कायम आनंदी राहण्याचे उपाय | How to Stay Happy in Marathi

आनंदी राहण्याचे उपाय: How to Stay Happy in Marathi : सदर लेखात नेहमी आनंदी राहण्यासाठी काय करावे व आनंदी राहण्याचे उपाय कोणते आहेत याविषयी चे मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. Ways to Stay Happy in Marathi आयुष्याच्या प्रत्येक संकटात हसत व आनंदी राहण्यासाठी उपयोगाचे आहेत.

ways to stay happy in marathi

आनंदी राहण्याचे उपाय – How to Stay Happy in Marathi

रस्त्याच्या कडेने फुगेवाला होता. तो फुगेघ्या असं न म्हणता आनंद घ्या , आनंद घ्या असं ओरडत होता. फुगा म्हणजे आनंद असतो का? माझं मन स्वतःलाच प्रश्न विचारू लागलं ! जर फुगा चं फक्त आनंद आहे तर आनंद इतक्या सहज रित्या विकत घेता येतो का? आणि आनंद मिळवण्यासाठी काय करावं लागतं? काय नाही? अशी असंख्य प्रश्न मनात सुरू झाली. पण आनंदी कसं राहायचं.. त्यासाठी काही थोड्या गोष्टी सुचल्या. पुढे आपणास सतत आनंदी राहण्याचे उपाय देत आहोत.

१) स्वतात जगायला शिका

बऱ्याचदा व्यक्ती दुसऱ्यांवर अवलंबून असतो. म्हणजे आपलं वागणं, हसणं, राहणं दुसऱ्यांवर अवलंबून असतं. हे ज्या व्यक्तीवर अवलंबून आहे तो माणूस जर सुखी असला तरच आपण सुखी होतो, नाहीतर आपण सतत चिंतेत असतो. नंतर आपले जीवन परावलंबी होते त्यापेक्षा जर आपण स्वतः जगायला शिकलो तर तर आपला आनंद आपणच मिळवू शकतो. म्हणजे आपले निर्णय आपल्याला हव्या असणाऱ्या पद्धतीने घेतले तर आपल्याला एक मानसिक सुख मिळते त्यातून आणि ते सुख आपल्या आनंदाचे कारण बनतं. स्वतः जगायला शिकलं की दुसऱ्यांच्या गोष्टीचा परिणाम आपल्यावर होत नाही म्हणून स्वतःची जडणघडण योग्य रीतीने होते.माणूस मग स्वतः मध्येच खुश राहायला लागतो.

म्हणून स्वतःमध्ये जगणं आपल्याला आनंद प्रदान करतं त्यामुळे स्वतःत जगायला शिका.

२) त्यात समाधानाला महत्त्व हवं

प्रत्येकाचे जीवन म्हणजे आताच्या घडीला सतत कशाच्या तरी मागे धावतो आहे असं झालंय. या जगण्यात मनाची स्थिरता कुठेही नजरेस पडत नाही म्हणून आपलं मन सतत काही न काही मिळवण्याच्या प्रयत्नात असते. आपल्याकडे हे आहे मग ते मिळवायचं. ते आहे मग हे मिळवायचं. नुसताच काही तरी मिळवण्याचा अट्टाहास सुरू असतो. हा अट्टाहास आपल्याला विचलित करतो.

त्यातून आपल्याला वर्तमानात आनंदाने जगता येत नाही. हे सतत धावणं मनाची अशांतता निर्माण करतो मग त्यात आनंद कसला. म्हणतात न क्षितिजाची आस धरणं चुकीचं असतं परंतु क्षितिज कधीच आपल्या हाताला लागत नाही कारण तिथपर्यंत पोहोचलं कि ते तितक्याच अंतरावर असतं म्हणून क्षितिज पोहोचण्याची जागा नाही अनुभवण्याची कला आहे तसेच मनात एक समाधान भरलं कि गोष्टी मिळविण्याचा कमी होतो आणि आहे त्या गोष्टीत आपण सुखानं आनंदाने जगायला लागतो म्हणून जगण्यात समाधान हवं..

३) जगापेक्षा वेगळं होण्याचा अट्टाहास टाळा

आत्ताच्या जगण्याच्या पद्धतीने प्रत्येकाला आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे दाखवण्याचा अट्टाहास असतो. माझ्यासारखा कोणी नाही असा समज मग त्यातून निर्माण होतो परंतु सकळ सजीवसृष्टीन मानव या प्राण्याला काही एक समान गोष्टी देऊन जन्माला घातला आहे हे आपण विसरायला लागतो मग तो प्रवास सुरू जाणीवपूर्वक वेगळे दिसण्याचा वेगळे होण्याचा आणि मग या प्रवासात आपण स्वतःपासूनच वेगळे व्हायला लागतो जेव्हा स्वतःपासून माणूस वेगळा होतो तेव्हा सुखी कसा राहू म्हणून आपण प्रत्येका पासून वेगळं नाही आहोत तर सगळ्यातले एक आहोत .

हे ज्या वेळेला स्वीकार करू तेव्हा आपल्या जगण्याला आनंदाचे उधाण येईल.

४- परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिका

आपल्या जगण्यात एखाद्या गोष्टीची वेळेची ठिकाणाची व्यक्तीची सवय नसली की किंवा ते ठिकाण ती व्यक्ती ती वेळ ती गोष्ट आपली नेहमीची नसेल तर मग आपल्याला त्या व्यक्तीसोबत राहणं अवघड वाटायला लागतं ती वेळ कधी निघून जाईल असं वाटायला लागतं त्या ठिकाणाहून आपण मग पळ काढायला लागतो त्या गोष्टीची टाळाटाळ करायला लागतो परंतु असं परिस्थितीशी पळ काढून काहीही मिळत नाही त्या परिस्थितीत आपल्याला जगायला शिकले पाहिजे तेव्हा आपल्याला सुखाला सामोरे जाता येईल नाहीतर सतत पळ काढण्याच्या नादात आपण आनंदाच्या ही लांब लांब जायला लागतो म्हणून आहेत असं मनाने स्वीकारलं तर सुख जास्त लांब नसतं. 

५- आपले आवडते छंद जोपासा

धकाधकीच्या जीवनात आनंद मिळवण्यासाठी छंद महत्त्वाचा आहे. छंद आपल्याला मानसिक आनंद देतो. कुठलीही गोष्ट मनातून करण्याची आवड म्हणजे आपला छंद असतो आणि मनातून करण्याच्या गोष्टीत एक वेगळाच प्रकार सुख असतं तो छंदच आपल्याला जगवतो जसे एखाद्याला वाचनाची आवड असेल तर त्या आवडी त्याचा बराचसा वेळ जातो म्हणून इतरत्र गोष्टी

मनात मनात येऊन त्यात वेळ घालवण्यापेक्षा छंदात जगलेले कधीही चांगलं जसं एखाद्याला प्रवासाची आवड असेल तर त्याला प्रत्येक रस्त्यात एक वेगळा आनंद सापडायला लागतो प्रत्येक ठिकाणात त्याला सुख सापडायला लागतो मग त्यात तो मनसोक्त हरवतो म्हणून माणसाला एक तरी छंद हवा जो त्याला आनंद देतो.

६- समजून घेत चला प्रत्येकाला

एखाद्याचं वागणं आपल्याला पटलं नाही तर त्याला एकदम झिडकारून न देता पुढच्या व्यक्तीला समजून घेत जा मोर्चाच्या ठिकाणी स्वतः मी आहे असं समजून घेतलं तर आपल्याला त्रास त्याचा होत नाही आणि पुढची व्यक्ती कळायलाही मदत होते एखाद्या व्यक्तीची चुक महत्वाची का ती व्यक्ती महत्वाची हे अगोदर समजून घ्या आणि एकदा व्यक्ती महत्त्वाची झाली की आपण त्या व्यक्तीला समजून घ्यायला लागतो यातून त्या व्यक्ती विषयीचा आपल्या मनातला आकस कमी व्हायला लागतो मनात कुठल्याही व्यक्ती विषयी द्वेष नसला तर आपलं मन फक्त आणि फक्त आनंदात जगायला लागतं.

७- डोक्याच्या निर्णया बरोबर मनाच्या इच्छेला ही महत्व हवं

डोक्याने निर्णय घेणं चांगलं परंतु प्रत्येक वेळी डोक्याने निर्णय घेतले तर आपल्या मन

असंतुष्ट व्हायला लागतं. जर आपण मनाच्या कौलाकडेही झुकायला लागलो तर आपलं मन आपल्याला समाधानीक आनंद देतो. या निर्जीव जगण्यात डोक्या बरोबर मनालाही महत्त्व द्या मनालाही समजून घ्या आणि मनाला हव्या असणाऱ्या गोष्टीत स्वतःला गुंतून एक आनंदी जीवन जगा

८- नात्यात गरजे इतकच अडकून रहा

कुठलंही नातं असो आपण त्या नात्याच्या जास्त आहारी गेलो तर त्याचा आपल्यालाच त्रास होतो. आपण एखाद्या नात्यात जास्त गुंतत गेलो तर त्यां नात्या कडून आपल्या अपेक्षा वाढायला लागतात आणि समोरच्याकडून त्या अपेक्षांची पूर्तता नाही झाली तर त्याचाही त्रास आपल्यालाच होतो मग आपलं मन दुःख व्यक्त करत आणि दुःखात आनंद कधीच येत नाही म्हणून प्रत्येक नातं विशिष्ट अंतराने निभावलं जावं शेवटी स्वतःची स्वतः सोबत असणारे नात महत्त्वाचं असतं म्हणून प्रत्येक नात्यात गरजेइतकेच अडकून राहावं

९- निसर्गाच्या सानिध्यात जगा

या आधुनिक क्रांतीच्या विकासाने आपल्यात आणि निसर्गात थोड अंतर निर्माण झाल आहे. तांत्रिक जगणं आपल्यात अनेक आजाराला निमित्य बनत आहे आणि येणारं आजारपण आपली चिंता वाढवत आहे म्हणून आपण काही वेळ निसर्गात घालवायला हवा त्यातून आपलं आरोग्यही चांगलं राहतं निसर्गाच्या सानिध्यात त्या मोकळ्या वातावरणात आपला मानसिक विकासही होतो णि त्या सुखावणार्‍या मनातून मग आनंदाची निर्मिती होते म्हणून निसर्ग फार महत्त्वाचा आपल्या जीवनात जसं की पक्षांचा किलबिलाट आपल्याला आनंद देतो

मनसोक्त वाहणारी नदी पाण्याबरोबर सुख ही देते आपल्याला, झाडही सावली सोबत आत्मिक आनंद देतात फक्त निसर्ग मनातून बघा

१०- लहान मुलात वेळ घालवा

निरागसपणात एक वेगळंच सुख असतं आणि निरागस पणाचं अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे लहान मुलं आहेत. त्यांच्यात वेळ घालवल्यानंतर आपणही एक लहान मूल व्हायला लागतो आणि मग लहान मुलासारखी कसली चिंता आपल्यात राहत नाही फक्त आणि फक्त हसणं खेळणे या गोष्टी आपल्याला सुख द्यायला लागतात. अच्छा या धावपळीच्या जगण्यात लहान मुलांसोबत जो निवांतपणा मिळतो तो अनुभव घ्या लहान मुलं म्हणजे आनंदाची खाण असतात म्हणून त्यांच्यासोबत आपला वेळ घालवा

तसं म्हटलं तर आनंद खूप दुर्मिळ ही गोष्ट आहे आणि तसं बघितलं तर तो अगदी लहान लहान गोष्टीतही असतोच. फक्त आपली दृष्टी त्या आनंदा पर्यंत पोहोचायला हवी. आशा आहे आनंदी राहण्याचे उपाय हा लेख आपल्यासाठी उपयोगी ठरला असेल. हे How to stay happy in marathiWays to stay Happy in Marathi आपले मित्र मंडळी आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांनाही या विषयीची माहिती प्राप्त होईल व ते देखील आपल्या जीवनात एक समाधानी आणि आनंदी जीवन जगू शकतील.

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा