पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय | how to reduce belly fat in marathi

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय : पोट आणि बेंबीच्या खाली असलेल्या गरजेपेक्षा जास्त चरबीची चिंता प्रत्येकालाच सतावीत असते. पोटावरील ही चरबी फक्त दिसण्यात खराब वाटत नसून यामुळे अनेक रोग देखील होऊ शकतात. आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी पोटावरील चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. याशिवाय काही योग्य आहार ही येथे सांगण्यात आले आहेत ज्यांच्या मदतीने कोणताही व्यायाम न करता तुम्ही पोटाची चरबी कमी करू शकतात तर चला सुरू करूया…

pot kami karnyasathi upay पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय
पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

आरोग्य तज्ञांच्या सल्यानुसार पोटावर थोडी फार चरबी असणे सामान्य गोष्ट आहे. परंतु जर ही चरबी गरजेपेक्षा जास्त वाढली असेल तर मात्र सावध होण्याची आवश्यकता आहे. कारण वाढलेल्या पोटावरील चरबी मुळे तुम्हाला अनेक रोग होऊ शकतात. तर चला जाणून घेऊया की पोटावरील चरबी वाढण्याची कारणे काय आहेत-

पोटावरील चरबी वाढण्याची कारणे

1) अनुवंशिकता :

संशोधनानुसार सिद्ध झाले आहे की काही लोकांच्या शरीरात फॅट सेल अनुवंशिकपणे विकसित होतात. जर तुम्ही जाड असाल तर याची दाट शक्यता आहे की तुमची येणारी पिढी देखील याच समस्येने ग्रस्त राहील. म्हणून चरबी वाढण्याचे हेही एक कारण आहे.

2) खराब पचनसंस्था :

वाढत्या वयासोबत शरीरातील पचनशक्ती देखील कमजोर व्हायला लागते. यासोबतच गैस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टम देखील प्रभावित होते, ज्यामुळे शरीराची चरबी वाढायला लागते.

3) हार्मोन मधील बदल :

ही समस्या जास्त करून महिलांमध्ये पाहायला मिळते. जेव्हा महिला जीवनाच्या मध्यात (40 च्या वयात) असतात तेव्हा त्यांच्या शरीराच्या वजनाच्या मानाने पोट व कंबरेच्या भागातील चरबी अधिकच वाढायला लागते.

4) चिंता / तणाव :

वाढत्या आर्थिक तसेच इतर समस्येमुळे चिंता उत्पन्न व्हायला लागते. चिंताग्रस्त व्यक्ती अनेक रोगांनी ग्रस्त व्हायला लागतो. जास्त चिंता केल्याने रक्तातील कोर्टिसोल हर्मोन कमी होऊ लागतात. ज्यामुळे पोटाच्या आजूबाजूला चरबी वाढायला लागते.

5) बसून काम केल्याने :

आधुनिकतेच्या या जगात जास्त करून लोकांचे जीवन खूप सोपे झाले आहे. आता लोकांना उपजीविका भागवण्यासाठी अधिक शारीरिक कष्ट करण्याची आवश्यकता पडत नाही. ऑफिस अथवा घरात दिवस बसून काम केल्याने देखील पोटाची चरबी वाढू लागते. आज अधिकतर लोक ह्याच कारणामुळे वाढत्या चरबीच्या त्रासाने ग्रस्त आहेत.

नियमित व्यायामाच्या मदतीने शरीरावरील अनावश्यक चरबी काढून टाकण्यात खूप मदत होते. परंतु जर आपण व्यायामासाठी वेळ काढू शकत नसाल तर पुढे देण्यात आलेले काही सोपे उपाय वापरूनही पोटाची अनावश्यक चरबी कमी करता येऊ शकते.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय | pot kami karnyasathi upay

योग्य आहार, पुरेशी झोप, ग्रीन टी, नियमित व्यायाम हे काही उत्तम पोट कमी करण्याचे घरगुती उपाय आहेत. परंतु या शिवाय देखील काही पोट कमी करण्याचे रामबाण उपाय आहे ज्यांची चर्चा पुढे करण्यात आलेली आहे.

1) आहार कसा असावा

पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपल्या आहारात जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट घ्या. बाजरी ची भाकर, ओट्स, तपकिरी भात, मुंग डाळ इत्यादी काही कार्बोहायड्रेट्स असलेले अन्न आहे. याशिवाय वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ज्या अन्नात साखरेचे प्रमाण असते ते खाणे टाळावे. जास्त साखर अथवा गोड पदार्थ खाल्ल्याने चरबी लवकर वाढते. बाहेरचे अन्न, फास्टफूड, दही, नूडल्स, तळलेले पदार्थ, जास्त मीठ असलेले अन्न, दारू ई. पदार्थांपासून दूर राहा.

2) मध आणि कोमट पाणी उपाय

पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी आयुर्वेदिक व घरगुती उपाय म्हणजे मध आणि कोमट पाणी होय. यासाठी दररोज सकाळी उपाशीपोटी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळून ते पाणी प्यावे. हे कोमट पाणी आणि मधाचे मिश्रण पोटाची अनावश्यक चरबी जाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. या उपायाने जलद गतीने पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत मिळते.

3) अन्न हळुवार आणि चावून खा

बऱ्याचदा वाढत्या वजनामागील कारण अधिक प्रमाणात जेवण करणे असते. हळुवार चावून-चावून अन्न खाल्याने तुम्हाला अधिक खावेसे वाटणार नाही. आणि चावून अन्न खाल्याने त्याचे पचनही व्यवस्थित होईल. ज्यामुळे चरबी तयार होणार नाही.

4) नियमित पाणी पिणे

पाण्याला जीवन म्हटले जाते. परंतु आपल्यामधील अनेक लोक योग्य प्रमाणात पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात. एका वयस्क व्यक्तीने दिवसभरातून कमी कमी 7-8 ग्लास पाणी प्यायला हवे. तसेच पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून जेवणाच्या अर्धा तास अगोदर एक ग्लास पाणी प्यावे यामुळे तुमची अधिक खाण्याची सवयही कमी होईल आणि परिणामी पोटावरील चरबी देखील कमी होत जाईल.

5) अधिक झोपा आणि चिंता करणे सोडा

आरोग्याच्या बाबतीत लोक नेहमी चिंता आणि झोपेला दुर्लक्षित करतात. परंतु या दोन्हींचे आरोग्य आणि वाढत्या वजनावर खूप प्रभावी परिणाम आहेत.

रात्री उशिरापर्यंत जागून होणाऱ्या झोपेच्या कमतरतेमुळे शरीरातील हार्मोन मध्ये बदल होतो ज्यामुळे चरबी वाढते. याशिवाय अधिक चिंता केल्याने रक्तातील कोर्टिसोल हर्मोन कमी होऊ लागतात. ज्यामुळे पोटाच्या आजूबाजूला चरबी वाढायला लागते. म्हणून चिंता करणे सोडा नियमित ध्यान व योग च्या मदतीने स्वतः ला निरोगी बनवा.

6) सरळ उभे रहा

हे एका संशोधनातून समोर आले आहे की शरीराचे पोश्चर व्यवस्थित ठेवल्याने देखील चरबी जाळण्यात मदत मिळते. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी उभे असाल तर आजूबाजूला टेका न लावता ताठ उभे राहण्याची सवय पाळा. असे केल्यानेही चरबी कमी करण्यात थोडीशी का असेना पण मदत होते.

7) ग्रीन टी

पोट साफ आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून ग्रीन टी खूप प्रभावी विकल्प आहे. यामध्ये असणारे कैटेचिन कंपाउंड वजन नियंत्रणात ठेवण्यात सहाय्यक असते. म्हणून दिवसभरातून कमीतकमी एकदा तरी ग्रीन टी प्या.

या लेखात पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय आम्ही आपणास सांगितले. हे उपाय नियमित वापरून व शक्य होईल तर काही योग आणि एक्सरसाईज करून आपण पोटाची अनावश्यक चरबी काढून टाकू शकतात. जर आपले वजन गरजेपेक्षा जास्त वाढले असेल तर या लेखात सांगितलेल्या उपायांसोबत आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकतात. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून आमच्या डॉक्टर समूहाला विचारू शकतात. धन्यवाद.

आधिक लेख वाचा :

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

3 thoughts on “पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय | how to reduce belly fat in marathi”

  1. Sanika Suhas Patil

    Mazya 3 delivery zalya ahet 2 cizerian ani 1 normal pan 3 rya delivery nantar ata maze pot kambar ani mandi warchi charabi kup vadhal chalali ahe tyamule Acidity ani digetion dekhil tras hotoy. Maze barch se kam he basun ch hote. Ajun 1 gosht mhanje Joine family ahe (14 membar ) tyamule sakalche 4 tas kitchen madhe ubhech rahave lagte ani vyayamasathi vel nahi deta yet Tari kay karave, Plz Guide

  2. Aishwarya Ingavale

    डाएट प्लॅन करून घेणे साठी फोन नंबर भेटेल का ?? पुण्यात कुठे भेटू शकता . माझ्या शरीर रचने नुसार काय केले पाहिजे याचे मार्गदर्शन साठी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *