सूर्य नमस्कार चे फायदे व प्रकार मराठी | surya namaskar information, benefits, mantra in marathi

सूर्य नमस्कार चे प्रकार फायदे व व्यायाम मराठी | surya namaskar information, benefits, mantra in marathi : भारतात कदाचितच कुणी असेल ज्याला सूर्यनमस्कार विषयी माहिती नाही. योग आणि सूर्यनमस्कार भारताची प्राचीन ओळख आहे. परंतु आजही खूप कमी लोक असतील ज्यांना योग्य पद्धतीने सूर्यनमस्कार व्यायाम कसा करावा (surya namaskar steps in marathi) आणि सूर्य नमस्कार चे फायदे (surya namaskar benefits in marathi) काय आहे याविषयी माहिती असेल.

आजच्या या लेखात आम्ही आपल्या करिता सूर्यनमस्कार चे फायदे मराठी व सूर्यनमस्कार कसा करावा याविषयी माहिती घेऊन आलो आहोत. हा लेख वाचल्यानंतर सूर्य नमस्कार व्यायामाचे प्रकार आपल्या लक्षात येतील यासोबतच surya namaskar mantra in marathi काय आहे याची देखील माहिती आपणास प्राप्त होईल. तर चला सुरु करूया..

सूर्य नमस्कार मराठी माहिती – surya namaskar information in marathi

सूर्यनमस्कार चा अर्थ आहे सूर्याला अर्पण होणे किंवा नमस्कार करणे. सूर्यनमस्कार हे फक्त एक आसन नसून अनेक आसनाचा एकत्रित मेल आहे.

प्राचीन काळापासून आपल्या देशात सूर्य व निसर्गातील इतर गोष्टींची पूजा केली जात आहे. सूर्याच्या कोवळ्या प्रकाशात सूर्यनमस्कार केल्याने शरीराला डी विटामिन मिळते ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि अनेक रोग दूर राहतात. प्रतिदिन सूर्यनमस्कार केल्यास व्यक्ती त्याचे शारीरिक मानसिक व अध्यात्मिक उत्थान करू शकतो.

सूर्य नमस्कार चे फायदे मराठी – surya namaskar benefits in marathi

सूर्य नमस्काराचे प्रमुख फायदे surya namaskar benefits in marathi पुढील प्रमाणे आहेत-

 1. पचन तंत्र सुधारते :
  जर आपण नियमित सूर्यनमस्कार करीत असाल तर यामुळे पचन सुधारते आणि पोटासंबंधी विकार दूर राहतात.

 2. झोप न येण्याची समस्या दूर होते
  आज अनेक लोकांनी अशांत डोके व आंतरिक ऊर्जेचे कमतरता यामुळे झोप न येणे ही समस्या निर्माण होत आहे. रात्री पुरेशी झोप न आल्यास त्याचा परिणाम दैनंदिन कार्यांवर देखील पडतो. म्हणून नियमितपणे सूर्यनमस्कार केल्यास रात्री लवकर झोप येते. सूर्य नमस्कार केल्याने मन आणि बुद्धी दे की शांत होते.

 3. वजन कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार
  सूर्य नमस्कार चे फायदे मध्ये वजन कमी होणे हा एक महत्त्वाचा फायदा आहे. आज अनेक लोक वाढत्या वजनाच्या समस्येने त्रस्त आहेत. सूर्यनमस्कार केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न होऊन जलद गतीने वजन कमी होऊ लागते.

 4. एकाग्रतेत वाढ
  चलबिचल मन आणि अशांत बुद्धी मुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रतेची कमतरता होऊ लागते. ज्यामुळे कोणतेही कार्य करीत असताना त्यावर संपूर्ण एकाग्रचित्त होता येत नाही परंतु सूर्यनमस्कार केल्यास तुमची एकाग्रता वाढायला लागेल व कोणतेही करू तुम्ही आधीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने करू शकाल.

 5. शरीर लवचिक बनते
  सूर्यनमस्कार करणाऱ्या व्यक्तीचे संपूर्ण शरीर लवचिक बनते. सूर्यनमस्कार केल्याने संपूर्ण शरीराचा योग्य व्यायाम होतो, ज्यामुळे शरीरात लवचिकपणा येतो आणि खाली वाकणे व इतर कामे करतांना होणारा ताण कमी होतो.

 6. मासिक पाळी मध्ये सूर्यनमस्कार चे फायदे
  महिलांमध्ये होणार्या समस्या जसे मासिक पाळी वेळेवर न येणे. व यासारख्या इतर शरीरी समस्या मध्ये सूर्यनमस्कार फार प्रभावी आहे. नियमितपणे सूर्यनमस्कार करणाऱ्या अनेक महिलांना अनेक समस्यांमध्ये आराम मिळाला आहे.

 7. ब्लड सर्कुलेशन
  सूर्यनमस्कार एक उत्तम शारीरिक ऍक्टिव्हिटी आहे ज्यामुळे संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण सुरळीत होते. आणि सूर्यनमस्कार केल्याने व्यक्ती संपूर्ण दिवस ऊर्जावान राहतो.

 8. त्वचेवरील सुंदरतेत वाढ
  बऱ्याचदा पोट साफ न झाल्याने त्वचा संबंधित समस्या निर्माण होतात. म्हणून त्वचा सुंदर ठेवण्यासाठी नियमित सूर्यनमस्कार करण्याचे अनेक फायदे होतात. सूर्यनमस्कार केल्याने चेहऱ्यावर असणाऱ्या सुरकुत्या देखील घालवता येतात.

सूर्य नमस्कार मंत्र मराठी – surya namaskar mantra in marathi

आदित्यस्य नमस्कारन् ये कुर्वन्ति दिने दिने।
आयुः प्रज्ञा बलम् वीर्यम् तेजस्तेशान् च जायते॥

Surya namaskar mantra in marathi : सूर्यनमस्कार च्या या मंत्राचा अर्थ असा आहे की जो कोणी सूर्यनमस्कार करतो त्याला दीर्घायुष्य, प्रज्ञा, शक्ति, तेज आणि वीर्यची प्राप्ती होते. याशिवाय प्रत्येक आसनासोबत एक मंत्र बोलला जातो. ते सर्व मंत्र प्रत्येक आसनाखाली देण्यात आले आहेत.

surya namaskar information, benefits, mantra steps in marathi

सूर्यनमस्कार कसा करावा – surya namaskar steps in marathi

सूर्यनमस्कार मध्ये एकूण 12 आसनांचा समावेश आहे. सूर्य नमस्कार चे स्टेप्स surya namaskar steps in marathi, सूर्यनमस्कार कसा करावा याविषयी पुढे माहिती देण्यात आली आहे.

प्रणामासन

सूर्यनमस्काराचे पहिले स्टेप प्रणामासन असते. प्रणामासन करण्यासाठी सर्वात आधी जमिनीवर मँट अंथरुण घ्यावी. त्यानंतर मॅट वर दोघी पाय एकमेकांना जोडून उभे राहावे व यानंतर दोन्ही हात जोडून (जसे नमस्ते च्या पोझिशन मध्ये असतात तसे) छाती जवळ धरावेत. या आसणाला प्रणामासन म्हणतात.
मंत्र : ॐ मित्राय नमः

हस्त उत्तानासन

हस्त उत्तानासन हे सूर्यनमस्काराचे दुसरे स्टेप आहे. यामध्ये जोडलेले दोन्ही हात वरच्या बाजूला न्यावेत आणि आता जेवढे मागे हात नेता येतील तेवढे न्यावेत. व कंबर मागच्या बाजूला वाकवावे. काही वेळ या पोझिशनमध्ये थांबावे.
मंत्र : ॐ रवये नमः।

पादहस्तासन

सूर्यनमस्काराच्या तिसऱ्या स्टेप मध्ये पुढील बाजूला वाकत हातांनी पायाच्या टाचेला स्पर्श करायचा आहे. यादरम्यान तुमचे डोके गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करावा.
मंत्र : ॐ सूर्याय नम:

अश्व संचालनासन

हे आसन करताना आपल्या उजव्या पायाला मागील बाजूला लोटावे आणि हाताना पुढील बाजूला जमिनीवर ठेवावे. या दरम्यान तुमचा उजवा पाय मागील बाजूला पूर्णपणे सरळ असू द्या व डावा पाय गुडघ्यातून वाकवून आपले डोके वरच्या बाजूला न्यावे.
मंत्र : ॐ भानवे नमः।

दंडासन

दंडासन अथवा चतुरंग दंडासन म्हणून ओळखले जाणारे हे आसन करण्यासाठी आपले दोन्ही पाय मागील बाजूला न्यावेत व हात पुश अप च्या पोझिशन मध्ये ठेवावे यादरम्यान आपले कंबर सरळ असू द्यावे.
मंत्र : ॐ खगाय नमः।

अष्टांग नमस्कार

हाताचे पंजे व पायाचे तडवे यांची स्थिती आहे तशीच ठेवा. गुढघे जिमनीवर टेकवा. शरीराचे वजन हातावर घ्या. कोपरामध्ये वाका. हनुवटी छातीला टेकवा. साष्टांगनमस्कारासन स्थिती मध्ये कपाळ, छाती, हात, गुढघे पाय जमिनीवर टेकवा. दोन्ही कोपरे शरीराजवळ घ्या नाभिकेंद्र व पार्श्वभाग वर उचलून धरा.
मंत्र : ॐ पूष्णे  नमः।

भुजंगासन

हाताचे पंजे आहे त्या ठिकाणीच ठेवा. पंजावर शरीराचा भार द्या. कोपरामधील वाक काढा. हात सरळ करा. खांदे वर उचला. डोके आणि खांदे मागे खेचा. पोट व कंबर दोन्ही हाताच्या मध्ये सरकिवण्यांचा प्रयत्न करा. घोटे गुढघे बांधलेले तसेच ठेवा. गुढघे जमिनीला टेकवा. छातीमध्ये हवा भरून घ्या. नजर वर आकाशाकडे लावा.
मंत्र : ॐ हिरण्यगर्भाय नमः।

अधोमुख श्वानासन

हाताचे पंजे व पायाचे तडवे यांची जागा तीच ठेवा. शरीराचा मधला भाग वर उचला. कंबर हात पाय यांचा त्रिकोण तयार करा. तो वर उचलून धरा. तडवे व टाच पूणर्पणे जिमनीवर टेकवा. हात आणि पाय सरळ ठेवा. कोपर गुढघे सरळ ताणलेल्या स्थितीमध्ये ठेवा. डोके पाठीच्या रेषेमध्ये ठेवा. हनुवटी छातीला टेकवा.
मंत्र : ॐ मरीचये नमः।

अश्व संचालनासन

दोन्ही हातांच्या पंजांची जागा तीच ठेवा. डावा पाय डाव्या हाताजवळ आणा. डावा पाय आणि दोन्ही हात जमिनीवर रोवा. डाव्या पावलावर बसा. त्यावर शरीराचा भार द्या. (पोटरी, मांडीचा मागचा भाग आणि छातीचे शेवटचे हाड जवळ आणा.) उजवा पाय मागे घ्या. उजव्या पायाचा तडवा जमिनीवर पक्का ठेवा. उजव्या पायाचा गुढघा आणि डाव्या पायाचा तडवा जमिनीवर टेकवा. दोन्ही हात सरळ ठेवा. त्यांना वर उचला. छाती पुढे काढा. खांदे वर उचला. डोके मागे झुकवा.
मंत्र : ॐ आदित्याय नम:।

उत्तानासन

उजवा पाय डाव्या पायाजवळ आणा. सावकाश गुढघे सरळ करा. पार्श्वभाग वर उचला. सहज जेवढे वाकता येईल तेवढे खाली वाका. गुडघे किंवा टाचेवर ताण येणार नाही कडे लक्ष द्या. हनुवटी छातीला टेकवा. कपाळ गुढघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा.
मंत्र : ॐ सवित्रे नमः।

हस्त उत्तानासन

सरळ उभे रहा. उजव्या पायाचा अगठा व टाच डाव्या पायाशी घ्या. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये छातीच्या मध्यभागी. हाताचे पंजे जुळवा. बोटे जुळवा. बोटे छातीकडे झुकलेले. पंजा जमिनीला काटकोनात. अगठ्याचे मूळ छातीच्या मध्यभागी. कोपर जमिनीला समांतर. छाती पुढे काढा. खांदे मागे ढकलून खाली ओढा. नजर समोर ठेवा. जे स्नायू ताण-दाब कक्षेत येत नाहीत ते शांत-स्थिर मोकळे आहेत ह्याची काळजी ह्या थोडे थांबा. ताण दिलेले स्नायू मोकळे करा.
मंत्र : ॐ अर्काय नमः।

प्रणामासन

प्रणामासन करण्यासाठी सर्वात आधी जमिनीवर मँट अंथरुण घ्यावी. त्यानंतर मॅट वर दोघी पाय एकमेकांना जोडून उभे राहावे व यानंतर दोन्ही हात जोडून (जसे नमस्ते च्या पोझिशन मध्ये असतात तसे) छाती जवळ धरावेत. या आसनाला प्रणामासन म्हणतात.
मंत्र : ॐ भास्कराय नमः

सूर्यनमस्कार किती घालावे ?

जर आपण नवीन असाल व पहिल्यांदाच सूर्यनमस्कार करीत असाल तर सुरुवात ही 5 सूर्यनमस्कार पासून करावी. सुरुवातीला 5 सूर्यनमस्कार घालावेत यानंतर त्यांना हळू हळू वाढवीत 12 पर्यन्त न्यावे.

शेवटचे शब्द

तर मित्रहो या लेखात आपण surya namaskar information in marathi म्हणजेच सूर्य नमस्कार चे प्रकार, सूर्यनमस्कार कसा करावा, सूर्य नमस्कार चे फायदे मराठी (surya namaskar benefits in marathi), सूर्य नमस्कार मंत्र (surya namaskar mantra in marathi). म्हणजेच एकंदरीत सूर्यनमस्कार विषयी ची संपूर्ण माहिती मिळवली. आशा आहे हा लेख पूर्ण वाचल्यावर आपल्या मनातील सूर्य नमस्कार विषयी च्या सर्व शंका दूर झाल्या असतील.

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

2 thoughts on “सूर्य नमस्कार चे फायदे व प्रकार मराठी | surya namaskar information, benefits, mantra in marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *