चेहऱ्याला कोरफड कशी लावायची | कोरफड आणि चेहरा | aloe vera uses for face in marathi

चेहऱ्याला कोरफड कशी लावायची : चेहऱ्यावरील डाग, काळे वांग आणि पिंपल दूर करून चेहरा गोरा करण्याकरिता अनेक ब्युटी प्रोडक्ट चा वापर केला जातो. प्रत्येकाचे स्वप्न असते की त्याचा चेहरा सुंदर आणि गोरा दिसावा. आणि म्हणूनच प्रत्येक जन आपआपल्या चेहऱ्याची काळजी घेत असतो. कोरफड ही एक अशी औषधी आहे जी अनेक शारीरिक रोगांना तर दूर करतेच परंतु कोरफडीचा चेहऱ्यासाठी उपयोग देखील करता येतो.

चेहऱ्याला कोरफड चा रस लावल्याने चेहरा गोरा होण्यासोबतच काळे वांग आणि पिंपल दूर होतात. आजच्या या लेखात चेहऱ्याला कोरफड कशी लावायची आणि कोरफड आणि चेहरा म्हणजेच कोरफड चे चेहऱ्यासाठी फायदे आणि उपाय देण्यात आले आहेत. तर चला सुरू करुया…

चेहऱ्याला कोरफड कशी लावायची
चेहऱ्याला कोरफड कशी लावायची

चेहऱ्याला कोरफड कशी लावायची व फायदे

कोरफड जादुई वनस्पती आहे आणि याच्या गुणधर्मांविषयी अधिक माहिती देण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण आजकाल प्रत्येकाच्या घरात कोरफड आढळते आणि प्रत्येकाला याचे आयुर्वेदिक उपयोग माहिती आहेत. परंतु तरीही आपण चेहऱ्यावर कोरफड लावण्याचे फायदे काय आहेत याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया व सोबतच योग्य लाभ प्राप्त करण्यासाठी चेहऱ्याला कोरफड कशी लावायची याची माहिती मिळवू.

चेहऱ्याला करते मॉइश्चराईज
एलोवेरा अर्थात कोरफड हे एक आयुर्वेदिक मॉइश्चरायझर आहे. कोरड्या त्वचेला कोरफड च्या उपयोगाने मॉइश्चराईज करता येते. चेहऱ्याचे त्वचा मॉइश्चराईज काढण्यासाठी कोरफडचा वापर पुढीलप्रमाणे करावा-

  • सर्वात आधी कोरफड चे एक पान घ्यावे व त्याचे जेल एका वाटीत काढून घ्यावे.
  • आता ह्या जेल मध्ये काही थेंब खोबऱ्याचे तेल टाकावे.
  • दररोज रात्री झोपण्याच्या आधी चेहऱ्यावर हे जेल लावावे. तुम्ही रात्रभर हे जेल लावलेले ठेवू शकतात.

पिंपलच्या (मुरूम) समस्येत कोरफड चा उपयोग
चेहऱ्यावर निर्माण होणाऱ्या मुरुमांचा प्रत्येकाला त्रास होतो. परंतु कोरफड चा उपयोग करून काही दिवसातच मुरुमांची समस्या नाहीशी करता येते. जर तुम्ही देखील पिंपलच्या व त्यांच्यामुळे चेहऱ्यावर पडणाऱ्या काळ्या डागांच्या समस्येने त्रस्त असाल तर पुढील उपाय करावा.

  • सर्वात आधी एका वाटी मध्ये कोरफड चा रस घ्यावा. या रसात 1 चमचा लिंबू रस, एक चमचा मध, एक चमचा हळद आणि काही थेंब गुलाब जल टाकावे.
  • आता हे मिश्रण व्यवस्थितपणे एकत्रित करून घ्यावे.
  • यानंतर ह्याला संपूर्ण चेहऱ्यावर मास्क प्रमाणे लावावे.
  • 15-20 मिनिटे पॅक सुकू द्यावा.
  • यानंतर तुम्ही कोमट पाण्याने चेहरा धुऊ शकतात.

अधिक वाचा>> चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय

वय लपवण्यासाठी /सुरकुत्या कमी करण्यासाठी कोरफड
प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याचे वय इतरांना कळायला नको व तो नेहमी तरुण दिसावा. परंतु वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात. ह्या सुरकुत्या सौंदर्यात बाधा निर्माण करतात. परंतु कोरफड जेल च्या नियमित उपयोगाने आपण चेहऱ्यावरील सुरकुत्या लपवू शकतात. यासाठी पुढील पद्धतीने कोरफडचा वापर करावा.

  • सर्वात आधी कोरफड चे एक पान घ्यावे व त्याचे जेल एका वाटीत काढून घ्यावे.
  • आता ह्या जेल मध्ये जैतून चे तेल टाकावे व चेहऱ्यावर मास्क प्रमाने लावावे.
  • कमीत कमी 30 मिनिटे चेहर्‍यावर लावून ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.
  • असे केल्याने तुम्ही नेहमी दिसाल तरुण आणि तुमच्या वय सांगताना सर्व जातील हरून.

सर्वात चांगले एलोवेरा जेल कोणते आहे ?

बाजारात अनेक प्रकारचे एलोवेरा जेल विक्रीला उपलब्ध असतात. परंतु आपणास यांच्यापासून पाहिजे तेवढा फायदा मिळणार नाही. चांगले परिणाम मिळवण्याकरिता नेहमी कोरफड च्या रोपट्या च्या पानाचाच रस वापरावा. यासाठी तुम्ही आपल्या घराच्या बाहेर कुंडी मध्ये एक कोरफड लावून ठेवू शकतात. कोरफड चे रोप आपणास कोणत्याही लहान मोठ्या रोपट्याचा दुकानावर मिळून जाईल. याशिवाय तुम्ही त्याला ऑनलाईन देखील खरेदी करू शकतात ऑनलाईन खरेदीसाठी येथे क्लिक करा..

याशिवाय ज्यांना तत्काळ कोरफड हवे असेल व रोप घेऊन त्याला मोठे करावे एवढा वेळ नसेल. तर तुम्ही पुढील लिंक वर क्लिक करून wow कंपनी चे एलोवेरा ब्युटी जेल खरेदी करू शकतात. येथे खरेदी करा.

तर मित्रांनो आज आपण चेहऱ्याला कोरफड कशी लावायची तसेच कोरफड आणि चेहरा संबंधी माहिती मिळवली. आशा करतो की कोरफड चे हे उपाय करून आपण सुंदर आणि नितळ त्वचा मिळवाल. याशिवाय अधिक सौन्दर्य उपाय वाचण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा सौन्दर्य टिप्स. धन्यवाद..

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *