पोट साफ होत नाही ? हा एक उपाय 100 टक्के पोटातील सर्व घाण बाहेर

मित्रांनो शरीरात होणाऱ्या अनेक रोगांचे प्रमुख कारण पोट साफ न होणे हेच असते. ज्याचे पोट आणि पचन तंदुरुस्त तो व्यक्ति पूर्णतः निरोगी मानला जातो. परंतु आज काल चुकीचे खान पान बदलती जीवनशैली इत्यादीमुळे पोटा संबंधीचे विकार वाढत चालले आहेत. यामध्ये बद्धकोष्ठतेचा प्रामुख्याने समावेश होतो. अनेकांना पोट साफ न होण्याची ही समस्या बिकट असते. आजच्या लेखात आम्ही आपल्याला पोट साफ होण्यासाठी जबरदस्त उपाय सांगणार आहोत या उपायाच्या एकदाच उपयोगाने आपले पोट स्वच्छ होऊ लागेल.

पोट स्वच्छ होण्यासाठी उपयोगी एरंडेल तेल

एरंड वनस्पती पासून बनवण्यात आलेले एरंडेल तेल औषधी रूपात खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. जवळपास प्रत्येक रोगात एरंडेल तेल चा उपयोग केला जातो. खास करून याचा उपयोग पोट साफ न होणे, मूळव्याध, खोकला, पोट दुखणे इत्यादी समस्यांमध्ये केला जातो. एरंडेल तेल कप, वात आणि पित्त नियंत्रणात आणण्याचे कार्य देखील करते. याशिवाय अनेक औषधी बनवण्यासाठी देखील एरंडेल तेल चा उपयोग केला जातो. पोट साफ करण्यासाठी एरंडेल तेल पुढील पद्धतीने उपयोगात घ्यावे.

सामुग्री

 • अर्धा चमचा एरंडेल तेल
 • अर्धा चमचा लिंबूचा रस

उपाय

 • एरंडेल तेल व लिंबू रस एकत्रित करावे.
 • आणि रोज सकाळ संध्याकाळ हे मिश्रण प्यावे.
 • लक्षात असू द्या एकावेळी एक चमचा पेक्षा जास्त पिऊ नये. अन्यथा जास्त संडास होऊ लागतील.

एरंडेल तेल खरेदीसाठी पुढील लिंक चा उपयोग करावा

मीठ आणि कोमट पाणी उपाय :

हा उपाय सकाळी उठल्यावर जेव्हा तुमचे पोट खाली असेल तेव्हा काहीही न खाता पिता करायचा आहे.

सामुग्री

 • कोमट पाणी
 • 1-2 चमचे जाड मीठ

उपाय

 • सर्वात आधी एक पेलाभर कोमट पाणी घ्यावे.
 • या पाण्यात 1 चमचा जाड मीठ टाकावे.
 • चमच्याच्या मदतीने संपूर्ण मिठ पाण्यात विरघळून घ्यावे.
 • यानंतर मिठ मिसळलेले हे पाणी प्यावे.
 • अधिक चांगला निकाल हवा असल्यास आपण एकाच्या या जागी दोन ग्लास पाणी पिऊ शकता.

समुद्राचे मीठ पोट साफ करण्यासाठी अत्यंत उपयोगी असते. यावर केलेल्या एका शोधानुसार गरम पाण्यात मीठ घेतल्याने आतड्यांची चांगली स्वच्छता होते व शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर टाकले जातात आणि संडास साफ होते.

अधिक माहितीसाठी विडियो

वाचा> पोट साफ होण्यासाठी इतर उपाय

या लेखात पोट साफ होण्यासाठी उपाय शेअर करण्यात आले आहेत. हे उपाय आपण पोटाची समस्या असणाऱ्या आपले मित्र व कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद..

वाचा> खोकल्यावर घरगुती उपाय

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा