थायरॉईड वर घरगुती उपाय – thyroid symptoms in marathi : आज जगभरात वेगाने पसरणारा थायरॉईड चा रोग अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. थायरॉईड ची ही समस्या महिलांमध्ये अधिक असते. thyroid ची समस्या थायरॉईड ग्रंथीच्या असंतुलणामुळे निर्माण होते.
आजच्या या लेखात आपण थायरॉईड ची लक्षणे मराठी – thyroid symptoms in marathi आणि थायरॉईड कमी करण्याचे उपाय याबद्दल मराठी माहिती पाहणार आहोत. तर चला सुरू करूया…

Table of Contents
थायरॉईड म्हणजे काय
आयुर्वेदात थायरॉईड शी संबंधित रोगाला अवटू ग्रंथीचा विकार म्हटले गेले आहे. थायरॉईड ही गळ्याच्या पुढील भागात असणारी एक लहान आकाराची ग्रंथी असते. ह्या ग्रंथीचे कार्य शरीरातील अनेक महत्त्वाच्या गतिविधि वर नियंत्रण ठेवणे असते. ही ग्रंथी अन्नाचे रूपांतरण ऊर्जेत करते. ह्या सोबतच श्वास, हृदय, पचन संस्था आणि शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवण्याचे कार्यही करते.
जेव्हा ह्या ग्रंथीचे हार्मोन्स असंतुलित होतात तेव्हा थायरॉईड ची समस्या निर्माण होते.
थायरॉईड चे प्रकार
थायरॉईड चे मुख्य दोन प्रकार पुढीलप्रमाणे आहेत
हायपोथायरॉईडीझम (Hypothyroidism)
ह्या प्रकारात थायरॉईड ग्रंथी कमी प्रमाणात हार्मोन्स निर्माण करते व तिचे कार्य मंदावते. हायपोथायरॉईडीझम ची लक्षणे हृदयाची गती कमी होणे, उच्च रक्तदाब, स्त्रियांमध्ये मासिक पाळी असामान्य होणे, चेहऱ्यावर सुज येणे इत्यादि आहेत.
पॅरालिसिस वरील घरगूती उपाय