श्वास घेण्यात समस्या येणे, श्वास फुलणे, दम लागणे आणि छातीत दुखणे ह्या सामान्य समस्या आहेत आणि कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतात. परंतु दीर्घकाळापर्यंत छातीत दुखणे आणि श्वास घेण्यात समस्या निर्माण होणे गंभीर रोगाची लक्षणे असू शकतात. जर आपल्यालाही श्वास घेण्यात समस्या येत असेल तर आजच्या लेखात आम्ही काही घरगुती उपाय सामील केले आहेत ज्यांचा वापर करून आपण श्वास घेण्यात येणाऱ्या समस्यांना दूर करू शकतात.
Table of Contents
श्वास घेण्यात समस्या येणे आणि छातीत दुखणे
श्वास घेताना छातीत दुखणे यामागील मुख्य कारण पुरेसा ऑक्सिजन न मिळणे हे आहे. शरीराला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने फुफ्फुसांवर अनावश्यक दबाव पडतो आणि यामुळे व्यक्तीची श्वास घेण्याची कधी वाढवतो. यालाच श्वास फुलणे, दम लागणे अथवा श्वास घेण्यात अडचण निर्माण होणे असे म्हटले जाते.
श्वास फुलण्याची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत
- दीर्घ श्वास न घेऊ शकणे
- छातीत दुखणे
- हवेची कमतरता जाणवणे
- श्वास घेताना आवाज येणे
- घाम येणे
श्वास घेताना त्रास होणे आणि छातीत दुखणे घरगुती उपाय
- पिडीत व्यक्तीला टेका लाऊन सरळ बसवावे.
- जर त्या व्यक्तीने टाईट कपडे परिधान केले असतील तर ते काढायला लावावेत.
- व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न करावा. आणि चिंता न करण्यास सांगावे.
- जर व्यक्ती आधीपासून श्वासा संबंधी एखादी औषध घेत असेल तर त्याला ती द्यावी.
- जोपर्यंत योग्य मदत मिळत नाही तोपर्यंत पेशंटला एकटे सोडू नये त्याची हृदयाची धडधड श्वास तपासत राहा.
- श्वास घेण्यात अडचण येणार व्यक्तीने लांब लांब श्वास घेण्याचा प्रयत्न करावा.
- जीभ आणि ओठांना गोल करून श्वास आत घ्यावी.
श्वास घेण्यात समस्या येणे घरगुती उपाय
श्वास घेण्याच्या समस्येत उपयोगी लसुन
किचन मध्ये भाज्या सोबत उपयोगात आणल्या जाणाऱ्या लसणाचे फायदे फार आहेत. लसणाच्या सेवनाने बॅक्टेरिया, पोट दुखी, सर्दी खोकला आणि ताप दूर होतो. म्हणून श्वास घेण्यात समस्या असणाऱ्या लोकांनी दररोज सकाळी लसणाच्या दोन पाकळ्या खाली पोट चावून खाव्यात.
लौंग आणि ओवा
मसाल्याचे पदार्थ म्हणून वापरले जाणारे लौंग आणि ओवा यांचे मिश्रण दररोज एक चमचा घेतल्यास खूप फायदा होतो.
याशिवाय ओव्यांचा धूर देखील छातीत दुखणे आणि श्वास संबंधी विकारांमध्ये उपयोगी आहे. यासाठी गरम तव्यावर एक चमचा ओवा टाकाव्यात आणि त्यांच्या मधून निघणारा धूर नाकाद्वारे शरीरात ओढावा. ओवा जास्त जळल्या की त्यांना काढून टाकावे आणि नवीन ओवा टाकून त्यांचा धूर आत घ्यावा. हा उपाय श्वास घेण्यात अडचण येणाऱ्या प्रत्येकासाठी उपयोगी आहे.
तुळशी
भारतात जवळपास प्रत्येकाच्या घरात तुळशी चे झाड असते. दमा लागणे अथवा श्वास घेण्यात समस्या येत असेल तर तुळशी चे 5 ते 10 पाने रोज सकाळी खावीत. याशिवाय तुळशी च्या पानांचा रस, मध आणि अद्रक चा रस एकत्रित करून दम लागलेल्या व्यक्तीला पिण्यास द्यावा. हा उपाय दररोज केला जाऊ शकतो.
गरम वाफ
अनेक डॉक्टर आणि तज्ञ मंडळी वाफ घेण्याचे फायदे सांगतात. कोरोना काळात वाफ घेणे फार फायदेशीर ठरत आहे. म्हणून ज्याही व्यक्तीला श्वास घेण्यात अडचण निर्माण होत असेल त्यांने एका भांड्यात पाणी टाकून त्याला उकळावे. आता ह्या उकडलेल्या पाण्यातून निघणारी वाफ नाक आणि तोंडा द्वारे शरीरात खेचावी. गरम वाफ शरीरात गेल्याने फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते. याशिवाय जर आपल्याकडे वाफ घेण्यासाठी vaporizer मशीन असेल तर तुम्ही त्याचा ही उपयोग करू शकतात. चांगल्या दर्जाचे vaporizer मिळवण्याकरीता> येथे क्लिक करा
श्वास घेण्यास त्रास प्राणायाम
मित्रांनो आयुर्वेद आणि भारतीय योग मध्ये 99% रोगांचे निदान मिळून जाईल. श्वासोश्वास व्यवस्थित करण्यासाठी आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये प्राणायाम चे महत्व सांगितले आहे. श्वास घेताना त्रास होणे आणि छातीत दुखणे यासाठी काही प्रमुख प्राणायाम पुढील प्रमाणे आहेत.
1)नाड़ीशोधन प्राणायाम (अनुलोम विलोम)
अनुलोम विलोम ज्याला शास्त्रामध्ये नाड़ीशोधन प्राणायाम म्हटले गेले आहे. शरीरासाठी हे प्राणायाम खूप लाभदायक आहे. याला करण्यासाठी सर्वात आधी आपल्या उजव्या नाकाला बोटाने बंद करा, या नंतर डाव्या नाकाने श्वास आत भरा. श्वास थोडा वेळ आत रोखून उजव्या नाकाने बाहेर सोडा. याच पद्धतीला उलट्या पद्धतीने करण्यासाठी उजव्या नाकाने श्वास घेऊन डाव्या नाकाद्वारे बाहेर सोडा. सुरुवातीला हे प्राणायाम 5 ते 10 वेळा करा या नंतर तुम्ही वेळ वाढवू शकतात.
2) कपालभाती प्राणायाम
‘कपाल’ चा अर्थ होतो कपाळ आणि ‘भाती’ म्हणजे चमकणे. कपालभाती हे प्राणायाम करण्यासाठी सुखासनात बसावे दीर्घ श्वास पोटात भरून पोट बाहेर लोटा या नंतर श्वास बाहेर सोडत पोट आत घ्या. प्रणायमाची ही क्रिया पटापट करायची आहे. ह्या प्राणायाम ला 10 वेळा लागोपाठ करा.
3) शीतकारी
सुखासन मध्ये बसावे व वरचे व खालचे दांत एकमेकाना जोडावे. या नंतर जिभेला वर टाळू ला लावावे आणि दातामधून श्वास आत ओढावा. श्वास आत घेताना सिस असा आवाज येईल. हळू हळू पूर्ण शरीरात श्वास भरा, या नंतर नाकामधून श्वास बाहेर सोडावा.
शीतकारी प्राणायाम गळ्याच्या आजाराला दूर करतो, शरीरात थंडावा निर्माण करते, तोंडातील छाले दूर करण्यासाठी देखील उपयुक्त प्राणायाम आहे.
तर मित्रांनो हे श्वास घेताना त्रास होणे तसेच छातीत दुखणे इत्यादि वेदनांवरील घरगुती उपाय. जर आपली समस्या सामान्य असेल तर आपण हे उपाय घरच्या घरी नक्की करून पहा. परंतु जर आपणास दीर्घकाळ छातीत दुखत असेल तसेच श्वास घेण्यात अडचण येत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा. ह्या लेखात देण्यात आलेली घरगुती माहिती आपले कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद…
Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा