शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय : फक्त वातावरणातील उष्णताच नव्हे तर इतर अनेक गोष्टी शरीराचे तापमान वाढवण्यासाठी कारणीभूत असतात. शरीराचे हे वाढलेले तापमान कमी करण्यासाठी शरीरातील उष्णता कमी करण्याचे (shariratil ushnata kami karne) वेगवेगळे उपाय आपण करू शकतात. शरीराचे तापमान वाढल्याने झोप न येणे, डोळ्यात पोटात तसेच लघवी करतांना जलन वाटणे. या समस्या निर्माण होतात. आजच्या या लेखात आम्ही आपल्याला शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय आणि खाद्य पदार्थांची माहिती देणार आहोत.
उष्णता कमी करण्याचे उपाय
सर्वात आधी आपण पाहूया की शरीर थंड ठेवण्यासाठी कोणते खाद्य व पेय पदार्थ सेवन करायला हवेत व कोणते पदार्थ सेवन करू नये.
नारळाचे पाणी
उन्हाळ्याच्या दिवसात दररोज एक ग्लास नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाईट भरपूर प्रमाणात असतात यामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील सामील असतात. नारळाच्या पाण्यातील हे गुणधर्म शरीराला हायड्रेटेड आणि ऊर्जावान बनवण्यात मदत करतात. यामध्ये अनेक एंटीऑक्सीडेंट देखील असतात, जे पोटाची गर्मी कमी करून थंडावा देतात.
काकडी
पाण्याने भरपूर असलेली काकडी थंड गुणधर्माची असते. उन्हाळ्याच्या दिवसात सर्वाधिक पसंतीचे खाद्यपदार्थांमध्ये सामील असलेल्या काकडीचा उपयोग तुम्ही ज्यूस, सलाद इत्यादी पद्धतीने करू शकतात.
टरबूज
टरबूज हे उन्हाळ्यातच येणारे फळ आहे. प्रत्येकाला टरबूज खायला आवडते टरबूज मध्ये भरपूर प्रमाणात पाणी आणि पोषक तत्व असतात जे शरीराला हायड्रेटेड करण्याचे कार्य करतात. सोबतच वजन कमी करण्यासाठी देखील टरबूज आरोग्यदायी फळ आहे. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात उष्णता कमी करण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा तरी थंड टरबूज चा आस्वाद घ्यावा.
ताक
उन्हाळ्यात ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत. पोटाला निरोगी ठेवण्याकरिता नियमित जेवणानंतर ताक प्यायला हवे. तुम्ही मसाला ताक देखील पिऊ शकतात. ताकच्या सेवनाने लु लागण्याची भीती कमी होते. म्हणूनच याला उन्हाळ्यातील अमृत समान मानले गेले आले आहे.
मसालेदार पदार्थ खाणे टाळावे
ज्या लोकांना शरीरातील उष्णता कमी करायची इच्छा असेल त्यांनी तळलेले व मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. त्यासोबतच जंक फूड आणि फास्ट फूड देखील खाऊ नये. हे पदार्थ सेवन केल्याने शरीरातील तेलचे प्रमाण वाढते व शरीर उष्ण होते.