This article contains gripe water uses in marathi and how to use gripe water for baby in marathi. here are also mentioned some brands like woodwards / pinku gripe water uses in marathi.
लहान बाळ खूप नाजूक असतात. बऱ्याचदा कोणतेही स्पष्ट कारण नसताना ते रडायला सुरुवात करतात. जास्त रडल्याने त्यांचा स्वभाव चिडचिडे होऊ लागतो व प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीवर ते रडणे सुरू करतात. अशावेळी जर बाळ रडायला लागले तर आई वडील त्याला ग्राईप वॉटर देतात. परंतु बऱ्याच लोकांना माहीत नसते की ग्राईप वॉटर काय आहे? व याचे बाळासाठी फायदे होतात की नुकसान? म्हणूनच ‘माझी काळजी’ च्या आजच्या या लेखात आम्ही आपल्याला ग्राईप वॉटर विषयी योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Table of Contents
ग्राईप वॉटर काय आहे ? Gripe water in marathi
ग्राईप वॉटर एक पेय पदार्थ आहे. ज्यामध्ये बडिशोप, ज्येष्ठमध, इलायची, अद्रक, लिंबू, शुद्ध पाणी आणि ग्लिसरीन सारखे पदार्थ वापरले जातात. ग्राईप वॉटर लहान मुलांना होणारी गॅस, अपचन, उचक्या, दात बाहेर येतानाचे दुखणे इत्यादी समस्यांमध्ये आराम देते. वैज्ञानिक शोधातून सिद्ध झाले आहे की लहान बाळांना ग्राईप वॉटर पाजणे योग्य आहे. परंतु कोणतेही ग्राईप वॉटर बाळाला देण्याआधी त्यामध्ये असलेले सर्व पदार्थ व्यवस्थित वाचावेत. याशिवाय लहान बाळांच्या डॉक्टरांना योग्य कंपनीचे ग्राईप वॉटर कोणते आहे याबद्दल विचारूनच त्याचा वापर करावा. असे केल्याने भविष्यात होणारी कोणतीही जोखीम टाळता येईल.
ग्राईप वॉटर चे फायदे – gripe water benefits in marathi
जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संतुलित प्रमाणात ग्राइप वाटर चा उपयोग केला गेला, तर लहान बाळासाठी हे अत्यंत फायदेशीर सिद्ध होईल. पुढे आपणास ग्राइप वाटर चे काही फायदे देत आहोत.
- ग्राईप वॉटर बाळांना होणाऱ्या पोटदुखी, अपचन, गॅस, उचकी इत्यादी समस्यांना दूर करते. या समस्या झाल्यावर बाळ दीर्घकाळापर्यंत रडत असते. परंतु ग्राईप वॉटर दिल्यावर त्याचे हे दुखणे काही हद्दीपर्यंत नियंत्रणात येते. परंतु कोणतेही ग्राईप वॉटर डॉक्टरांना विचारल्यावरच बाळाला पाजावे.
- जेव्हा बाळाला नवीन दात येऊ लागतात तेव्हा त्याच्या हिरड्यांमध्ये दुखायला लागते. यादरम्यान होणाऱ्या दुखण्याच्या समस्येला कमी करण्याकरिता लहान बाळाला ग्राइप वाटर पाजणे उपयुक्त ठरते.
- लहान बाळांना ग्राइप वाटर पाजल्याने त्यांचे पचन सुधारते. व बाळाचा सर्वांगीण विकास होतो.
बाळ गुटगुटीत होण्यासाठी काय करावे <<वाचा येथे
gripe water uses in marathi – लहान बाळांना ग्राइप वाटर केव्हा द्यायला हवे?
ग्राइप वाटर बनवणाऱ्या कंपनीनुसार याला एक आठवड्यापेक्षा मोठ्या असलेल्या बाळाला देणे सुरू केले जाऊ शकते. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक महिन्यापेक्षा लहान असलेल्या बाळाला ग्राइप वाटर देणे टाळावे. कारण एवढ्या लहान बाळाचे पचन तंत्र अजून विकसित झालेले नसते व ते अत्यंत संवेदनशील असते म्हणून असेही मानले जाते की सहा महिन्यांपर्यंत बाळाला फक्त आईचे दूध द्यावे. सहा महिन्यानंतरच ग्राईप वॉटर व इतर सप्लीमेंट्स देणे सुरू करावे.
बाळ 2.15 महिन्याच आहे जास्त रडत किर किर करत. गॅस आहे तर बाळाला ग्राईप वॉटर देणं योग्य आहे का