मुळव्याध कसा ओळखावा व घरगुती उपाय | Piles treatment at home in marathi | mulvyadh upay

मुळव्याध वर घरगुती उपाय व मुळव्याध कसा ओळखावा mulvyadh upay : पाइल्स अर्थात मुळव्याध म्हणून ओळखली जाणारी ही बिमारी अत्यंत त्रासदायक असते. या रोगात मलाशय मधील अथवा बाहेरील नसांमध्ये सुजन येते. ज्यामुळे गुदाद्वार जवळ रक्त येणे, गुदा क्षेत्रात चुळचुळ होणे व संडासच्या जागेवर आग होणे यासारख्या समस्या निर्माण होतात.

आजच्या या लेखात आपण मूळव्याध कसा ओळखावा म्हणून मूळव्याध लक्षणे, मुळव्याध वर घरगुती उपाय (mulvyadh gharguti upay) जाणून घेणार आहोत हे मुळव्याधासाठी चे घरगुती उपाय आपणास या रोगात काही प्रमाणात आराम देऊ शकतात.

मूळव्याध कसा ओळखावा व मूळव्याध लक्षणे

piles symptoms in marathi : अनेकदा मूळव्याध कसा ओळखावा हे लक्षात येत नाही. जर मूळव्याध गंभीर अवस्थेत पोहोचलेली नसेल तर तुम्ही 4 ते 5 दिवसात देखील बरे होऊ शकतात. परंतु हा रोग वाढण्याची मूळव्याध लक्षणे पुढील प्रमाणे आहेत.

 • गुदाद्वार आणि त्याच्या आजूबाजूला कठोर गाठ वाटणे व ही गाठ दुखणे आणि रक्त येणे.
 • शौच केल्यानंतरही पोट साफ न झाल्यासारखे वाटणे.
 • शौचालया दरम्यान जलन वाटणे आणि रक्त येणे.
 • बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होणे.

मूळव्याध होण्याची कारणे

अनेक वैद्य आणि डॉक्टरांनी सांगितले आहे की मुळव्याध होण्याचे प्रमुख कारण तुमचे असंतुलित खानपान असते. जर कोणी तिखट व तेलयुक्त पदार्थांचे सेवन अधिक करीत असेल किंवा मांस व पोटात जलन आणि बद्धकोष्ठता निर्माण करणारे पदार्थ खात असेल तर अशा व्यक्तीला मूळव्याध होण्याची शक्यता असते. पुढे मूळव्याध होण्याची काही करणे देण्यात आली आहे.

 • दीर्घकाळ उभे राहून अथवा दीर्घकाळ बसून काम केल्याने किंवा अत्याधिक वजन उचलल्याने मूळव्याध होण्याची शक्यता असते.
 • बद्धकोष्ठता मूळव्याध होण्याचे प्रमुख कारण आहे. जर तुमचे पोट साफ होत नसेल तर तुम्हाला मुळव्याध होण्याची शक्यता आहे.
 • अधिक तळलेले व मिरची आणि मसाले असलेले पदार्थ खाल्ल्याने.
 • फायबरयुक्त भोजन सेवन न केल्याने.
 • महिलांमध्ये प्रसूती दरम्यान गुदा क्षेत्रावर अधिक दबाव पडल्याने देखील मुळव्याध उद्भवू शकते.
 • आळस व व शारीरिक हालचाल कमी करणे
 • धूम्रपान आणि दारू पिणे.

मुळव्याध वर घरगुती उपाय – piles mulvyadh gharguti upay

आयुर्वेदात मुळव्याध वर अनेक घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत. पुढे आपणास काही उपाय देत आहोत, यापैकी जे उपाय आपल्याकडून शक्य होतील ते आपण करून पाहू शकतात.

कोरफड

कोरफड मध्ये अनेक सूजन निरोधक आणि नैसर्गिक घाव भरणारे गुणधर्म असतात. मुळव्याधच्या समस्येत कोरफड अत्यंत उपयोगी घरगुती उपाय आहे. शोधातून सिद्ध झाले आहे की कोरफडच्या उपयोगाने मुळव्याध मधील जलन कमी करता येते.

बाह्य मूळव्याध उपाय साठी आपण आपल्या गुदाद्वारावर कोरफड चे जेल लावू शकतात. याशिवाय आपण कोरफड चे पान कापून त्यामधील गर बाहेर काढून त्याला एका कापडाच्या पट्टीवर ठेवून गुदाद्वार ला गुंडाळून काही वेळ ठेवू शकतात. हा उपाय नियमित केल्यास काही दिवसातच मुळव्याध मधील दुखणे कमी होईल.

याशिवाय पोट साफ होण्यासाठी कोरफड चे सेवन केले जाऊ शकते. जर आपण 200-250 ग्राम कोरफड खाणार तर आपणास बद्धकोष्ट तेची समस्या होणार नाही.

नारळाचे तेल

नारळाच्या तेलात अँटीमायक्रोबियल आणि anti-inflammatory गुणधर्म असतात. जे मुळव्याध मुळे होणारी जलन आणि खाज सोबतच मूळव्याध मधील दुखणे देखील कमी करण्यात साहाय्यक असते.

मूळव्याध मध्ये नारळ तेलाचा उपयोग (mulvyadh gharguti upay) करण्यासाठी केमिकल नसलेले शुद्ध नारळ तेल आणावे. यानंतर एक चमचा नारळ तेल गरम करून मुळव्याध प्रभावित क्षेत्रावर लावावे. हा उपाय आपण दिवसातून 3 ते 4 वेळा करू शकतात. असे नियमितपणे 15 दिवस केल्यास आपणास नक्कीच आराम मिळेल.

ग्रीन टी

मुळव्याध वर घरगुती उपाय म्हणून बऱ्याचदा ग्रीन टी चा उपयोग केला जातो. ग्रीन टी मध्ये एंटीऑक्सीडेंट प्रॉपर्टीज असतात. जे मूळव्याध ची समस्या दूर करण्यासाठी उपयोगी आहेत. मुळव्याध मध्ये ग्रीन टी चा उपयोग करण्यासाठी आपण ग्रीन टी अथवा ग्रीन टी बॅग उपयोगात आणू शकतात.

यासाठी ग्रीन टी पाण्यात उकळल्यानंतर यामध्ये एक चमचा मध आणि लिंबुचा रस टाकून प्यावे. असे केल्याने पोट साफ न होण्याची समस्या दूर होते आणि मलत्याग सहज होतो.

जैतून चे तेल

जैतून तेलात अनेक एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात जे मुख्य करून बाह्य मूळव्याधचा उपचार (mulvyadh gharguti upay) करण्यासाठी उपयोगात आणले जाते. हे तेल रक्तवाहिन्यांमध्ये लवचिकता वाढवण्याचे कार्य करते ज्यामुळे सूजन कमी होते. जैतून चे तेल मुळव्याध प्रभावी क्षेत्रावरील लावून हलक्या हाताने मसाज केल्यास याचा लाभ होतो.

मठ्ठा आणि ओवा

मठ्ठा पिणे मुळव्याध रोगात अमृतसमान आहे. मठ्ठा बनवण्यासाठी एक ग्लास ताक मध्ये ओवा पावडर टाकावे. यानंतर यामध्ये एक चमचा काळे मीठ टाकून दररोज दुपारी जेवणानंतर याचे सेवन करावे.

गरम पाणी

मुळव्याध ची समस्या अधिक होत असल्यास एका टब मध्ये हलके गरम पाणी टाकून यात 10-15 मिनिटे बसल्यास दुखणे कमी होते व तात्पुरता आराम मिळतो. मुळव्याध वर घरगुती उपाय म्हणून आपण हा उपाय करू शकतात. पण यामुळे दीर्घकाळासाठी आराम मिळत नाही.

मुळव्याध दरम्यान आहार

mulvyadh gharguti upay व मूळव्याध दरम्यान काय खावे यासाठी पुढील माहिती वाचा

 • मूळव्याध पीडित व्यक्तीने जास्तीत जास्त फायबरयुक्त आहार घ्यायला हवा. ज्यामध्ये फळ आणि भाज्यांचा समावेश आहे.
 • जास्तीत जास्त पाणी प्या. दररोज 7 ते 8 ग्लास पाणी प्यायला हवे.
 • भोजनात नियमितपणे मठ्ठा आणि ताक सारखे थंड पदार्थ समाविष्ट करायला हवे.

मुळव्याध पीडित व्यक्तीची जीवनशैली

 • नियमित व्यायाम व प्राणायाम करायला हवे.
 • अधिक वेळ एका जागी बसणे अथवा उभे राहणे टाळावे.
 • मूळव्याध मध्ये काय खाऊ नये तर जंक फूड, फास्ट फूड, तळलेले आणि मिरची मसाले युक्त पदार्थ खाणे टाळावे.

या लेखात आपण मुळव्याध कसा ओळखावा व मुळव्याध वर घरगुती उपाय – mulvyadh gharguti upay जाणून घेतलेत. हे सर्व उपाय आपणास काही हद्दीपर्यंतच उपयोगी सिद्ध होऊ शकतात. परंतु जर आपणास मूळव्याध ची समस्या अधिक बिकट असेल तर आपण लवकरात लवकर योग्य वैद्यकीय उपचार घ्यावेत.

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *