही होती अश्वगंधाची मराठी माहिती – ashwagandha in marathi आशा करतो की अश्वगंधा चे फायदे सांगा (ashwagandha benefits in marathi) आणि मराठी माहिती आपणास उपयोगी ठरली असेल. या माहितीला इतरांसोबतही नक्की शेअर करा. धन्यवाद…

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *