सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत हृदयविकार फार वाढले आहेत व म्हणून आपण किंवा आपल्या ओळखीच्या एखाद्यास हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेतली पाहिजे. पण त्यासाठी आपल्याला आधी हृदयविकारची लक्षणे माहीत असणे आवश्यक आहे.
आजच्या लेखात आपण हृदयविकाराबद्दल जाणून घेणार आहोत. हार्ट अटॅक येण्याची लक्षणे (Heart attack symptoms in Marathi), हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे व हृदयविकार होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे आणि हार्ट अटॅक वर उपाय कोणते आहेत हे जाणून घेऊयात.
हार्ट अटॅक म्हणजे काय ?
हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराचा झटका ही एक गंभीर वैद्यकीय आणीबाणी आहे. बदलती जीवनशैली, ताणतणाव, चुकीचा आहार यासारख्या अनेक गोष्टींमुळे हार्ट अटॅक चे प्रमाण हल्ली खूपच वाढले आहे. हृदयविकाराच्या झटक्याचे मुख्य कारण म्हणजे कोरोनरी हृदयरोग. येथूनच हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये पट्टिका तयार होते. धमनी काठिन्य म्हणजेच एथेरोस्क्लेरोसिस हे हृदयविकाराचे मुख्य कारण बनत आहे. हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी, सामान्यत: ऑक्सिजनसह हृदयाचे पोषण करणारा रक्तपुरवठा खंडित होतो आणि हृदयाचे स्नायू मरण्यास सुरवात होते. ज्यामुळे हृदयाचे कार्य मंदावते आणि अनेकदा हृदय आपले कार्य थांबवते.
हार्ट अटॅक चे प्रकार
हृदयविकाराचा झटका येण्याचे दोन मुख्य प्रकार आहेत-
- टाइप-१ हार्ट अटॅक म्हणजे जेथे धमनीच्या आतील भिंतीवरील पट्टिका फुटते आणि कोलेस्टेरॉल आणि इतर पदार्थ रक्तप्रवाहात सोडते. ज्या नंतर एक रक्ताची गुठळी तयार होते व रक्तासाठी अडथळा निर्माण करते.
- टाईप-२ च्या हार्ट अटॅकमध्ये हृदयाला हवे तितके ऑक्सिजनयुक्त रक्त मिळत नाही, परंतु धमनीचा पूर्ण अडथळा नसतो.
हार्ट अटॅक ची कारणे
हृदयविकाराच्या झटक्याच्या इतर कारणांमध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत :
- फाटलेल्या रक्तवाहिन्या
- रक्तवाहिनीचे आकुंचन
- औषधांचा गैरवापर
- हायपोक्सिया (Hypoxia), रक्तातील ऑक्सिजनची कमतरता
आपल्याला हृदयविकाराच्या झटक्याची चेतावणी देणारी चिन्हे माहित असणे आवश्यक आहे जेणेकरून आपण स्वत: साठी किंवा जवळच्या एखाद्यासाठी व्यक्तीसाठी ताबडतोब मदत मिळवू शकतो.
काही हृदयविकाराचे झटके अचानक आणि तीव्र असतात. पण बहुतेक सुरुवात हळू हळू, सौम्य वेदना किंवा अस्वस्थतेपासून होते. Heart attack symptoms in Marathi पुढील प्रमाणे आहेत.
हार्ट अटॅक येण्याची लक्षणे – Heart attack symptoms in Marathi
हार्ट अटॅक येण्याची लक्षणे माहीत असल्यास तत्काळ त्याची ओळख करून योग्य उपचार घेता येतो. हृदयविकाराचा झटका येत आहे हे सांगणारी काही लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत-
- अचानक छातीत वेदना सुरू होणे.
- बैचेन व अस्वस्थ होणे.
- अचानक भीती वाटणे.
- श्वास घेण्यास त्रास होणे व दम लागणे.
- उलटी व मळमळ होणे.
- चक्कर येणे.
- अशक्तपणा येणे.
- खूप घाम येणे.
बऱ्याच वेळा हार्ट अटॅक येतांना वेदनांची सुरुवात छातीच्या मध्यभागापासून होते. आणि नंतर त्या वेदना खांदा, मान, हनुवटी व डाव्या हातापर्यंत पोहोचतात. जर आपण यापैकी हृदयविकाराचा इशारा देणारी कोणतीही लक्षणे अनुभवली तर लवकरात लवकर वैद्यकीय मदत घ्या.
अनेक घटक आपल्याला हृदयविकाराचा धोका निर्माण करू शकतात. काही घटक आपण बदलू शकत नाही, जसे की वय आणि कौटुंबिक इतिहास. परंतु अश्या ही काही गोष्टी आहेत ज्या करून आपण हृदयविकाराचा धोका टाळू शकतो.
हार्ट अटॅक वर उपाय
दिनचर्या मधील बदल आणि काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून आपण हृदय विकार आणि हार्ट अटॅक पासून वाचू शकतात. हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी पुढील गोष्टी अवश्य कराव्यात :
- उच्च रक्तदाब असल्यास त्यावर उपचार करा.
- दररोज व्यायाम करा. व्यायामात सूर्यनमस्कार केला जाऊ शकतो.
- आपल्या आहारात शक्य तितक्या वेळा पौष्टिक-समृद्ध पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा.
- कॉलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ खाऊ नका.
- तणाव घेऊ नका.
- पुरेशी झोप घ्या.
- औषधे घेत असल्यास नियमितपणे घ्या.
- धूम्रपान व मद्यपान करू नका.
- वजन खूपच जास्त असेल तर वजन कमी करा आणि निरोगी वजन टिकवून ठेवा.
- नियमित तपासणीसाठी आपल्या डॉक्टरांना भेटा.
हार्ट अटॅक कोणाला येऊ शकतो
६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो, असे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगने म्हटले आहे. तसेच, आपल्याकडे हृदयरोग, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा किंवा मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास असल्यास, आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असू शकतो. काही प्रकरणांमध्ये तरुण व वयस्क मंडळी मध्ये देखील हार्ट अटॅक निर्माण होऊ शकतो.
तर आजच्या या लेखात आपण हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक येण्याची लक्षणे – heart attack symptoms in marathi जाणून घेतले. त्याचसोबत आपण हृदयविकारची लक्षणे व हृदयविकार होऊ नये म्हणून हार्ट अटॅक वर उपाय व काय काळजी घ्यावी हेसुद्धा जाणून घेतले. आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल.
तर आजपासून योग्य आहार घ्या, नियमित व्यायाम करा, तणाव कमी घ्या आणि वर सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून तुमचे हृदय निरोगी बनवा. ही माहिती इतरांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद..