कच्चा लसूण खाण्याचे फायदे आणि घरगुती उपाय | benefits of garlic in marathi

लसूण खाण्याचे फायदे : आपल्या देशात हजारो वर्षांपासून भोजनात लसणाचा उपयोग केला जात आहे. आयुर्वेदात चरक आणि सुश्रुत यांच्याशिवाय इसवी सन 650 मध्ये वैद्य वाग्भट यांनी आपला ग्रंथ अष्टांग हृदय मध्ये लसूण खाण्याचे फायदे सांगितले आहेत. आजच्या या लेखात आपण लसूण खाण्याचे फायदे काय आहेत आणि विविध रोगांमध्ये योग्य लाभ मिळवण्यासाठी कशा पद्धतीने लसूण कसा खावा याबद्दल माहिती प्राप्त करणार आहोत. तर चला सुरु करूया…

कच्चा लसूण खाण्याचे फायदे व तोटे | benefits of garlic in marathi

लसूण खाण्याचे फायदे | benefits of garlic in marathi

आधीच्या काळात जेव्हा दवाखाने आणि मेडिकल नव्हते तेव्हा लसुन चा उपयोग अनेक रोगांना नियंत्रित करण्यासाठी केला जायचा. लसूण चे सेवन कोण कोणत्या रोगांमध्ये फायदेशीर ठरू शकते याची माहिती पुढे देण्यात आली आहे.

रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी
जर शरीरात एंजियोटेंसिन किंवा एसीई यापैकी कोणत्याही एका पदार्थाचे उत्पादन वाढले. तर बीपी अर्थात रक्तदाब ची समस्या निर्माण होते. अनेक इंग्रजी औषधी याला नियंत्रणात करण्यासाठी कार्य करतात परंतु या औषधींचे दुष्परिणाम देखील असतात. अश्यामध्ये रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी लसणाचे सेवन उपयोगी ठरू शकते. उच्च रक्तदाब पीडित व्यक्तीला दररोज काही लसणाच्या पाकळ्या खायला द्याव्यात. जर लसणाच्या स्वाद आवडत नसेल तर तुम्ही लसणाला बारीक कुटून दुधासोबत घेऊ शकतात.

वजन कमी करण्यासाठी लसणाचे फायदे
लसूण वाढत्या वजनाला कमी करण्यासाठी काही हद्दीपर्यंत गुणकारी ठरला आहे. यात असणारे एँन्टी ओबेसिटी गुणधर्म लठ्ठपणा कमी करण्यात सहाय्यक असतात. याशिवाय लसणाच्या सेवनाने शरीरात उष्णता वाढते ज्यामुळे अनावश्यक चरबी बर्न होण्यात मदत मिळते.

हृदय स्वास्थ्यासाठी लसणाचे फायदे
लसूण मध्ये असणारे गुणधर्म हृदयासाठी लाभकारी असतात. शास्त्रज्ञांनी मनुष्य आणि प्राण्यांवर केलेल्या शोधानुसार लक्षात आलेले आहे की लसणात काही खास तऱ्हेचे कार्डिओ प्रोटेक्टीव गुणधर्म असतात. हे गुणधर्म कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाला निरोगी ठेवण्यात मदत करतात. हृदय संबंधी समस्या असणाऱ्या लोकांनी दररोज सकाळी 1 ते 2 बारीक क्रॅश केलेले लसुन खायला हवे.

सर्दी खोकल्यात लसुन खाण्याचे फायदे
लसूण मध्ये अँटिबायोटिक आणि अँटी व्हायरल गुण असतात. सर्दी आणि खोकल्याच्या समस्यांमध्ये लसूण एक अद्भुत उपचार आहे. शोधानुसार दररोज 4-5 लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि ताप 1 ते 2 दिवसात दूर होतो.

पचन सुधारण्यात लसणाचा उपयोग
लसूण पचन शक्ती वाढवून पोटासंबंधी आजार दूर करतो. यासोबतच शरीरात असणाऱ्या घातक पदार्थांनाही नष्ट करतो. यासाठी लसणाच्या पाकळ्यांना कुस्करून पाणी अथवा दुधात टाकून पिले जाऊ शकते. जुलाब झाला असल्यास लसूण खाल्याने नियंत्रणात येतो.

श्वास घेण्यात त्रास असल्यास लसणाचे उपयोग
जर छातीत दुखत असेल किंवा श्वास घेण्यात त्रास होत असेल तर लसूण, अदरक, कांदा आणि हळद यांचे मिश्रण करून छातीवर लेप लावावा आणि या लेप वर कापड बांधून ठेवावा. छातीत कफ होणे, श्वास घेण्यात अडचण येणे इत्यादी रोगांमध्ये हा उपाय अत्यंत उपयोगी आहे.

लसूण आणि मधाचे फायदे
लसूण आणि मध यांचे अनेक सिद्ध केलेले फायदे आहेत. आपले देशात पूर्वीपासून यांना एक प्राचीन औषध म्हणून वापरले जात आहे. शरीरावरील इन्फेक्शन दूर करणे, पोटातील जंतू नष्ट करणे, व्हायरस ने होणारे आजार नियंत्रणात आणणे, हृदयाचे स्वास्थ सुधारणे, बुद्धी व एकाग्रता वाढवणे इत्यादी सर्व गोष्टी लसूण आणि मधाच्या मदतीने साध्य करता येतात.
यासाठी एका वाटीत मध घ्यावे आणि या मधात लसणाच्या 2-4 पाकळ्या काही वेळ बुडवून ठेवाव्यात. यानंतर मध लागलेल्या या लसणाच्या पाकळ्यांचे सेवन करावे. हा उपाय रोग्रतिरोधक क्षमता वाढवून सर्वच रोगांपासून संरक्षण करतो.

लसूण चा ज्यूस पिण्याचे अनेक फायदे आहेत ऑनलाइन लसूण ज्यूस खरेदी करण्यासाठी>> क्लिक करा येथे

लसूण खाण्याचे नुकसान / तोटे

कोणतीही गोष्ट अति केल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ लागतात. या बाबतीतही तसेच आहे. जास्त प्रमाणात लसूण खल्याने पुढील तोटे अथवा दुष्परिणाम होऊ शकतात.

यकृताचा धोका
लसूण मध्ये लसूण मध्ये अँटी ऑक्सीडंन्ट असतात. जास्त प्रमाणात लसूण खाल्याने यकृतात विषारी पदार्थ तयार होऊ शकतात ज्यामुळे पोटाचे स्वास्थ बिघडून पूर्ण यकृत खराब होऊ शकते.

दुर्गंध
जास्त लसूण खाल्याने तोंडाचा वास येणे ही समस्या देखील निर्माण होते. म्हणून जर तुम्ही नियमितपणे लसूण खात असाल तर दिवसातून दोन वेळा तरी ब्रश करावे. जेणेकरून आपले तोंड स्वच्छ राहील आणि दुर्गंध येणार नाही.

मळमळ, उलटी आणि छातीत जळजळ
खाली पोट जास्त प्रमाणात लसूण खावून घेतल्यास मळमळ, छातीत जलण आणि उलटी च्या समस्या होऊ शकतात. याशिवाय काही लोकांमध्ये डायरिया आणि संडाशी होऊ शकतात. संडास बंद करण्यासाठी उपाय <<वाचा येथे

तर मित्रांनो आजच्या या लेखात आपण लसूण खाण्याचे फायदे काय आहेत आणि लसूण कसा खावा आणि लसणाचे फायदे व तोटे जाणून घेतले. आशा करतो की आपणास benefits of garlic in marathi ही माहिती आवडली असेल. याशिवाय मराठी भाषेत आरोग्य आणि इतर विषयांवरील माहिती नियमित वाचत राहण्यासाठी ‘माझी काळजी’ या आमच्या ब्लॉग ला भेट देत रहा. धन्यवाद…

READ MORE :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *