गजकर्ण खाज यावर उपाय, औषध & गजकर्ण क्रीम | Ringworm home treatment in Marathi

गजकर्ण खाज यावर उपाय : गजकर्ण अथवा नायटा ही त्वचासंबंधी एक समस्या आहे. ही समस्या फंगल संक्रमण मुळे निर्माण होत असते. एका व्यक्तिपासून दुसऱ्या व्यक्तीत हे संक्रमण खूप जलद होते. जर आपणही गजकर्ण च्या समस्येपासून त्रस्त असाल तर आता चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण ह्या लेखात आम्ही आपल्यासाठी गजकर्ण वर घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. जास्तकरून लोकांमध्ये गजकर्ण जांघेत होत असते. म्हणून आज आपण नायटा गजकर्ण साठी औषध आणि घरगुती उपाय देखील पाहणार आहोत…

गजकर्णावर घरगुती उपाय
गजकर्ण खाज यावर उपाय

गजकर्ण काय असते ?

जास्त प्रमाणात गोड, नमकिन, शिळे आणि दूषित अन्न खाल्याने कफ दोष असंतुलित होतो. ज्यामुळे त्वचेवर खाज, जलन, लालिमा इत्यादी लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे गजकर्ण चे रुप घेतात. इंग्रजी भाषेत याला ringworm म्हटले जाते. कारण हे गोलाकार आणि अंगठी च्या आकारेवढेअसते.

रिंगवर्म ची ही समस्या कोणालाही होऊ शकते पण जास्तकरून कमी रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या लोकांना ही समस्या मोठ्या प्रमाणात होते. उन्हाळ्याच्या काळात लहान मुलेही ह्या समस्येने ग्रस्त होऊ शकतात. गजकर्ण खाज यावर उपाय म्हणून अनेकह घरगुती आणि मेडिकल उपचार केले जातात, ज्याविषयीची माहिती आपण आज प्राप्त करणार आहोत.

गजकर्ण होण्याची कारणे

 • गजकर्ण हा एका व्यक्तितून दुसऱ्यांत प्रवेश करणारा संक्रमक रोग आहे. म्हणून जर तुम्ही एखाद्या गजकर्ण प्रभावित व्यक्तीच्या संपर्कात आला तर तुम्हालाही हा रोग होऊ शकतो.
 • गजकर्ण प्रभावित प्राणी जसे कुत्रा, मांजर, गाय इत्यादींना हात लावल्याने किंवा त्यांच्यासोबत राहिल्यानेही गजकर्ण मनुष्यात संक्रमित होऊ शकते.
 • गजकर्ण प्रभावित व्यक्तित्व द्वारे वापरण्यात आलेले कपडे, कंगवा, ब्रश, रुमाल, अंथरूण-पांघरूण वापरल्यानेही आपणास गजकर्ण होय शकते.
 • काही वेळा मातीतून माणसामध्ये देखील गजकर्ण पसरते.
 • तारुण्यातील काही लोकांमध्ये संक्रमणाशिवायही हा रोग होऊ शकतो. कारण युवा अवस्थेत शरीरात संक्रमणाशी लढणारी रक्षात्मक प्रणाली आपोआप विकसित होते.
 • जास्त वेळ शरीर ओले राहणे किंवा खूप घामामुळे देखील फंगल इन्फेक्शन होते.
 • टाईट चप्पल आणि बूट घातल्याने ही गजकर्ण तयार होते.
 • कोरडी त्वचा हे देखील गजकर्ण होण्याचे कारण असू शकते.

गजकर्ण चे प्रकार

गजकर्ण खाज यावर उपाय जाणून घेण्याआधी आपण गजकर्ण चे प्रकार कोणते आहेत याविषयी जाणून घेऊया. गजकर्ण चे चार प्रमुख प्रकार पुढील प्रमाणे आहेत.

 1. टीनिया क्रुरीस: हा प्रकार जास्त करून जांघ आणि नितंब च्या आजूबाजूच्या त्वचेवर होतो.

 2. टीनिया कॅपिटीस: हा गजकर्ण नायटा डोक्याच्या त्वचेत होतो. हा प्रकार जास्तकरून लहान शालेय मुलांमध्ये पहावयास मिळतो. या प्रकारात डोक्याच्या काही भागांमध्ये टक्कल देखील पडू शकते.

 3. टीनिया पेडीस: हा गजकर्ण नायटा प्रकार पायाच्या त्वचेवर होतो. सार्वजनिक ठिकाणी चप्पल न घालता फिरल्याने हा गजकर्ण होतो.

 4. टिनिया बार्बी: हा गजकर्ण नायटा प्रकार चेहऱ्याच्या त्वचेवर होतो. दाढी आणि मानेच्या भागावर हा गजकर्ण होऊ शकतो. यामुळे दाढीवर असणारे केस तुटायला लागतात. हा प्रकार जास्त करून अस्वच्छ न्हाव्याकडे जाऊन दाढी केल्याने होतो.

हे होते गजकर्ण नायटा चे चार प्रमुख प्रकार. या चारही समस्यांमधील इलाज सारखा असू शकतो. आता आपण गजकर्ण पासून वाचण्याचे उपाय पाहूया:

गजकर्ण घरगुती उपाय

गजकर्ण आणि नायटा मुळे होणारी खाज टाळण्याकरिता जीवनशैलीत पुढील गजकर्ण घरगुती उपाय व बदल केले जाऊ शकतात.

 • आहारात विटामिन ई युक्त पदार्थ खावेत. असे केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढेल आणि शरीरात लेऊकोसाईट्स चे उत्पादन होईल. विटामिन ई मध्ये सूर्यफुलाचे तेल, अक्रोड, पालक, बदाम आणि मुंग डाळ इत्यादींचा समावेश होतो.
 • आहारात लौग सामील करावी. लौग खाल्ल्याने फंगल संक्रमण दूर होते.
 • साफसफाई वर विशेष लक्ष द्यावे. दररोज स्वच्छ धुतलेले आणि उन्हात वाळत घातलेले कपडे परिधान करावेत. संक्रमित व्यक्ती ने स्पर्श केलेले कपडे आणि वस्तू वापरणे टाळावे. याशिवाय जे पाळीव प्राणी संक्रमित असतील त्यांच्या पासूनही दूर राहावे.
 • शरीराला जास्त घाम येऊ देऊ नका. उन्हात आणि गर्मी असलेल्या ठिकाणी जास्त वेळ काम करणे टाळा.
 • जास्त नमकीन गोड खाद्य पदार्थ जसे गुड, चॉकलेट, सोडा इत्यादी, तसेच जास्त तळलेले पदार्थ व तिखट भोजन, जंक फूड, दारू आणि धूम्रपानापासून दूर राहावे.
 • गचकरण नायटा झालेल्या जागी पुन्हा पुन्हा खाजू नये.
 • पायांमध्ये हवा लागेल असेच चप्पल आणि बूट घालावेत. जास्त टाईट बूट वापरू नये.
 • स्विमिंग पूल व इतर सार्वजनिक ठिकाणी चप्पल शिवाय जाऊ नये.
 • पाळीव प्राण्यांसोबत खेळल्यानंतर किंवा कोणतेही बाह्य कार्य केल्यानंतर हात स्वच्छ धुवावे.
 • अंतर्वस्त्र आणि मोजे दररोज आणि उन्हात सुकवावे. जर ऊन पडत नसेल तर गरम इस्त्री च्या साह्याने अंतर्वस्त्र प्रेस करावेत. जेणेकरून त्यांच्यावर असलेले सर्व जिवाणू मारले जातील.
 • डाग झालेली त्वचा स्वच्छ आणि सुकलेली ठेवावी.

गजकर्ण खाज यावर उपाय

गजकर्ण खाज यावर उपाय म्हणून काही घरगुती उपाय करून आपण यासमसयेत आराम प्राप्त करू शकतात. तर चला आता आपण गजकर्ण घरगुती उपाय जाणून घेऊया…

 • लसूण
  लसणाच्या पाकळ्या बारीक कुठून इन्फेक्शन झालेल्या जागी लावावे. व यावर एक पट्टी बांधून रात्रभर राहू द्यावे. लसूण मध्ये अजोईन नावाचा नैसर्गिक अँटी फंगल एजंट असतो. जो फंगल इन्फेक्शन ला चांगले करण्यासाठी मदत करतो. लसूण चे फायदे << वाचा येथे

 • गजकर्ण क्रीम अँटी फंगल क्रीम
  एंटी फंगल क्रीम त्वचेवरील इन्फेक्शन जसे गजकर्ण नायटा कमी करण्यासाठी खूप उपयोगी असते. गजकर्ण क्रीम म्हणून बाजारात मिळणारी itch guard क्रीम फंगल इन्फेक्शन आणि रींगवर्म चांगले करते. ह्या क्रीम मध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात जे खाज कमी करतात आणि त्वचेला थंडावा देतात. Itch guard ही क्रीम आपण कोणत्याही मेडिकल स्टोअर वर जाऊन खरेदी करू शकता. याशिवाय ऑनलाईन खरेदी साठी>> येथे क्लिक करा

 • हळद
  गजकर्ण खाज यावर उपाय म्हणून एक ते दोन चमचा हळदी च्या पावडर मध्ये थोडे पाणी मिसळून घट्ट पेस्ट बनवा. आता हे पेस्ट गजकर्ण झालेला जागेवर लावावे. ही प्रक्रिया जोपर्यंत गजकर्ण चांगले होत नाही तोपर्यंत केली जाऊ शकते याशिवाय तुम्ही हळद तेलाचा वापर देखील करू शकतात. हळद मध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात जे खाज खुजली कमी करतात. म्हणूनच अनेक सौंदर्य क्रीम मध्ये हळदीचा वापर केला जातो.

 • कोरफड (एलोवेरा)
  कोरफड एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. एका शोध नुसार लक्षात आले आहे की कोरफड चा वापर केल्याने शरीरावरील जर्म्स नष्ट होतात. गजकर्ण नायटा चांगले करण्यासाठी कोरफड चे पान घेऊन त्याचा रस काढावा व कोरफडचे हे जेल डाग असलेल्या जागी लावावे. ही प्रक्रिया दिवसातून दोन ते तीन वेळा करावी. कोरफड आपल्या शरीरावरील गजकर्ण चे इन्फेक्शन काही दिवसातच समाप्त करेल.

 • कडूलिंब
  लिंबाचे झाड एक आयुर्वेदिक औषध आहे याची कडू पाने अनेक रोगांना नष्ट करण्याची क्षमता ठेवतात. गजकर्ण नायटा चांगले करण्यासाठी डाग असलेल्या जागी लिंबाची पाने कुटून लावावीत. याशिवाय तुम्ही लिंबाच्या तेलाचा देखील वापर करू शकता. कडूलिंबच्या पानांमध्ये फंगीसाईड असते जे फंगल इन्फेक्शन नष्ट करण्यात मदत करते.

 • लव्हेंडर तेल
  लव्हेंडर तेल च्या तेलात दोन ते तीन थेंब ऑलिव्ह ऑइल मिक्स करावे. आणि हे मिश्रण शरीराच्या गजकर्ण प्रभावित भागावर लावावे. डाग व त्यामुळे होणारे फंगस नष्ट करण्यासाठी लव्हेंडर ओईल फार उपयोगी आहे. म्हणून तुम्ही याचाही वापर करू शकतात. लव्हेंडर तेल मराठी माहिती << वाचा येथे

सपट लोशन चे फायदे मराठी

नायटा आणि गचकरणावर उपाय म्हणून सपट लोशन खूप उपयोगी आहे. सपट लोशन हे घामामुळे होणारे चट्टे आणि खाज रोखण्यासाठी खूप फायदेशीर औषध आहे. यात असलेली जिवाणू नाशक जडी बुटी संक्रमण आणि खाज कमी करते. सपट लोशन चा वापर करण्यासाठी सर्वात आधी त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ धुवावी. यानंतर एक कापसाचा तुकडा या लोशन मध्ये बुडवावा व हे लोशन शरीराच्या प्रभावित भागावर लावावे. सपट लोशन लावल्याने सुरुवातीला तर थोडी आग होते परंतु आपणास ही आग सहन करावयाची आहे. काही वेळाने आग शांत होईल व इन्फेक्शन च्या जागी असलेले जंतु देखील नष्ट होतील. सपट लोशन ऑनलाइन खरेदीसाठी>> येथे क्लिक करा

अधिक लेख वाचा :

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *