इसबगोल आयुर्वेदिक औषधि मराठी माहिती | Isabgol Benefits and Uses in Marathi

इसबगोल मराठी माहिती – Isabgol Information Benefits and Uses in Marathi : मित्रांनो आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत चुकीचा आहार, अव्यवस्थित झोप, शारीरिक श्रमाची कमतरता इत्यादी कारणांमुळे आरोग्याला धोका निर्माण होत आहे. आजकल अनेक लोक बद्धकोष्ठता म्हणजेच पोट साफ न होण्याच्या समस्येने त्रस्त आहेत व ह्या रुग्णांमध्ये प्रतिदिन वाढ होत आहे. अनेक डॉक्टरांचे व विशेषज्ञांचे मानने आहे की इसबगोल हे आयुर्वेदिक औषध बद्धकोष्ठतेच्या समस्येत रामबाण औषध म्हणून सिद्ध झाले आहे. परंतु याशिवाय देखील इसबगोलचे अनेक फायदे आहेत. ज्या विषयीची माहिती ही इसबगोल चे फायदे व इसबगोल मराठी माहिती या पुढील लेखात देण्यात आलेली आहे.

इसबगोल आयुर्वेदिक औषधि मराठी माहिती

इसबगोल काय आहे? इसबगोल ची मराठी माहिती

इसबगोल गहू सारखे दिसणारे एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वृक्षाला लहान लहान पाने आणि फुले असतात. वनस्पतीच्या फांद्यांवर सफेद रंगाचा जो पदार्थ चिटकलेला असतो त्यालाच इसबगोल म्हटले जाते. इसबगोल मध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये इसबगोलची शेती केली जाते. आपल्या देशातून अनेक देशांमध्ये इसबगोल निर्यात केले जाते. इसबगोलच्या फायद्यांमुळे त्याच्या मागणीत आणि किमतीत वाढ झालेली आहे. पुढे आम्ही आपणास इसबगोल चे फायदे कोणते आहेत याबद्दलची माहिती देत आहोत.

इसबगोल चे फायदे

आरोग्य संबंधी अनेक समस्यांमध्ये इसबगोल लाभकारी आहे. परंतु गंभीर रोगांमध्ये इसबगोल चा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यावरच करावा.

बद्धकोष्ठतेच्या समस्येसाठी इसबगोल चे फायदे

इसबगोल हे पोट आणि जवळपास पोटासंबंधीच्या सर्वच समस्यांमध्ये उपयोगी आहे. इसबगोल मध्ये असलेले फायबर laxative म्हणून कार्य करते. रात्रीच्या जेवणाच्या एक तासानंतर आपण एक चमचा इसबगोल कोमट पाण्यात मिक्स करून सेवन करू शकतात. असे 5 दिवस केल्याने आतड्या गतिशील होतात आणि शरीरात असलेला मल त्याग करणे सहज होते. इसबगोल सेवनाच्या काही दिवसातच बद्धकोष्ठतेचे समस्या ठीक होऊ लागते. पोट साफ होण्यासाठी उपाय <<येथे वाचा

पचनासाठी उपयोगी

एका निरोगी शरीरासाठी पचन व्यवस्थित होणे आवश्यक आहे. इसबगोलच्या laxative गुणधर्मामुळे याचा पचनावर विशेष प्रभाव होतो. इसबगोलच्या काही काळ सेवनाने आपले पचन सुधारू लागेल आणि पचनशक्ती वाढेल.

वजन कमी करण्यासाठी उपयोगी

वजन कमी करण्यासाठी देखील इसबगोल फायदेशीर ठरू शकते. यामध्ये फायबर चे प्रमाण प्रचुर असते. आणि, फायबर युक्त आहार घेतल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे अतिरिक्त अन्न खाण्याची इच्छा कमी होते. अशा प्रकारे ते वजन नियंत्रित करण्यासाठी कार्य करते. वाचा> वजन कमी करण्याचे घरगुती उपाय

मूळव्याध आणि फिशरच्या उपचारात उपयुक्त

बद्धकोष्ठता हे मूळव्याध आणि फिशरचे मुख्य कारण आहे. अन्नाचे पचन नीट न झाल्याने आणि मलविसर्जनात अडचण आल्याने गुदद्वाराच्या आजूबाजूच्या नसांना सूज येऊन मूळव्याधची समस्या निर्माण होते. जर तुम्ही इसबगोल घेत असाल, तर ते तुमच्या स्टूलमध्ये पाण्याचे प्रमाण वाढवते आणि त्याला मऊ करते, ज्यामुळे स्टूल जाणे सोपे होते आणि त्या दरम्यान वेदना होत नाहीत. म्हणूनच पाईल्स आणि फिशरच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इसबगोल घेणे आवश्यक आहे.

अॅसिडिटीपासून आराम

पोटात अॅसिडिटी होणे ही एक सामान्य समस्या आहे, काही वेळा काही हानिकारक, फास्ट फूड व इतर काही गोष्टी खाल्ल्यानंतर अॅसिडिटी होते. अनेकदा हा त्रास रात्रीचे जेवण केल्यानंतर अधिक होतो. अॅसिडिटीमुळे पोट फुगणे किंवा आंबट ढेकर येणे सुरू होते. जर तुम्हाला ही समस्या वारंवार होत असेल तर इसबगोलची भुसी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

इसबगोल खरेदी

इसबगोल हे औषध आपल्याला कोणत्याही जवळच्या आयुर्वेदिक स्टोर अथवा मेडिकल वर मिळून जाईल. याशिवाय आपण ऑनलाइन देखील उत्तम गुणवत्तेचे इसबगोल खरेदी करू शकतात. ऑनलाइन इसबगोल खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

इसबगोल खाण्याची योग्य पद्धती

इसबगोल योग्य पद्धतीने सेवन केल्यास त्याचे लाभ मिळतात. पुढे आपणास इसबगोल सेवणाची योग्य पद्धती कोणती आहे या विषयी ची माहिती देत आहोत.

  • इसबगोल पाण्यात भिजवून घेता येते.
  • इसबगोल दुधात मिसळूनही सेवन केले जाते.
  • इसबगोल त्रिफळा पावडरमध्ये मिसळूनही खाता येते.
  • दह्यासोबत इसबगोलही खाल्ले जाते.

केव्हा खावे – इसबगोल सकाळी आणि रात्री जेवल्यानंतर सेवन केले जाऊ शकते. तथापि, गर्भधारणेदरम्यान सेवन करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

किती खावे – 5-10 ग्रॅम इसबगोल एका दिवसात खाऊ शकतो. संशोधनानुसार, कोलेस्टेरॉलचा त्रास असलेल्या लोकांना दररोज 5.1 ग्रॅम इसबगोल देणे फायदेशीर आहे. हे प्रमाण व्यक्तीच्या वयानुसार आणि आरोग्यानुसार कमी-जास्त असू शकते, म्हणून ते सेवन करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

इसबगोल सेवनाचे स्टेप्स

१- एक ग्लास कोमट पाण्यात एक ते दोन चमचे इसबगोल चूर्ण मिसळा आणि रात्री जेवल्यानंतर सेवन करा.

२- एक ते दोन चमचे इसबगोल चूर्ण दह्याच्या भांड्यात मिसळा. गोडपणासाठी, आपण चवीनुसार साखर देखील घालू शकता. इसबगोल आणि दही यांचे मिश्रण अतिसारापासून आराम देण्यासाठी खूप प्रभावी आहे. इसबगोल आणि दही खाल्ल्यानंतर काही वेळाने एक ग्लास पाणी प्या.

3- पोट साफ करण्यासाठी एक चमचा त्रिफळा चूर्ण आणि दोन चमचे इसबगोल चूर्ण एकत्र करून रात्री कोमट पाण्यासोबत सेवन करा.

इसबगोल सेवन करण्याआधी या गोष्टी लक्षात घ्या

  • जर आपणास अपेंडिसायटिस किंवा पोटात ब्लॉकेज यांसारख्या समस्यांनी ग्रासले असेल, तर इसबगोलचे सेवन करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • गरोदरपणात महिलांनी कोणतेही आयुर्वेदिक औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सेवन करावे. त्यामुळे जर तुम्ही गरोदर असाल आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी इसबगोलचे सेवन करायचे असेल, तर सर्वप्रथम तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांना विचारा.
  • तीन वर्षांखालील मुलांनी इसबगोल देणे टाळावा.
  • इसबगोल पावडर कधीही थेट गिळण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्याने ते घशात अडकून गंभीर खोकला किंवा घशात जळजळ होण्याची समस्या होऊ शकते. इसबगोल नेहमी पाण्यासोबत किंवा दह्यासोबत घ्या.

तर मित्रहो इसबगोल मराठी माहिती या लेखात आम्ही आपल्यासाठी इसबगोल चे फायदे व इसबगोल आयुर्वेदिक औषधि चा वापर याविषयी ची संपूर्ण माहिती शेअर केली आहे. isabgol benefits and uses in marathi संबंधी जर आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की विचारवेत. व आरोग्य विषयी ची अशीच उपयुक्त माहिती वाचत राहण्यासाठी माझी काळजी या आमच्या वेबसाइट ला नक्की भेट देत रहा. धन्यवाद.

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *