कावीळ ची लक्षणे, प्रकार व घरगुती उपचार | jaundice/kavil symptoms in marathi

In this articel you will get some information about jaundice or kavil and kavil symptoms in marathi also we will see the kavil sathi gharguti upay (home remedies for jaundice in marathi). we hope this information will be helpful for every person.

kavil symptoms in marathi : कावीळ रोगाला इंग्रजी भाषेत jaundice म्हटले जाते. या रोगात बिलीरुबिन (bilirubin) नावाच्या पदार्थाचे रक्तातील प्रमाण वाढून जाते, परिणामी त्वचेवरील नखे आणि डोळ्यांचा पांढरा भाग हा पिवळा दिसू लागतो. या रोगाने पीडित असलेल्या व्यक्तीचा वेळेवर उपचार झाला नाही तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून आजच्या या लेखात आपण कावीळ रोगाची मराठी माहिती, घरगुती उपाय व कावीळ रोगाची लक्षणे जाणून घेणार आहोत.

kavil symptoms in marathi

jaundice meaning in marathi – कावीळ काय आहे

ज्यावेळी रक्तात असणाऱ्या बिलीरुबिन (bilirubin) या पदार्थाचे प्रमाण अधिक होते तेव्हा शरीरातील यकृतावर याचा परिणाम होऊ लागतो. यकृताची काम करण्याची क्षमता हळू हळू कमी होऊ लागते. वाढलेला बिलीरुबिन पदार्थ जस जसा शरीरात पसरू लागतो तस तसे डोळ्यांचा पांढरा भाग, शरीरावरील त्वचा व नखे इत्यादींचा रंग पिवळा होऊ लागतो. कावीळ चा हा रोग जास्तकरून नवजात बालकांमध्ये आढळतो. परंतु काही प्रमाणात वयस्कर लोकांमध्ये देखील या रोगाची लक्षणे दिसू शकतात

काविळीचे प्रकार (Types of jaundice in marathi)

कावीळ रोगाचे तीन प्रमुख प्रकार आहेत-

हेमोलीटीक जाँन्डिस : जर रक्तातील लाल पेशी वेळे आधीच तुटायला लागल्या तर रक्तातील बिलिरुबिन चे प्रमाण वाढायला लागते ज्याला लिव्हर द्वारे कंट्रोल करणे कठीण होते. ज्यामुळे डोळे आणि त्वचा पिवळी दिसू लागते. या स्थितीला प्री हिपेटिक कावीळ अथवा हेमोलीटीक कावीळ म्हटले जाते. हा प्रकार काही औषधी चा दुष्परिणाम अथवा अनुवंशिक रुपाने होऊ शकतो.

हेपैटोसेलुलर कावीळ : अनेकदा लिव्हरच्या लिव्हर च्या समस्ये मुळे देखील कावीळ होतो. नवजात बालकांमध्ये काही enzymes ची कमतरता असते व त्यांचे लिव्हर देखील पूर्णपणे विकसित झालेले नसते ज्यामुळे त्यांना अस्थायी कावीळ होऊ शकतो. वयस्कर लोकांमध्ये हा रोग दारू पिणे, इतर विषयूक्त पदार्थ खाणे आणि इतर काही औषधीच्या दुष्परिणाम म्हणून होऊ शकतो. या प्रकाराला हेपैटोसेलुलर कावीळ म्हटले जाते.

पोस्ट हिपॅटिक कावीळ किंवा ऑब्सट्रक्टि व कावीळ :
पित्त नलिकेत रुकावट निर्माण झाल्याने बिलिरुबिन वाढू लागते आणि हे मुत्रात पसरल्याने मुत्राचा रंग पिवळा होऊन जातो. या प्रकाराला पोस्ट हिपॅटिक कावीळ किंवा ऑब्सट्रक्टि व कावीळ म्हटले जाते.

कावीळ रोगाची लक्षणे – kavil symptoms in marathi

कावीळ झाल्यावर पुढील लक्षणे (kavil symptoms in marathi) दिसू शकतात-

 • त्वचा, डोळे आणि नखांचा पांढरा भाग जलद गतीने पिवळा होऊ लागणे
 • फ्लू सारखी लक्षणे दिसणे
 • ताप येणे
 • शरीरात कमजोरी
 • भूक न लागणे
 • अपचन, उलटी होणे
 • वजन कमी होऊ लागणे
 • पोट दुखणे
 • पिवळ्या गडद रंगाची लघवी
 • काही प्रमाणात हातावर खाज येणे

कावीळ कशामुळे होते व कावीळ होण्याची कारणे

जर रक्तातील बिलीरुबिन चे प्रमाण 2.5 पेक्षा जास्त झालेले असेल तर यकृतातील नको असलेले पदार्थ स्वच्छ करण्याची प्रक्रिया थांबते व परिणामी बिलीरुबिन चे प्रमाण आधी पेक्षा अधिक वाढायला लागते आणि यामुळे त्वचा पिवळी दिसू लागतो या रोगाला ‘कावीळ रोग’ म्हटले जाते. पुढे काही कारणे देण्यात आली आहे ज्यामुळे कावीळ होऊ शकतो-

 • हेपिटायटीस
 • पँक्रिटिक कँसर
 • अल्कोहल संबंधी लिव्हर चे रोग
 • दूषित वस्तु आणि खराब पाणी पिल्याने
 • काही विशिष्ट औषधी घेतल्याने
कावीळ घरगुती उपचार व उपाय

जर आपणास कावीळ ची लक्षणे दिसत असतील तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य औषधे उपचार घ्यावा. याशिवाय आपण लवकर बरे होण्यासाठी कावीळ च्या रोगात पुढील घरगुती उपाय देखील करू शकता.

उसाचा रस
उसाचा रस का कावीळ च्या रोगात अत्यंत गुणकारी आहे. जर पीडित व्यक्तीने दिवसातून तीन ते चार वेळा उसाचा रस घेतला तर त्याची प्रकृती लवकरात लवकर सुधारेल.

याशिवाय गहूच्या दाण्या एवढा पांढरा चुना उस रसासोबत पील्याने देखील कावीळ चा रोग लवकरात लवकर चांगला होतो.

हळद
कावीळ झाल्यावर घरगुती उपाय म्हणून तुम्ही दिवसातून तीन वेळा एक चमचा हळद अर्धा ग्लास पाण्यात मिसळून पिऊ शकतात. असे केल्याने शरीरात असलेले विष युक्त पदार्थ मारले जातात. हा उपाय शरीरातील वाढलेल्या बिलीरुबिन ला देखील बाहेर काढण्याचे काम करतो.

संत्र्याचे सेवन
संत्री पचनसंस्थेला दुरुस्त करण्याचे कार्य करते. काविळच्या रोगात देखील संत्री अत्यंत गुणकारी आहे. संत्र्याच्या सेवनाने शरीरातील बिलरुबिन चे प्रमाण कमी करण्यास देखील सहाय्य होते.

ताक आणि मठ्ठा प्यावा
काविळ च्या रोगात सकाळ-संध्याकाळ 1-1 ग्लास ताक अथवा मठ्ठा मध्ये एक चमचा सेंधव मीठ टाकून प्यावे. या उपायाने देखील कावीळ रोगात आराम मिळतो.

गुळवेल
गुळवेल हे अत्यंत महत्त्वाचे आयुर्वेदिक औषध आहे, ज्याचा उपयोग अनेक रोगांना ठीक करण्यासाठी केला जातो. कावीळ रोगात गुळवेल चा रस मध मध्ये मिसळून पहाटे सकाळच्या वेळी सेवन करावे. अधिक लाभ मिळवून घेण्यासाठी आयुर्वेदाच्या जाणकारांशी संपर्क साधावा. गुळवेल चे फायदे <<वाचा येथे

कावीळ रोग्याचा आहार

 • ताजे आणि शुध्द भोजन ग्रहण करावे.
 • स्वयंपाक बनवण्या आणि वाढण्याआधी हातांना स्वच्छ धुवावे.
 • जास्तीत जास्त पाणी प्यावे. पाणी पिल्याने शरीर व लिव्हर मध्ये असलेले हानिकारक पदार्थ बाहेर टाकले जातात. म्हणून दररोज पुरेशा प्रमाणात स्वच्छ आणि शुद्ध पाणी प्यावे.
 • फळांचा रस प्यावा. लिंबू, संत्री आणि इतर फळांचा रस पिल्याने शरीराला नवीन ऊर्जा मिळते व शरीर देखील स्वच्छ राहते.
 • हळुवार आणि चावून खावे. हळुवारपणे चावून खाल्ल्याने लिव्हर वर जास्त दबाव येत नाही. म्हणून दिवसातून वेगवेगळ्या वेळी थोडे थोडे हळुवार चावून अन्न खावे

तर ही होती कावीळ रोगाची मराठी माहिती या लेखात आपण कावीळ ची लक्षणे (kavil symptoms in marathi), कावीळ चे प्रकार आणि कावीळ रोगावरील घरगुती उपाय जाणून घेतलेत. आम्ही आशा करतो की ही मराठी माहिती आपणास उपयुक्त ठरली असेल. विविध रोग आणि आरोग्याशी निगळीत मराठी माहिती वाचत राहण्यासाठी माझी काळजी ला भेट देत रहा.

This was the information about jaundice meaning in marathi and kavil symptoms in marathi. we hope that this home remedies for kavil in marathi are helpful for you. But remember that if you have any symptoms of kavil then first immediately contact with doctors after that you can also do home remedies.

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *