डोके जड होणे आणि चक्कर आल्यावर घरगुती उपाय | chakkar yene upay marathi

चक्कर आल्यावर घरगुती उपायchakkar yene upay : सकाळी उठल्यावर चक्कर येणे अथवा एकदम चालता बोलता डोळ्यापुढे अंधारी येणे, डोके जड होणे उपाय ही समस्या अनेकांना होत असते. याशिवाय कधी कधी शरीरात थकवा आणि कमजोरी सुद्धा वाटते. ही सर्व चक्कर येण्याची लक्षणे आहेत. तसे पाहता ही फार चिंताजनक बाब नाही परंतु काही प्रकरणामध्ये ही गंभीर समस्या बनू शकते.

आज आपण डोके जड होणे उपाय आणि चक्कर येणे यावर घरगुती उपाय पाहणार आहोत. याशिवाय चक्कर आल्यावर घरगुती उपाय म्हणून काय करता येईल व chakkar yene यावर कोणते उपाय आहे याबद्दल देखील जाणून घेऊया. म्हणून शेवट पर्यंत हा लेख वाचत रहा.

chakkar yene upay | चक्कर येणे घरगुती उपाय
chakkar yene upay

चक्कर येण्याचे प्रकार

चक्कर आल्यावर घरगुती उपाय जाणून घेण्याआधी आपण चक्कर कोणकोणत्या प्रकारचे असतात याविषयी जणूया.डोके जड होण्याचे आणि चक्कर येण्याचे तीन प्रमुख प्रकार आहेत. हे प्रकार पुढीलप्रमाणे-

 1. वर्टिगो (vertigo)- या प्रकारात डोक्यात चक्कर येऊ लागतो आणि असे वाटायला लागते की आजूबाजूच्या सर्व वस्तू व व्यक्ती स्वतः गोल फिरत आहे. या समस्येत व्यक्तीला उलटी आणि चक्कर देखील येऊ शकतो. यानंतर काही वेळात डोळे बंद केल्यावर अथवा खाली बसल्यावर पुन्हा सर्वकाही पूर्ववत होते.
 2. डीसइक्विलिब्रियम (Disequilibrium)- या प्रकारात शरीराचे संतुलन सांभाळण्यात समस्या येऊ लागते. काही लोकांना पायाची समस्या आणि तोल गेल्यासारखे होते.
 3. लाईटहेडनेस (lightheadedness)- या अवस्थेत पीडित व्यक्तीला वाटते की तो बेशुद्ध होते आहे. डोक्यात मुंग्या येऊ लागतात आणि असे वाटते की डोके शरीराला जोडलेले नाही आहे. ही समस्या झोपलेले असताना अचानक उठणे किंवा दीर्घकाळापर्यंत दीर्घ श्वास घेत राहिल्याने होते.

डोके जड होण्याची कारणे

 • अचानक उठणे: कित्येकदा अचानक उठल्याने लाईटहेडनेस (lightheadedness) या अवस्थेतील चक्कर येतो.
 • मायग्रेन: मायग्रेन पीडित व्यक्तीला डोक्यात तीव्र वेदना होतात त्यामुळे चक्कर येण्याची स्थिती उत्पन्न होते.
 • ब्लड प्रेशर कमी होणे: अचानक रक्तदाब कमी होण्याच्या स्थितीत ही चक्कर येतो.
 • डीहायड्रेशन: डीहायड्रेशन ची समस्या शरीरात पाण्याच्या कमतरतेने होते. जर कोणी व्यक्ती कमी पाणी पीत असेल तर त्यालाही चक्कर येण्याची समस्या होऊ शकते.
 • औषधी: विशिष्ट त्या काळच्या औषधाचे रिएक्शन झाल्याने डोक्यात मुंग्या येणे आणि चक्कर येण्याची समस्या होते.
 • वाढते वय: वाढत्या वयामुळे अनेक लोकांमध्ये वेगवेगळ्या शारीरिक समस्या निर्माण होतात ज्यामुळे त्यांना औषधांचे सेवन करावे लागते. या औषधांमुळे देखील चक्कर येऊ शकतो.

चक्कर येण्याची लक्षणे

 • उठणे अथवा बसण्यावर नियंत्रण न राहणे.
 • डोके आपण एका बाजूला वळणे.
 • डोक्यात दुखणे व बेशुद्ध झाल्यासारखे वाटणे.
 • कोणत्याही एका स्थितीत बसून राहण्यात अडचण येणे.
 • स्वतःला पुढे अथवा मागे पडत आहोत असे वाटणे.
 • स्थिर असतांनाही आजूबाजूच्या सर्व गोष्टी फिरताना वाटणे.
 • शरीर असंतुलित होणे.
 • शरीरात सनसन होणे.
 • बोलता न येणे किंवा बोलणे अवघड होणे.

चक्कर आल्यावर घरगुती उपाय | chakkar yene upay

जास्तकरून चक्कर आल्यावर ही समस्या आपोआपच ठीक होते. परंतु जर परत परत चक्कर येत असेल तर चक्कर आल्यावर घरगुती उपाय (chakkar yene upay) म्हणून पुढील उपाय करावेत.

 • पुरेशी झोप आणि पाणी प्यावे. पोष्टिक आहार घ्यावा आणि तणावापासून दूर राहावे.
 • जर तुम्ही काही औषधे घेत असाल तर एकदा डॉक्टरांशी भेटून औषधांचा डोस कमी करण्यासाठी विचारावे.
 • जर तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात निर्जलीकरण व अति उन्हामुळे चक्कर येत असतील तर तुम्ही एखाद्या थंड ठिकाणी जाऊन आराम करावा.
 • चक्कर आल्यावर नियंत्रण सांभाळावे व आजूबाजूच्या एखाद्या गोष्टीचा आधार घ्यावा आणि तत्काळ खाली बसावे. असे केल्याने तुम्ही चक्कर आल्यावर होणारी दुखापत टाळू शकता.

 • अद्रक
  chakkar yene upay मध्ये चक्कर दूर करण्यासाठी अद्रक चे सेवन फायदेमंद असते. एका शास्त्रीय शोधानुसार अद्रक मध्ये विशेष औषधी गुणधर्म असतात. प्रवास करताना जर अद्रक खाल्ले तर डोके गरगरणे आणि उलट्या होण्याची समस्या निर्माण होत नाही.
  ज्या व्यक्तीला चक्कर येण्याची समस्या असेल त्याने अद्रक ला लहान लहान तुकड्यांमध्ये कापून घ्यावे. आणि दिवसातून दोन-तीन वेळा जेव्हा पण गरगरल्यासारखे होईल तेव्हा खावे.

 • लिंबू
  डोके जड होऊन चक्कर आल्यावर लिंबूचे सेवन लाभदायक सिद्ध होते. एका संशोधनातून सिद्ध झाले आहे की चक्कर आल्यावर लिंबू मध्ये असलेले क्रिटिक एसिड चक्कर कमी करण्यासाठी उपयोगी असते. म्हणून जर चक्कर आला असेल तर एका ग्लास मध्ये अर्धा लिंबू पिळून ही लिंबू पाणी प्यावे.

 • दीर्घ श्वास घ्यावा
  चक्कर आल्यावर तत्काळ उपचार म्हणून लांब आणि दीर्घ श्वास घ्यावा. जेव्हा आपण दीर्घ श्वास घेतो तेव्हा मेंदूला पुरेसे ऑक्सिजन मिळते. ज्यामुळे डोके जड होत नाही आणि चक्कर चे प्रमाण कमी होते. चक्कर आल्यावर घरगुती उपाय म्हणून श्वास घेणे आणि थोड्या वेळासाठी डोळे बंद करून ठेवणे फार प्रभावी ठरते.

तर हे होते चक्कर आल्यावर करायचे काही प्रथमोपचार. आशा आहे हे चक्कर आल्यावर घरगुती उपाय आपणास उपयोगी ठरले असतील. परंतु लक्षात असू द्या की जर डोके जड होणे चक्कर येण तसेच सकाळी उठल्यावर चक्कर येणे ही समस्या जास्तच प्रमाणात होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि योग्य मेडिकल उपचार करावेत. आम्ही आशा करतो की तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरज पडणार नाही आणि यालेखातील chakkar yene upay करून आपण घरच्या घरी चांगले व्हाल. धन्यवाद.

अधिक वाचा :

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *