एच आय व्ही एड्स रोगाची लक्षणे, कारणे, मराठी माहिती | information & symptoms of hiv in marathi

This article contains all the information about hiv in marathi and the symptoms of hiv in marathi. The purpose of this information is just to share information and awarness about HIV AIDS. If you see any symptoms of aids then immediately contact with doctors and test the hiv.

symptoms of hiv in marathi
symptoms of hiv in marathi

एच आय व्ही एड्स काय आहे ? What is HIV AIDS in Marathi

एच आय व्ही अर्थात Human immunodeficiency virus (HIV) हा एक संक्रामक वायरस आहे. यालाच एड्स (acquired immunodeficiency syndrome) देखील म्हटले जाते. हा वायरस सर्वात आधी शरीराच्या पेशींवर हल्ला करून शरीराची रोग प्रतिरोधक क्षमतेला गंभीर नुकसान पोहोचवतो. परिणामी एच आय व्ही/एड्स पीडित व्यक्तीची संक्रमणापासून लढण्याची शक्ती कमी होते. हा व्हायरस हळू हळू शरीरातील सर्व पांढऱ्या पेशी (CD 4) नष्ट करतो आणि जर लवकर योग्य औषध घेऊन उपचार केला गेला नाही तर CD 4 पेशींवर संपूर्णपणे ताबा मिळवून हा वायरस आपल्या अनेक प्रती तयार करून टाकतो.

एच आय व्ही एड्स वायरस संक्रमित व्यक्तीच्या सोबत असुरक्षित लैंगिक संबंध बनवणे, संक्रमित व्यक्तीला वापरलेले इंजेक्शन दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी पुन्हा वापरणे. इत्यादी कारणांमुळे पसरतो. सध्याच्या स्थितीला भारतात जवळपास 23 लाख 50 हजार HIV रुग्ण आहेत. एच आय व्ही एड्स ची भयावह स्थिती लक्षात येण्याकरीता हे आकडे पुरेसे आहेत.

एचआयव्ही एड्स ची लक्षणे – symptoms of HIV in Marathi

एच आय व्ही ची लक्षणे (symptoms of hiv in marathi) संक्रमणाच्या steps नुसार वेगवेगळी असतात. या रोगाचे तीन टप्पे असतात. पहिला-अॅक्युट प्रायमरी इन्फेक्शन, दुसरा – क्लिनिकल लेटेंसी, तिसरा – एड्स. अनेक रोग्यांना सुरुवातीला आपल्या अवस्थेबद्दल माहीत नसते. एचआयव्ही एड्स ची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत.

 • पुन्हा पुन्हा ताप येणे
 • गळा खराब होणे
 • शरीरावर चट्टे
 • थोड्याच कामानंतर थकवा येणे
 • डोकेदुखी
 • हळूहळू वजन कमी होणे
 • विनाकारण तणाव आणि चिंता वाटणे
 • जेवल्यानंतर लगेच उलटी होणे
 • नेहमी सर्दी खोकला असणे

एचआयव्ही एड्स होण्याची प्रमुख कारणे

 • लैंगिक संबंधांव्दारे
  जर कोणी आधीपासून एचआयव्ही संक्रमित असलेल्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध बनवीत असेल आणि संक्रमित व्यक्तीचे रक्त, वीर्य अथवा योनी स्त्राव आपल्या शरीरात घेत असेल तर यामुळे एचआयव्ही होऊ शकतो. याशीवाय योनी, गुदाद्वार व मुखमैथुन मुळे देखील एचआयव्ही एड्सचे संक्रमण पसरते. सेक्स कसा करावा <<वाचा येथे.
 • इंजेक्शन
  जर एचआयव्ही संक्रमित व्यक्तीला वापरलेली इंजेक्शनची सुई चांगल्या व्यक्तीला वापरण्यात आली तर एचआयव्ही पसरण्याची शक्यता असते.
 • रक्त संचरण
  रक्त संचरण अर्थात संक्रमित व्यक्तीचे रक्त चांगल्या व्यक्तीच्या शरीरात सोडल्याने देखील एचआयव्ही होतो.
 • गर्भावस्था आणि स्तनपान द्वारे
  जर एखादी स्त्री एचआयव्ही संक्रमित असेल तर बाळाला जन्म देताना तसेच स्तनपान द्वारे मुलाला देखील एचआयव्ही होऊ शकतो.

एचआयव्ही पासून बचाव कसा करावा ?

आजपर्यंत एचआयव्ही (symptoms of hiv in marathi) एड्स चे संक्रमण दूर करणार्या vaccine चा शोध लागलेला नाहीये. म्हणून या रोगापासून स्वतःचा बचाव करणे हाच यावरील एकमेव उपाय आहे. जर आपण स्वतः ला एचआयव्ही संक्रमण पासून दूर ठेवू इच्छित असाल तर पुढील गोष्टी कायम लक्षात ठेवा.

 • असुरक्षित शारीरिक संबंध ठेवण्याआधी स्वतःची व आपल्या साथीची एचआयव्ही टेस्ट करावी.
 • एचआयव्ही चे मुख्य कारण असुरक्षित लैंगिक संबंध हेच आहे. म्हणून कायम संभोग करताना कंडोम चा वापर करावा.
 • असुरक्षित व एकापेक्षा जास्त सोबती सोबत सेक्स करणे टाळावे.
 • शारीरिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष ठेवावे.
 • डॉक्टर कडून इंजेक्शन घेत असताना, स्वच्छ आणि नवे इंजेक्शन आहे का याची खात्री करून घ्यावी.
एच आय व्ही टेस्ट कधी करावी
एच आय व्ही टेस्ट

जर आपल्याला शरीरात एचआयव्ही ची लक्षणे – symptoms of hiv in marathi दिसत असतील तर लवकरात लवकर दवाखान्यात जाऊन एचआयव्ही टेस्ट करावी. कारण आपण जेवढा विलंब कराल तेवढे शारीरिक स्वास्थ्य बिघाडत जाईल. एच आय व्ही चे विविध टेस्ट पुढीलप्रमाणे आहेत.

 • Elisa टेस्ट
  Elisa म्हणजेच enzyme linked immunosorbent assay. हा टेस्ट एचआयव्ही एड्स चे परीक्षण करण्यासाठी केला जातो. जर या टेस्ट मध्ये तुमचे परीक्षण postive आले तर यानंतर वेस्टन ब्लोट टेस्ट केला जातो.
 • वेस्टर्न ब्लोट टेस्ट (Western Blot Test)
  ही एक अतिशय संवेदनशील रक्त चाचणी असते. या चाचणी द्वारे शरीरातील रक्तामध्ये एचआईवी अँटीबॉडी बद्दल माहिती मिळवली जाते.
 • घरेलू टेस्ट (home test)
  अमेरिकेचे फुड अंड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ने होम एक्सेस एक्सप्रेस टेस्ट म्हणून एक घरगुती एचआयव्ही टेस्ट चा शोध लावला आहे. हे टेस्ट किट मेडिकल वर उपलब्ध असते.
 • सलाईवा टेस्ट
  या टेस्टमध्ये गालाच्या आतून लाळ बाहेर काढून तिच्यावर टेस्ट केले जातात.
एचआयव्ही आयुर्वेदिक उपचार

एड्स साठी आयुर्वेदिक उपचार सोबतच पौष्टिक आहार, नियमित व्यायाम, योग आणि गरज पडली तेव्हा ऍलोपॅथिक उपचार घेणे आवश्यक आहे. एच आय व्ही एड्स च्या उपचारात सामान्यपणे उपयोगात आणली जाणारी आयुर्वेदिक औषध आवळा, अश्वगंधा आणि तुळस इत्यादी आहेत.

योग्य आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

महत्वाची प्रश्न उत्तरे

एचआयव्ही एड्स किती दिवसात होतो ?

एचआयव्ही व्हायरस चे पहिले लक्षण (symptoms of hiv in marathi) 2 ते 6 आठवड्यांच्या आत दिसायला लागतात. यामध्ये शरीराची रोग प्रतिरोधक क्षमता कमी होते. या अवस्थेला ॲक्युट प्रायमरी इन्फेक्शन म्हटले जाते. यादरम्यान एचआयव्ही ची लक्षणे वायरल फ्लू सारखी दिसू लागतात. जसे डोकेदुखी, डायरिया, उलटी, थकवा, गळ्यात दुखणे, छातीत दुखणे इत्यादी.

चुंबन/किस केल्याने एड्स होतो का

जर आपण एचआयव्ही पीडित व्यक्तीच्या गालाचे व शरीराच्या इतर अवयवाचे चुंबन घेत असाल तर एड्स होण्याची अजिबात संभावना नाहीये. परंतु एचआयव्ही पीडित व्यक्तीच्या लाळ (saliva) मध्ये काही प्रमाणात एचआयव्ही चे वायरस असतात. म्हणून जर ओठांचे चुंबन घेतांना एका शरीराची लाळ दुसऱ्या शरीरात गेली तर एचआयव्ही होण्याची संभावना आहे.

तर मित्रहो ह्या लेखात आपण एचआयव्ही एड्स ची लक्षणे, कारणे, आयुर्वेदी उपाय आणि टेस्ट बद्दलची माहिती मिळवली. आशा आहे की ही मराठी माहिती आपणास उपयोगी ठरली असेल. या माहितीला इतरांसोबत शेअर करा व जर आपल्याला एचआयव्ही एड्स रोगाची लक्षणे (symptoms of hiv in marathi) दिसत असतील तर डॉक्टरांकडे जाऊन योग्य उओचार घ्यावा. धन्यवाद…

अधिक वाचा

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा