शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय | how to reduce body heat in marathi | shariratil ushnata

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय : फक्त वातावरणातील उष्णताच नव्हे तर इतर अनेक गोष्टी शरीराचे तापमान वाढवण्यासाठी कारणीभूत असतात. शरीराचे हे वाढलेले तापमान कमी करण्यासाठी शरीरातील उष्णता कमी करण्याचे (shariratil ushnata kami karne) वेगवेगळे उपाय आपण करू शकतात. शरीराचे तापमान वाढल्याने झोप न येणे, डोळ्यात पोटात तसेच लघवी करतांना जलन वाटणे. या समस्या निर्माण होतात. आजच्या या लेखात आम्ही आपल्याला शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय आणि खाद्य पदार्थांची माहिती देणार आहोत.

उष्णता कमी करण्याचे उपाय

सर्वात आधी आपण पाहूया की शरीर थंड ठेवण्यासाठी कोणते खाद्य व पेय पदार्थ सेवन करायला हवेत व कोणते पदार्थ सेवन करू नये.

नारळाचे पाणी
उन्हाळ्याच्या दिवसात दररोज एक ग्लास नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाईट भरपूर प्रमाणात असतात यामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील सामील असतात. नारळाच्या पाण्यातील हे गुणधर्म शरीराला हायड्रेटेड आणि ऊर्जावान बनवण्यात मदत करतात. यामध्ये अनेक एंटीऑक्सीडेंट देखील असतात, जे पोटाची गर्मी कमी करून थंडावा देतात.

उष्णता कमी करण्याचे उपाय

काकडी
पाण्याने भरपूर असलेली काकडी थंड गुणधर्माची असते. उन्हाळ्याच्या दिवसात सर्वाधिक पसंतीचे खाद्यपदार्थांमध्ये सामील असलेल्या काकडीचा उपयोग तुम्ही ज्यूस, सलाद इत्यादी पद्धतीने करू शकतात.

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय

टरबूज
टरबूज हे उन्हाळ्यातच येणारे फळ आहे. प्रत्येकाला टरबूज खायला आवडते टरबूज मध्ये भरपूर प्रमाणात पाणी आणि पोषक तत्व असतात जे शरीराला हायड्रेटेड करण्याचे कार्य करतात. सोबतच वजन कमी करण्यासाठी देखील टरबूज आरोग्यदायी फळ आहे. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात उष्णता कमी करण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा तरी थंड टरबूज चा आस्वाद घ्यावा.

ताक
उन्हाळ्यात ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत. पोटाला निरोगी ठेवण्याकरिता नियमित जेवणानंतर ताक प्यायला हवे. तुम्ही मसाला ताक देखील पिऊ शकतात. ताकच्या सेवनाने लु लागण्याची भीती कमी होते. म्हणूनच याला उन्हाळ्यातील अमृत समान मानले गेले आले आहे.

मसालेदार पदार्थ खाणे टाळावे
ज्या लोकांना शरीरातील उष्णता कमी करायची इच्छा असेल त्यांनी तळलेले व मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. त्यासोबतच जंक फूड आणि फास्ट फूड देखील खाऊ नये. हे पदार्थ सेवन केल्याने शरीरातील तेलचे प्रमाण वाढते व शरीर उष्ण होते.

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी इतर उपाय

पाण्यात पाय बुडवून ठेवणे
उन्हाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे खूप फायदेशीर आहे. तसेच जर शरीरात जास्तीची गर्मी वाटत असेल तर तुम्ही थंड पाण्यात पाय बुडवून बसू शकतात. यासाठी तुम्हाला थंड पाण्याच्या बादलीत 10 मिनिटे पाय बुडवून ठेवायचे आहेत. पाणी अधिक थंड करण्यासाठी तुम्ही त्यात बर्फ देखील टाकू शकतात. असे केल्याने तुमच्या शरीरातील सर्व उष्णता थंड पाण्यात निघून जाईल. आणि तुम्हाला थंडगार वाटायला लागले.

चंदन पावडर
चंदन शरीराची उष्णता दूर करण्यासाठी गुणकारी आहे.आपल्या देशात फार पूर्वीपासून चंदनाचा उपयोग केला जात आहे. चंदनाचा उपयोग शरीराची उष्णता दूर करण्यासाठी विशेष पद्धतीने केला जातो. यासाठी एक चमचा चंदन पावडर मध्ये गुलाब जल मिसळून त्याचा लेप कपाळावर लावावा. तुम्ही हा लेप शरीरावरही लावू शकता. चंदन पाऊडर चा हा उपाय त्वरित उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. चंदन पाऊडर आपणास कोणत्याही जनरल स्टोर अथवा आयुर्वेदिक दुकानावर मिळून जाईल. ऑनलाइन खरेदी साठी येथे क्लिक करा

तांदुळाचे पाणी
तांदुळाच्या पाण्याची आयुर्वेदिक ग्रंथात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खूप महिमा गायली आहे. तांदुळाच्या पाण्याच्या हा प्रयोग करण्यासाठी सर्वात आधी एक चमचा तांदूळ कुटून बारीक करावेत. यानंतर एक ग्लास पाणी असलेल्या मातीच्या भांड्यात हे कुटलेले तांदूळ टाकावेत. 4 ते 5 तासानंतर तांदुळाचे पाणी गाळून पिऊन घ्यावे. हा प्रयोग दिवसातून दोन वेळा करावा. ह्या उपायाने शरीरातील उष्णता लवकर कमी होईल.

शीतली प्राणायाम

शीतली प्राणायाम शरीराला लवकर थंड करण्यासाठी वापरली जाणारी योग मधील एक पद्धत आहे. ही प्राणायाम पद्धत तुम्ही बसल्या बसल्या करू शकतात. यासाठी सर्वात आधी सरळ बसून आपली जीभ बाहेर काढून चित्रात दाखवल्याप्रमाणे गोल करावी. यानंतर तोंडाने आत दीर्घ श्वास घ्यावा व आत घेतलेला श्वास नाकाद्वारे बाहेर सोडावा. हा प्राणायाम 8 ते 10 वेळा केल्यास लगेचच शरीरातील उष्णता कमी झाल्याचे वाटायला लागते.

तर अश्या पद्धतीने अतिशय लहान लहान उपाय करून आपण शरीरातील जादा उष्णता काढून टाकू शकता आणि तप्त उन्हाळ्यातही आपले शरीर थंड ठेवू शकतात. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय आपणास कसे वाटले कमेन्ट करून नक्की सांगा.

अधिक लेख वाचा :

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *