साधे पाणी व गरम पाणी पिण्याचे फायदे | Benefits of drinking water in Marathi

जल हेच जीवन आहे असे मानले जाते. शरीराला पुरेसे पाणी मिळाल्याने अनेक रोग दूर ठेवून निरोगी शरीर प्राप्त करता येते. पाणी फक्त व्यक्तीची तहान भागवत नसून, पचन दुरुस्त करणे, मेंदू वर चांगला प्रभाव टाकणे व शरीराला hydrated ठेवणे इत्यादी कार्य ते करीत असते. अनेक शारीरिक समस्या पुष्कळ पाणी पिल्याने दूर होऊन जातात म्हणूनच दिवसभरात भरपूर प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिले जाते.

आजच्या या लेखात आपण पुरेशा प्रमाणात योग्य पद्धतीने पाणी पिण्याचे फायदे, पाणी पिण्याचे नियम व गरम पाणी पिण्याचे फायदे कोणते आहेत याबद्दलची माहिती प्राप्त करणार आहोत.

पाणी पिण्याचे फायदे

पाणी पिण्याचे फायदे

सर्वात आधी आपण जाणून घेऊया की पाणी पिल्याने शरीरासोबत त्वचा आणि केसांना कोणकोणते फायदे होतात.

 • शरीरातील तरल संतुलनात राहते
  आपल्या शरीरात जवळपास 60% पाणी असते. म्हणून शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. पाणी पिल्याने शरीरातील पचन तंत्र, लाळ, गॅस्ट्रिक ज्यूस, अंडाशय मधील रस, पित्ता मधील रस, सलाईवा इत्यादींचे प्रमाण वाढते आणि नियंत्रणात येते. शरीरात पाण्याची कमी झाल्यास शरीरातील अवयवांचे कार्य बिघडते आणि थांबते. म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यावे.

 • पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते.
  अनेकदा पोट साफ न होण्याच्या समस्ये मागील प्रमुख कारण पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे असते. शरीरातील किडनी ला योग्य प्रमाणे कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. शरीरातील पाण्याची मात्रा कमी झाल्यास शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर टाकणे कठीण होते. अशा परिस्थितीत भरपूर पाणी पिणे आवश्यक असते. पाणी पिण्याचे फायदे माफहिल प्रमुख फायदा म्हणजे पाणी पिल्याने किडनी निरोगी राहते आणि पचन सुधारते. जर आपणास बद्धकोष्टतेची समस्या असेल तर भरपूर पाणी प्यावे. याशिवाय आपण गरम पाणी देखील पिऊ शकतात.

 • वजन कमी करण्यासाठी पाण्याचे उपयोग
  वाढलेले वजन व अनावश्यक चरबी घालवण्यासाठी पाणी पिण्याचे फायदे अनेक आहेत व या समसयेत पाणी अत्यंत उपयोगी साधन आहे. पाणी हे फक्त चरबी घालवण्यासाठी उपयुक्त नसून ते शरीराचे वजन देखील कमी करते. जेवणाआधी पाणी पिल्याने व्यक्तीला अधिक भूक लागत नाही व त्याचे जेवण आपोआप कमी होते.

  याशिवाय जर आपण गरम पाण्याच्या उपयोगाने वजन कमी करू इच्छिता, तर वजन कमी करण्यासाठी गरम पाण्याचे फायदे म्हणून आपण रोज सकाळी एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मध टाकून प्यावे. हा उपाय केल्याने जलद गतीने वजन आणि चरबी कमी होऊ लागते.

 • चेहऱ्यावर येते तेज आणि नवेपणा
  जर तुमच्या चेहऱ्यावर डाग, पुटकुळ्या, सुरकुत्या यासारख्या त्वचे संबंधित समस्या निर्माण होत असतील, तर अशा परिस्थितीत डॉक्टर देखील भरपूर पाणी पिण्याची सल्ला देतात. पाणी पिल्याने चेहऱ्याच्या रंगात नवेपणा येतो. पाणी पिल्याने शरीरातील Toxins आणि विषारी पदार्थ बाहेर निघतात. ज्यामुळे त्वचा टवटवीत दिसू लागते.

  अनेकदा हिवाळ्याच्या दिवसात त्वचा फुटणे यासारख्या समस्या निर्माण होतात. यामागील प्रमुख कारण देखील शरीरातील पाण्याची कमतरता हेच आहे. जर आपण फूटलेल्या त्वचेला पूर्ववत करू इच्छिता, तर भरपूर पाणी पिण्याची सवय आजच लावून घ्या.

 • रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि ऊर्जा निर्माण होते
  भरपूर प्रमाणात पाणी पिल्याने रोग प्रतिरोधक क्षमता वाढते. पाणी पिल्याने शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर निघतात ज्यामुळे शरीरात चांगल्या पेशींची वाढ होते. भरपूर प्रमाणात पाणी पिल्याने शरीरात अधिक ऊर्जा निर्माण होते.

पाणी पिण्याचे फायदे आपण जाणून घेतले परंतु घरात येणाऱ्या पाण्याला सर्वात आधी शुद्ध करणे आवश्यक असते. अशुद्ध पाणी प्यायल्याने शरीराला फायदे होण्याऐवजी नुकसान होऊ शकतात. म्हणून पाण्याला नेहमी शुद्ध करून प्यावे. पाणी शुद्ध करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे.

पाणी शुद्ध करण्याची पद्धत

पाण्याला शुद्ध करण्यासाठी त्याला उकळून घेणे अतिशय सोपी पद्धत आहे. जर आपण पाणी शुद्ध करू इच्छिता तर 10 ते 15 मिनिटांपर्यंत पाण्याला उकळावे व यानंतर त्याला पिण्यास घ्यावे.

पाण्याला शुद्ध करण्यासाठी तुरटी देखील उपयोगी आहे. तुरटीचे फायदे जल शुद्धीकरणात तुरटीचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात आहे. तुरटीच्या उपयोगाने पाणी शुद्ध करण्यासाठी पुढील पद्धत वापरावी.

 • सर्वात आधी तीन लिटर पाणी एका भांड्यात घ्यावे.
 • यानंतर या पाण्यात 35 ते 40 ग्रॅम तुरटी टाकावी आणि पाच मिनिटांपर्यंत तुरटी पूर्णपणे पाण्यात मिक्स होऊ द्यावी.
 • पाण्यात तुरटी टाकल्याच्या काही वेळातच तुम्हाला भांड्याच्या खाली तुरटी सोबत अशुद्ध पाणी दिसायला लागेल.
 • यानंतर गाळणी अथवा स्वच्छ कपड्याच्या साह्याने हे पाणी गाळून घ्यावे.
 • गाळलेले हे पाणी आपण पिण्यास वापरू शकतात.

पाणी शुद्ध करण्यासाठी वॉटर प्युरिफायर

वर सांगितलेल्या उपायां ऐवजी आजच्या काळात पाणी स्वच्छ करण्यासाठी वॉटर प्युरिफायर चा उपयोग देखील केला जातो. आजकाल बाजारात आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित नवनवीन वॉटर प्युरिफायर आले आहेत जे पाण्याला शुद्ध करण्यासोबतच त्याच्यातील योग्य गुणांना जपून ठेवण्याचे कार्य करतात.

जर आपण पुन्हा पुन्हा तुरटी आणि गरम पाण्याचा उपयोग करू शकत नसाल तर एक वॉटर प्युरिफायर आपण आपल्या घरात बसवू शकतात. उत्तम क्वालिटी चे Water Purifier ऑनलाइन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक पहा.

पाणी पिण्याचे नियम

 • पाणी पिणे शरीरासाठी उपयोगाचे आहे परंतु योग्य पद्धतीने पाणी न पिल्यास शरीराला हानी होऊ शकते. म्हणून आता आपण जाणून घेऊया पाणी पिण्याचे काही नियम.
 • जेवण करताना पाणी पियु नये. जेवणा दरम्यान पाणी पिल्याने पचनशक्ती कमजोर होते. म्हणून जेवत असताना पाणी पिऊ नये. परंतु जर जास्तच गळा कोरडा पडत असेल तर आपण एखाद घोट पाणी पिऊ शकतात.
 • जेवणाच्या 30 मिनिट आधी व जेवण झाल्याच्या 30 मिनिट नंतर पर्यंत पाणी पिऊ नये. असे केल्यास पचन मंदावते आणि अनेक समस्या देखील निर्माण होऊ शकता. म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पिण्याऐवजी आपण तोंडातील अन्न स्वच्छ करण्यासाठी पाण्याने गुळणी करू शकतात.
 • व्यायाम केल्यावर लगेच नंतर पाणी पिऊ नये. जर आपण व्यायामाला सुरुवात करीत असाल तर त्याच्या काही वेळेआधीच पाणी पिऊन घ्यावे. एक्सरसाइज नंतर लगेच पाणी पिल्याने शरीराला हानी होऊ शकते.
 • उभे राहून कधीही पाणी पिऊ नये. उभे राहून पाणी पिल्याने शरीरातील जॉईंट असलेले भाग कमजोर होऊ शकतात. जर आपण आलिया लक्षात ठेवणार व नेहमी बसून पाणी पिणार तर तुम्हाला जॉईंट संबंधी समस्या निर्माण होणार नाहीत.
 • जर तुम्हाला शरीरात उलटी, मळमळ, संडाशी यासारख्या समस्या उत्पन्न होत असतील तर साधे पाणी पिण्याऐवजी मीठ मिसळलेले पाणी प्यावे.
 • सकाळी उठल्याबरोबर दात न घासता पाणी पिणे शरीरासाठी लाभकारी असते. म्हणूनच सकाळी उठल्याबरोबर आपण एक ग्लास कोमट अथवा साधे पाणी पिऊ शकतात. हे पाणी पिल्याने शरीराला अनेक लाभ होतात. अनेक लोक सकाळी उठल्यावर चहा अथवा कॉफी पितात परंतु चहा, कॉफी पिणे ऐवजी पाणी पिणे शरीराला अधिक लाभदायक असते.
 • गटागट पाणी पिणे टाळा. अनेक लोकांना सवय असते कि ते एकच घोट मध्ये पूर्ण पाणी पिऊन जातात. असे करणे योग्य नाही पाणी हळुवार एक एक घोट घेत प्यावे. एक घोट काही सेकंदांपर्यंत तोंडात धरून ठेवल्याने तोंडातील लाळ त्यात मिसळते व पाण्यासोबत ही लाळ शरीरात गेल्याने पचन सुधारते.
 • फ्रिज चे थंड पाणी पिणे नेहमी टाळावे. फ्रीजचे पाणी शरीरासाठी हानिकारक असते. नेहमी माठ, तांबे व मातीच्या भांड्यात भरलेले पाणी प्यावे.

तर मंडळी आशा आहे या लेखात देण्यात आलेली पाणी पिण्याचे फायदे ही माहिती आपणास उपयोगी ठरली असेल. यामध्ये आम्ही गरम पाणी पिण्याचे फायदे व पाणी पिण्याचे नियम देखील समाविष्ट केले आहेत.

READ MORE

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *