ग्रीन टी कधी प्यावी, कशी बनवायची व ग्रीन टी चे फायदे । Green tea benefits in marathi

ग्रीन टी चे फायदे मराठी व ग्रीन टी कधी प्यावी green tea benefits in marathi : सध्याच्या काळात लोक स्वतःचे आरोग्य व फिटनेस कडे जरा जास्तच लक्ष देत आहेत आणि ते देणे गरजेचे देखील आहे. आज अनेक नवनवीन रोग निर्माण होत आहेत. जर आपल्याला एक तंदुरुस्त आणि निरोगी शरीर हवे असेल तर नियमित व्यायामासोबत ग्रीन टी च्या सेवनाने दिवसाची सुरूवात केली तर फार बरे होईल. ग्रीन टी चे सेवन अनेक घटक रोगांपासून आपले रक्षण करू शकते. यासोबतच ग्रीन टी पिण्याचे इतरही अनेक फायदे आहेत ज्या विषयी आपण पुढे पाहुया…

ग्रीन टी म्हणजे काय ?

ग्रीन टी ही एक हिरव्या रंगाची पाने असलेली वनस्पती आहे, जिचे रासायनिक नाव कमेलिया सिनेसिस (Camellia sinensis)असे आहे. ग्रीन टी ही सर्व प्रथम चीन मध्ये उत्पादित करण्यात आली. नंतरच्या काळात ती पूर्व एशिया या भागात आली. ग्रीन टी चे अनेक फायदे आहेत. ज्यामुळे आज ग्रीन टी चा वापर अधिकच वाढला आहे. आपल्या देशात देखील आज लोक चहाच्या जागी ग्रीन टी तसेच काळा चहा म्हणजेच ब्लॅक टी पिऊ लागले आहेत.

ग्रीन टी पिण्याचे फायदे – green tea benefits in marathi

 • वजन कमी करण्यासाठी मदत करते
  ग्रीन टी मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे आपल्या शरीरातून टाकाऊ पदार्थांना तसेच टॉक्सिनला बाहेर काढण्यास मदत करते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते व अति लठ्ठपणा देखील कमी होतो. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी चे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते.

 • मधुमेहासाठी फायदेशीर
  वजन कमी करण्यासोबतच ग्रीन टी मधुमेहासाठी देखील उपयोगी ठरते. अँटी इन्फ्लेमेंत्री गुणधर्म असल्यामुळे मधुमेहाच्या रोग्यांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

 • हातापायाच्या व सांध्याच्या संधिवातासाठी
  हातापायाच्या व सांध्यांच्या संधिवातासाठी ग्रीन टी ही लाभकारी आहे. तसेच ग्रीन टी घेतल्यानंतर जो त्रास संधिवातामध्ये होत असतो त्यातही आराम मिळतो म्हणून साधं पाणी पिण्यापेक्षा ग्रीन टी पीने हे संधिवात असणाऱ्यांसाठी उत्तम असते.

 • रूक्ष त्वचेपासून व त्वचेचा कॅन्सर
  ग्रीन टी ही त्वचेसाठी देखील उत्तम आयुर्वेदिक औषध आहे. ग्रीन टी चे सेवन एक्झिमा व जेनिटल वार्ड यासारख्या रोगांसाठी लाभकारी ठरते.

 • मेंदूचे आरोग्य
  मेंदूच्या आरोग्यासाठी देखील ग्रीन टी महत्त्वाची आहे. National Center for Complementary and Integrative Health अनुसार मानसिक सतर्कता वाढवण्यासाठी ग्रीन टी अतिशय महत्त्वाची आहे. ग्रीन टी मध्ये असलेले केफॅन हे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टम ला उत्तेजित करते.

 • हृदयासाठी
  हृदयाच्या आरोग्यासाठी म्हणजेच शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम ग्रीन टी करत असते. त्यामुळे अति लट्ठपणा तर कमी होतोच परंतु त्यासोबतच धमन्यांमध्ये जमा होणारे कोलेस्ट्रॉल तयार होत नाही अथवा कमी प्रमाणात निर्माण होते आणि यामुळे रक्तप्रवाह सुरळीत चालतो व हृदयाचा धोका कमी होतो.

 • तनाव कमी करते
  ज्या लोकांना जास्त तणाव व थकवा येत असतो, त्यांनी दिवसातून कमीत कमी एकदा तरी ग्रीन टी घ्यावी. कारण ग्रीन टी तनाव कमी करते सोबतच सकाळी ग्रीन टी चे सेवन केल्यास थकवा देखील कमी येतो आणि दिवसभर ताजेतवाने वाटते.
ग्रीन टी कधी प्यावी
ग्रीन टी कधी प्यावी

ग्रीन टी कशी बनवायची

बाजारात ग्रीन टी ही दोन स्वरूपात उपलब्ध आहे. एक म्हणजे हिरव्या रंगाची पानेदार सुकवलेली व दुसरी टी बॅग म्हणून. पुढे आपणास दोन्ही पद्धतीच्या ग्रीन टी बनवण्याची रेसिपी दिली आहे.

ग्रीन टी बनवण्याची पहिली पद्धत

साहित्य

 1. ग्रीन टी चे पाने(पत्ते) एक चमचा
 2. एक कप पाणी
 3. एक भांडे

कृती

सर्वप्रथम भांड्यात एक कप पाणी उकळायला ठेवावे. पाणी उकळल्यावर ते कपात काढून त्यात ग्रीन टी ची पाने टाकून तीन मिनिटापर्यंत राहू द्यावे. नंतर पाण्याचा रंग हिरवा झाल्यावर चाळणीने पानी गळून घ्यावे व उरलेल्या पाण्यात थोडे मध टाकावे. तुमची ग्रीन टी तयार झाली आहे. आता आपण याचे सेवन करू शकतात.

ग्रीन टी बनवण्याची दुसरी पद्धत

साहित्य

 1. ग्रीन टी बॅग
 2. एक कप पाणी

कृती

पाणी गॅसवर गरम करून घ्यावे. नंतर उकडलेले पाणी एका ग्लासमध्ये किंवा कपात काढून त्यात ग्रीन टीची बॅग बुडवावी व तीन ते चार मिनिटांसाठी तशीच राहू द्यावी. थोड्या वेळाने टी बॅग बाहेर काढून घ्यावी. अशा पद्धतीने आपण टी बॅग च्या सहाय्याने ग्रीन टी बनवू शकतो.

ग्रीन टी कधी प्यावी

ग्रीन टी पिण्यासाठी देखील एक कालावधी असतो त्या दरम्यान ग्रीन टी घेतल्याने जास्त फायदेशीर ठरते.

 • ग्रीन टी कधीही खाली पोट घेऊ नये
  काही लोकांना वाटते की ग्रीन टी पहाटे भुकेपोटी घेतल्यानंतर जास्त फायदेशीर असते, परंतु तसे नसून भुकेपोटी घेतल्याने तिचे दुष्परिणामच जास्त होतात. खालीपोट ग्रीन टी पिल्याने त्याचा यकृतावर परिणाम होतो व ॲसिडिटीचा देखील त्रास होतो.

 • सकाळचा नाश्ता झाल्यानंतर ग्रीन टी घेणे
  ग्रीन टी कधी प्यावी तर ग्रीन टी पिण्याची उत्तम वेळ सकळच्या नाश्त्याला दोन ते तीन तास झाल्यावरची आहे. सकाळच्या नाश्त्यानंतर व दुपारच्या जेवणाआधी ग्रीन टी चे सेवन करावे. असे केल्याने आपल्या शरीराला ग्रीन टी चे अधिकाधिक फायदे मिळतात. तसेच ग्रीन टी घेतल्याच्या दोन तासानंतरच जेवण करावे.
 • दिवसभरातूनआपण 2-3 कप ग्रीन टी सेवन करू शकतात.
 • झोपन्याआधी कधीही ग्रीन टी घेऊ नये.
 • ग्रीन टी घेतल्यानंतर व्यायाम
  ग्रीन टी नंतर व्यायाम करणे उत्तम मानले जाते, कारण ग्रीन टी मुळे आपल्या शरीराचा चयापचय म्हणजेच मेटाबोलिजमचे प्रमाण वाढलेले असते त्यामुळे ज्या लोकांना शरीर फिट ठेवायचं असेल, त्यांनी ग्रीन टी घेतल्यावर व्यायाम करणे फायदेशीर ठरेल.

तर अशा पद्धतीने दैनंदिन जीवनात ग्रीन टी कधी प्यावी हे कळल्यास आपणास ग्रीन टी चे फायदे मिळू शकतात. परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक शेवटी नुकसानदायक असतो म्हणून दिवसातून २ वेळेस पेक्षा जास्त ग्रीन टी चे सेवन करू नये. आजच्या या लेखातील green tea benefits in marathi आपणास उपयोगी ठरले असतील अशी अशा आहे. हा माहिती इतरांसोबतही share करा. जेणेकरून त्यांनाही या विषयी कळेल.

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *