गजकर्ण खाज यावर उपाय : गजकर्ण अथवा नायटा ही त्वचासंबंधी एक समस्या आहे. ही समस्या फंगल संक्रमण मुळे निर्माण होत असते. एका व्यक्तिपासून दुसऱ्या व्यक्तीत हे संक्रमण खूप जलद होते. जर आपणही गजकर्ण च्या समस्येपासून त्रस्त असाल तर आता चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण ह्या लेखात आम्ही आपल्यासाठी गजकर्ण वर घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. जास्तकरून लोकांमध्ये गजकर्ण जांघेत होत असते. म्हणून आज आपण नायटा गजकर्ण साठी औषध आणि घरगुती उपाय देखील पाहणार आहोत…
Table of Contents
गजकर्ण काय असते ?
जास्त प्रमाणात गोड, नमकिन, शिळे आणि दूषित अन्न खाल्याने कफ दोष असंतुलित होतो. ज्यामुळे त्वचेवर खाज, जलन, लालिमा इत्यादी लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे गजकर्ण चे रुप घेतात. इंग्रजी भाषेत याला ringworm म्हटले जाते. कारण हे गोलाकार आणि अंगठी च्या आकारेवढेअसते.
रिंगवर्म ची ही समस्या कोणालाही होऊ शकते पण जास्तकरून कमी रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या लोकांना ही समस्या मोठ्या प्रमाणात होते. उन्हाळ्याच्या काळात लहान मुलेही ह्या समस्येने ग्रस्त होऊ शकतात. गजकर्ण खाज यावर उपाय म्हणून अनेकह घरगुती आणि मेडिकल उपचार केले जातात, ज्याविषयीची माहिती आपण आज प्राप्त करणार आहोत.
गजकर्ण होण्याची कारणे
- गजकर्ण हा एका व्यक्तितून दुसऱ्यांत प्रवेश करणारा संक्रमक रोग आहे. म्हणून जर तुम्ही एखाद्या गजकर्ण प्रभावित व्यक्तीच्या संपर्कात आला तर तुम्हालाही हा रोग होऊ शकतो.
- गजकर्ण प्रभावित प्राणी जसे कुत्रा, मांजर, गाय इत्यादींना हात लावल्याने किंवा त्यांच्यासोबत राहिल्यानेही गजकर्ण मनुष्यात संक्रमित होऊ शकते.
- गजकर्ण प्रभावित व्यक्तित्व द्वारे वापरण्यात आलेले कपडे, कंगवा, ब्रश, रुमाल, अंथरूण-पांघरूण वापरल्यानेही आपणास गजकर्ण होय शकते.
- काही वेळा मातीतून माणसामध्ये देखील गजकर्ण पसरते.
- तारुण्यातील काही लोकांमध्ये संक्रमणाशिवायही हा रोग होऊ शकतो. कारण युवा अवस्थेत शरीरात संक्रमणाशी लढणारी रक्षात्मक प्रणाली आपोआप विकसित होते.
- जास्त वेळ शरीर ओले राहणे किंवा खूप घामामुळे देखील फंगल इन्फेक्शन होते.
- टाईट चप्पल आणि बूट घातल्याने ही गजकर्ण तयार होते.
- कोरडी त्वचा हे देखील गजकर्ण होण्याचे कारण असू शकते.
गजकर्ण चे प्रकार
गजकर्ण खाज यावर उपाय जाणून घेण्याआधी आपण गजकर्ण चे प्रकार कोणते आहेत याविषयी जाणून घेऊया. गजकर्ण चे चार प्रमुख प्रकार पुढील प्रमाणे आहेत.
- टीनिया क्रुरीस: हा प्रकार जास्त करून जांघ आणि नितंब च्या आजूबाजूच्या त्वचेवर होतो.
- टीनिया कॅपिटीस: हा गजकर्ण नायटा डोक्याच्या त्वचेत होतो. हा प्रकार जास्तकरून लहान शालेय मुलांमध्ये पहावयास मिळतो. या प्रकारात डोक्याच्या काही भागांमध्ये टक्कल देखील पडू शकते.
- टीनिया पेडीस: हा गजकर्ण नायटा प्रकार पायाच्या त्वचेवर होतो. सार्वजनिक ठिकाणी चप्पल न घालता फिरल्याने हा गजकर्ण होतो.
- टिनिया बार्बी: हा गजकर्ण नायटा प्रकार चेहऱ्याच्या त्वचेवर होतो. दाढी आणि मानेच्या भागावर हा गजकर्ण होऊ शकतो. यामुळे दाढीवर असणारे केस तुटायला लागतात. हा प्रकार जास्त करून अस्वच्छ न्हाव्याकडे जाऊन दाढी केल्याने होतो.
हे होते गजकर्ण नायटा चे चार प्रमुख प्रकार. या चारही समस्यांमधील इलाज सारखा असू शकतो. आता आपण गजकर्ण पासून वाचण्याचे उपाय पाहूया:
गजकर्ण घरगुती उपाय
गजकर्ण आणि नायटा मुळे होणारी खाज टाळण्याकरिता जीवनशैलीत पुढील गजकर्ण घरगुती उपाय व बदल केले जाऊ शकतात.