kadulimba che fayde in marathi : भारतात कदाचितच कुणी असेल ज्याने कडू लिंबाचे झाड पाहिले नाही. कडू लिंबाच्या झाडाला त्याच्या कडूपणा सोबतच आयुर्वेदिक गुणधर्मां करिता विशेष ओळखले जाते. आरोग्यासाठी कडुलिंबाचे फायदे अनेक आहेत. आजच्या लेखात आम्ही तुमच्यासाठी विविध रोगांमध्ये तसेच सौंदर्य वाढविण्यासाठी kadulimbache fayde सांगणार आहोत. तर चला सुरु करूया..
kadulimba che fayde in marathi
कडू लिंबाचे झाड
कडू लिंबाचे झाड भारतात आढळणारे एक वृक्ष आहे. या झाडाची लांबी 15 ते 20 मी. (50-65 फूट) पर्यंत असते. याच्या फांद्या चारी बाजूंना पसरलेल्या असतात. कडूलिंबाचे खोड आकाराने लहान, मजबूत आणि सरळ असते. या झाडाची पाने आकाराने लहान आणि गडद हिरव्या रंगाचे असतात. या पानांचा स्वाद कडू असतो. या झाडाचे फुल पांढरे आणि सुगंधित असतात. हिंदी भाषेत कडूलिंबाला नीम, इंग्रजीत मार्गोसा ट्री, संस्कृत मध्ये निंब, काकुल, सुभद्र अशा नावांनी ओळखले जाते.
Table of Contents
कडूलिंबाचे फायदे | kadulimba che fayde
कडूलिंबाची पाने जरी कडवट असली तरी आरोग्यासाठी व सौंदर्य वाढवण्यासाठी याचे अनेक लाभ आहेत.
चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी कडुनिंबाचे फायदे चेहऱ्यावर होणारे डाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी नीम उपयोगी वृक्ष आहे. त्वचेच्या कोणत्याही समस्येत निंबाची थोडी ताजी पाने घेऊन त्यांचे बारीक पेस्ट बनवावे. व हे पेस्ट त्वचेच्या प्रभावीत भागावर लावावे. काही वेळ चेहऱ्यावर लावल्या नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. हा उपाय नियमित आठवडाभर जरी केला तरी चेहरा सुंदर, टवटवीत आणि वांग विरहित होतो. चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपायवाचा येथे
केसांसाठी लिंबाचे फायदे लिंबाचे फायदे (kadulimba che fayde) केसांसाठी अत्यंत गुणकारी आहेत. केस गळती पासून तर नवीन केस उगवणे पर्यंत निंब उपयोगी ठरतो. केसांच्या विविध रोगांमध्ये लिंबाचे उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.
डेंड्रफ दूर करण्यासाठी kadulimba che fayde अनेक लोकांना केसांमध्ये डेंड्रफ होण्याची समस्या असते. निंबाच्या पानांमध्ये एंटीबैक्टीरियल आणि एंटीफंगल गुणधर्म असतात जे केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. स्कॅल्प क्लिनर म्हणून लिंबाचे पान अत्यंत उपयुक्त आहे. डोक्यात डँड्रफ होण्याची समस्या असेल तर एका भांड्यात काही निंबाची पाने उकडून घ्यावी व या पाण्याने केस धुवावे. याशिवाय लिंबाच्या पानांना कुटून पेस्ट बनवावे व या पेस्टमध्ये एक चमचा मध टाकावे. हे मिश्रण संपूर्ण केसांमध्ये लावावे. ह्या उपायाने केसांमध्ये डॅन्डरफ ची समस्या मुळापासून समाप्त होते आणि की मऊ मुलायम व सुंदर दिसू लागतात.
केस गळती थांबवण्यासाठी वाढत्या वयात सोबत केस गळण्याची समस्या वाढायला. केसांचे तुटणे आणि गळणे थांबवण्यासाठी निंबाचा पानांचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही केसांमध्ये निंबाचे तेल देखील वापरू शकता. केस गळती थांबवण्यासाठी आठवड्यातून दोनदा निंबच्या पानांचे पाणी उकळून त्याच्याने केस धुवावेत.
डोकेदुखीत निंबाचा वापर सुकलेल्या निंबाच्या झाडांची पाने, काळी मिरी आणि थोडे तांदूळ एकत्रित करून बारीक चूर्ण बनवावे. सूर्योदयआधी डोक्याच्या ज्या भागांमध्ये दुखत असेल त्या बाजूच्या नाकपुडीत एक चिमुटभर हे चूर्ण टाकावे. या उपायाने मायग्रेन व डोकेदुखीच्या समस्येत लवकर आराम मिळतो. डोके जड होणे घरगुती उपाय वाचा येथे
रक्तशुद्धीसाठी लिंबाचे फायदे कडूलिंब हा एक शक्तिशाली वृक्ष आहे. रक्त शुद्धी आणि शरीरातील हानिकारक विषयुक्त पदार्थ बाहेर टाकण्यासाठी कडूलिंबाचा वापर केला जातो. रक्तशुद्धीसाठी दररोज सकाळी 2 ते 3 कडुलिंबाची पाने मधासोबत सेवन करावी. खाली पोट ही पाने खाल्याने शरीर व शरीराचा त्वचेवर परिवर्तन दिसायला लागेल. या उपायाने शरीरातील विष युक्त पदार्थ बाहेर निघतील तसेच पोटातील जंतू नष्ट होतील.
युरिन इन्फेक्शन एक्सपर्ट च्या म्हणण्यानुसार कडुलिंबाची पाने युरिन इन्फेक्शन मध्ये उपयोगी ठरतात. लघवीत जळजळ व लघवी संबंधित इतर समस्यांमध्ये दररोज 4 ते 5 कडूलिंबाची पाने चावून खाल्ल्याने आराम मिळतो.
गर्भनिरोधक च्या रूपात कडूलिंबाचे उपयोग शास्त्रज्ञांनी केलेल्या शोधातून लक्षात आले आहे की कडुलिंबाचे तेल गर्भनिरोधक म्हणून देखील वापरले जाऊ शकते. संभोगाधी लिंबाचे तेल वापरल्याने गर्भ टाळता येतो. एक स्वच्छ मलमल चा कापड लिंबाच्या तेलात ओला करून संभोगाआधी योनीमध्ये ठेवावा. असे केल्याने गर्भधारणा टाळता येते. संभोग झाल्यावर हा कपडा काढून घ्यावा.
चर्मरोग /त्वचारोग मध्ये निंबाचे फायदे कडुलिंब त्वचेच्या रोगांमध्ये खूप गुणकारी आहे. याच्या उपयोगाने खाज, डाग, घामोळ्या, पुळ्या व दुर्गंध च्या समस्येपासून मुक्ती मिळते.
शरीरावर डाग व खाज ची समस्या झाली असल्यास लिंबाच्या पानांना बारीक कुठून त्यांचे पेस्ट त्या जागी लावावे व यावरून एक पट्टी बांधून घ्यावी. अशा प्रकारचा उपाय केल्याने लवकरात लवकर आराम मिळतो. गजकर्ण नायटा वर घरगुती उपाय वाचा येथे
पोटाच्या रोगांमध्ये कडुलिंब कडुलिंबाचे फायदे (kadulimba che fayde) पोटाच्या रोगांसाठी फार फायदेशीर आहेत. ह्या झाडाची पाने खाल्ल्याने ॲसिडिटी, बद्धकोष्टता, पोट दुखणे इत्यादी समस्यांमध्ये आराम मिळतो. म्हणून जर आपण बाहेर कुठे फिरायला अथवा कसरत करायला जात असाल तर तेथे नीम च्या झाडाचे एक दोन पाने तोडून खावून घ्यावीत.
कडुलिंबाचे इतर फायदेkadulimba che fayde in marathi
कडू लिंबाचे पान दात आणि हिरड्यांच्या रोगांना दूर करते.
कडुलिंब मध्ये एंटीफंगल गुणधर्म असतात जे फंगल इन्फेक्शन चांगले करतात.
कडुलिंबाचे सेवन केल्याने पोटातील आग, बद्धकोष्टता, पोटातील जंतू आणि सूज इत्यादी समस्यांमध्ये आराम मिळतो.
पोळणे, त्वचा कापली जाणे व जखम लवकर भरण्यासाठी लिंबाच्या पानांना बारीक करून प्रभावित जागेवर लावावे.
लिंबाच्या पानांना उकळून वाफ घेतल्याने अनेक रोगांमध्ये आराम मिळतो.
पावसाळ्याच्या दिवसात इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात लिंबाची पाने टाकून आंघोळ करावी.
केसांची चमक वाढवण्यासाठी शाम्पू मध्ये थोडे लिंबाचे तेल टाकून केस धुवावेत. असे केल्याने तुमच्या केसांची चमक वाढेल.
कडुलिंबाच्या काडीने दात स्वच्छ केल्याने तोंड व पोटासंबंधी असलेले सर्व रोग दूर होतात.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी कडू लिंबाच्या पानांना तूपा मध्ये शिजवून चावून खावे.
साप चावल्यावर प्रथमोपचार म्हणून कडू लिंबाचा पानांचा रस चावलेल्या जागी लावावा.
कडुलिंबाचे तेल | kadulimba che tel fayde
उत्तम दर्जाचे कडूलिंब तेल वरील सर्व उपयांसाठी वापरले जाऊ शकते. आपण कडूलिंबाचे तेल आयुर्वेदिक स्टोर आणि काही मेडिकल व किराणा दुकानावरून खरेदी करू शकतात. याशिवाय ऑनलाइन देखील कमी किमतीत कडुलिंब तेल उपलब्ध आहे. उत्तम दर्जाचे तेल खरेदी साठी येथे क्लिक करा…
कडुलिंबाचे नुकसान / तोटे
सामान्य प्रमाणात सेवन केल्याने कडुनिंबाचे काहीही दुष्परिणाम होत नाहीत. परंतु जास्त प्रमाणात पाने खाल्ल्याने, लहान बाळांना कडुलिंब खाऊ घातल्याने व गर्भवती स्त्रियांना याचे नुकसान होऊ शकतात.
जर आपण उपवास करीत असाल तर त्या दिवशी कडूलिंबाची पाने न खाल्लेलेच चांगले. कारण असे केल्याने तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते.
मधुमेह पीडित लोकांनी डॉक्टरांच्या देखरेखीखाली कडुलिंबाची पाने खावीत.
लहान बाळ, तसेच गर्भवती स्त्रियांनी कडूलिंबाची पाने खाऊ नयेत.
जर तुम्ही केसांना धुण्यासाठी कडुलिंबाचे तेल अथवा पाणी वापरत असाल तर थोडी सावधगिरी बाळगा. कारण हे तेल तुमच्या डोळ्यांना हानी करू शकते. नीम कामशक्ती कमी करतो म्हणून ज्या लोकांना अशी समस्या असेल त्यांनी याचा वापर करू नये.
तर मित्रांनो ह्या लेखात आपण कडुलिंबाचे फायदे व तोटे वाचलेत. आम्ही आशा करतो की ही माहिती आपणास उपयुक्त ठरली असेल kadulimba che fayde in marathi आपले कुटुंबीय आणि मित्रमंडळी सोबतही शेअर करा. जेणेकरून सर्वांना हे आयुर्वेदिक उपाय लक्षात येतील धन्यवाद..
कडू लिंबाचा रस पिल्याने काय होते ?
कडुलिंबाच्या पानांचा रस पील्याने शरीराला अनेक लाभ मिळतात. हा रस पिल्याणे रक्त स्वच्छ होते. संक्रमनाने होणारे रोग दूर राहतात. यासोबतच शरीराची कमजोरी व हाडांना बळकटी मिळते.
कडुलिंबाची पाने खाण्याचे फायदे.
कडुलिंबाचे पाने खाल्याने पोट स्वच्छ होते. रक्तशुद्धी, कॅन्सर, पचन सुधारणा, दात शुद्धी, मधुमेह, जलन, गॅस, वजन कमी करणे इत्यादी रोगांमध्ये आराम मिळतो