रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय | How to increase immunity in marathi

how to increase immunity in marathi : इम्युनिटी ला मराठी भाषेत रोगप्रतिकारक शक्ती म्हटले जाते. आपल्या शरीराला सर्दी-खोकला, एलर्जी व इतर शारीरिक रोगांपासून लढण्याकरिता चांगल्या रोग प्रतिरोधक क्षमतेची आवश्यकता असते. आजकालचे खान पान आणि चुकीच्या लाईफस्टाईल मुळे इम्युनिटी कमी होत आहे. जर निरोगी शरीर हवे असेल तर या इम्युनिटी ला वाढवणे खूप आवश्यक आहे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय सांगणार आहोत. तर चला सुरू करुया…

how to increase immunity in marathi

रोग प्रतिकारक शक्ती कमी असण्याची लक्षणे

ज्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ति कमी असते त्याला आपल्या शरीरात पुढील लक्षणे दिसू लागतात.

  • सारखा सुखा अथवा कोरडा खोकला
  • शरीर थरथरणे
  • अस्वस्थ आणि बेचैन वाटणे
  • ताप येणे
  • डोके दुखणे
  • भूक न लागणे
  • खाल्लेले न पचणे
  • उलटी होणे
  • दीर्घ श्वास घेण्यात परेशानी होणे
  • छातीत दुखणे

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय | how to increase immunity in marathi

रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय आहारातील बदल हाच आहे. म्हणून आता आपण जाणून घेऊया की तुम्ही तुमच्या आहारात कोणते बदल करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतात.

पुरेशा प्रमाणात प्रोटीन
जर रोगांशी लढण्याची शक्ती वाढवायचे असेल तर पुरेशा प्रमाणात प्रोटीन युक्त आहार घ्यायला हवा. योग्य डायट प्लॅन फॉलो करायला हवा. भारतीय जेवणात साधारणतः डाळ, भात, चपाती व भाज्यांचा समावेश असतो. ह्या भोजनात मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि सप्लीमेंट असतात. म्हणून दररोज या गोष्टी आपल्या आहारात सामील कराव्यात.

हळद पावडर, मध आणि दूध
अर्धा चमचा हळद पावडर व थोडे मध दुधात टाकून दररोज रात्री झोपण्याआधी प्यावे. नियमितपणे हा उपाय केल्याने इम्मुनिटी वाढते आणि रोगांशी लढण्याची क्षमता विकसित होते.

आवळा पावडर आणि मध
एक चमचा मध मध्ये अर्धा चमचा आवळा पावडर टाकून रोज सकाळी प्यावे. आवळ्या मध्ये सी विटामिन भरपूर प्रमाणात असते. सी विटामिन रोगप्रतिकारशक्ती ला चमत्कारी पद्धतीने वाढवते.

लसुन
लसुन च्या उपयोगाने रोग प्रतिकार शक्ती वाढवली जाऊ शकते. एका संशोधनातून लक्षात आले आहे की लसूण मध्ये इम्यूनोमॉड्यूलेटरी (immunomodulatory) गुणधर्म असतात जे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. लसुन चा उपयोग करण्यासाठी सर्वात आधी लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या कुटून पेस्ट बनवावे. आता या पेस्टमध्ये मध टाकून दररोज याचे सेवन करावे. अधिक वाचा>> लसूण खाण्याचे फायदे

लसूण शरीरातील रक्ताचा प्रवाह सुरळीत करण्यासोबतच रक्तशुद्धी चे देखील कार्य करतो. लसुन चे सेवन केल्याने शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि व्यक्ती निरोगी राहतो. परंतु लसणाचा अधिक उपयोग करू नये खासकरून उन्हाळ्याच्या दिवसात जास्त लसूण खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढू लागते ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

प्रतिकार शक्ती कशी वाढवावी याबद्दल इतर टिप्स

योग करावा
संशोधनातून सिद्ध झाले आहे की नियमित योग केल्याने शरीरातील इम्युनिटी तर वाढतेच परंतु मानसिक तणाव देखील कमी होतो. योग एक नैसर्गिक इम्मुनिटी बूस्टर आहे. नियमित योग केल्याने ताण-तणाव, झोप न येणे, शारीरिक रोग, पीडा आणि इतर समस्यांपासून मुक्ती मिळते. पचनशक्ती वाढवण्यासाठी देखील योग खूप प्रभावकारी आहे. म्हणून दररोज नियमितपणे सकाळी 30 मिनिटांपर्यंत योग करावा.

ऊन
ऊन हे निसर्गाने दिलेले एक इम्मुनिटी बूस्टर आहे. उन्हात डी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. ज्या लोकांना आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे. त्यांनी नियमितपणे दररोज 20 मिनिटे सकाळच्या कोवळ्या उन्हात बसावे. तुम्ही या कालावधीमध्ये उन्हात योग देखील करू शकतात. म्हणजे एकसोबत दोन्ही कामे होतील.

तनाव दूर ठेवा
तान तनाव आणि चिंता ग्रस्त असणाऱ्या लोकांमध्ये हार्मोन्स चा स्त्राव वाढतो. ज्यामुळे इम्मुन सिस्टम कमजोर होऊ लागते. म्हणून विनाकारण चिंता करणे टाळावे. जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. एका शोधातून लक्षात आले आहे की भारतातील 10 मधून 9 लोक तणावग्रस्त आहे. जास्त ताण तणाव केल्याने तुमच्यासमोर हृदय रोग, बीपी आणि डायबिटीस च्या समस्या उभ्या राहू शकतात. म्हणून दररोज ध्यान, पुस्तके वाचन, कुटुंबासोबत वेळ घालवणे, योग करणे इत्यादी सवयी स्वतःला लावाव्यात.

तर मित्रांनो ह्या लेखात आपण how to increase immunity in marathi म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी या बद्दलचे उपाय. आशा करतो की ही माहिती आपणास उपयोगी ठरली असेल आणि ह्या महितीला वाचल्यानंतर आपणही असेच अनुसरण करून काही महिन्यातची आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून निरोगी शरीर प्राप्त कराल. आरोग्य आणि रोगांवरील घरगुती उपाय मिळवण्यासाठी आमची वेबसाइट https://majhikalaji.com/ भेट देत राहा. धन्यवाद…

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *