कोरफड चे औषधी उपयोग व खाण्याचे फायदे | aloe vera uses in marathi | korpad che fayde

This article contains the aloe vera uses in marathi, korpad che fayde and aloe vera in marathi. हे कोरफड औषधी उपयोग, एलोवेरा चे फायदे व कोरफडीचा उपयोग आपणास फार उपयोगी ठरतील.

aloe vera uses in marathi: आज-काल कोरफड हे घराघरात सहज पहायला मिळून जाते. यामागील प्रमुख कारण आहे त्याचे अगणित औषधी उपयोग. चेहरा असो वा केस, पुरुष असो वा स्त्री प्रत्येकाच्या शरीरासाठी आणि शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी कोरफड चे फायदे फार आहेत. आजच्या लेखात एलोवेरा चे फायदे, कोरफड खाण्याचे फायदे व कोरफडीचे औषधी उपयोग इत्यादींची विस्तारपूर्वक माहिती देण्यात आली आहे.

कोरफड औषधी उपयोग व कोरफडीचे फायदे – aloe vera uses in marathi

aloe vera uses in marathi

एलोवेरा चे रोप हे सौंदर्यासोबतच निरोगी आरोग्य आणि अनेक शारीरिक रोगांना दूर करण्यासाठी उपयोगी आहे. पुढे आम्ही आपल्याला एलोवेरा चे फायदे (कोरफड चे फायदे) देत आहोत.

वजन कमी करण्यासाठी कोरफड
फास्ट फूड व बाहेरचे तळलेले आणि अनहेल्दी भोजन केल्याने शरीराचे वजन वेगाने वाढते. याशिवाय पुरेसे शारीरिक श्रम न करणे हे देखील वाढत्या वजनाचे प्रमुख कारण असते.

अशात वजन कमी करण्यासाठी कोरफड ज्यूस उपयोगी ठरू शकते. कोरफड मध्ये anti-inflammatory गुणधर्म असतात. हे गुणधर्म वाढलेल्या शरीराचे वजन कमी करण्यासाठी मदतनीस सिद्ध होतात. म्हणून शरीराचे फॅट बर्न करण्यासाठी नियमित एलोवेरा जूस व एलोवेरा चे सेवन करावे.

बद्धकोष्टता (पोट साफ न होणे)
अनेक लोकांना पोट साफ न होण्याची समस्या असते. पोट साफ न झाल्याने अनेक रोग होतात. अत्याधिक रोगांचे प्रमुख कारण शरीरात असलेला मल बाहेर न पडणे हेच असते. कोरफड खाल्ल्याने या समस्येपासून मुक्ती मिळते. अनेक विशेषज्ञ बद्धकोष्ठतेचा समस्येत laxative खाद्य पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. हे पदार्थ शरीरातील मल नरम करतात आणि पोट स्वच्छ करतात.

जर आपल्यालाही जास्त तिखट व मसालेदार पदार्थ खाल्ल्याने शरीरात ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर कोरफड मध्ये असलेले laxative गुणधर्म तुमच्या शरीराला व पचनसंस्थेला डिटॉक्स करण्यात सहाय्यक ठरू शकतात.

सूज कमी करण्यासाठी कोरफड चे फायदे
बऱ्याचदा मार लागल्याने शरीरावर सूज निर्माण होते. सुजन चे प्रमुख कारण Oxidative damage असते. यामागे आपल्या शरीरात असलेले फ्री रॅडिकल्स देखील जबाबदार आहेत. कोरफड मध्ये भरपूर प्रमाणात antioxidant असतात. हे एंटीऑक्सीडेंट शरीरावर असलेली सूज कमी करण्यासाठी सहाय्यक असतात. यासाठी तुम्ही कोरफड च्या ज्यूस पिऊ शकतात किंवा सुजन असलेल्या जागी कोरफड लावू शकतात.

मधुमेह (diabetes) मध्ये कोरफड चे फायदे
मधुमेह अर्थात डायबिटीस आधीच्या काळात फक्त वृद्ध लोकांची बिमारी मानली जायची. परंतु आज बदलत्या जीवनशैलीमुळे हा रोग नवजात बालकांपर्यंत येऊन पोहोचला आहे. aloe vera uses in marathi डायबिटीज वर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित योग आणि खाण्यापिण्यावर कंट्रोल आवश्यक आहे.

एका शोधातून लक्षात आले आहे की जर मधुमेहाचे रोगी नियमित कोरफड ज्यूस पित असतील तर त्यांना या रोगात खूप लाभ मिळू शकतात. टाईप 2 डायबिटीज असणाऱ्या अनेक रोग्यांनी कोरफड सेवनाने आपल्या शुगर मध्ये कमी केली आहे. म्हणून टाइप 2 सोबतच टाईप 1 चे रोगी देखील कोरफड सेवन करू शकता.

चर्मरोग मध्ये कोरफड चे फायदे
शरीरावर अनेकदा डाग, खरूज, नायटा, घामोळ्या यासारखे त्वचारोग होतात. कोरफड चा उपयोग या रोगांमध्ये अत्यंत उपयुक्त आहे. यासाठी कोरफड चे पान मिक्सर मध्ये बारीक करून त्याचा गर त्वचेवर लावावा व त्यावर वरून एक कापडी पट्टी बांधावी. असे केल्याने चर्मरोग लवकर चांगला होईल.

त्वचेच्या सौंदर्यासाठी कोरफडचे फायदे

  1. कोरफड जेल कोरड्या त्वचेला moisturize आणि hydrated ठेवते. जर तुमची त्वचा डल, सुरकुत्या पडलेली आणि थकलेली दिसत असेल तर आपण कोरफड फेस पॅक चा उपयोग करू शकतात.
  2. दररोज रात्री झोपण्याआधी विटामिन ई या जेलमध्ये एकत्रित करून त्वचेवर लावावे. असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल, काळे डाग दूर होतील व चेहरा उजळून निघेल.
  3. अनेक लोकांच्या चेहर्‍यावर वयाआधी सुरकुत्या दिसू लागतात. याच्यावर कॉस्मेटिक ट्रीटमेंट आणि केमिकल प्रॉडक्ट वापरल्याने खर्च तर होतोच परंतु चेहऱ्याच्या त्वचेवर देखील याचे दुष्परिणाम होऊ शकतात. अशात कोरफड आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी प्रभावी आयुर्वेदिक औषध ठरू शकते. कोरफड मध्ये beta carotene, विटामिन ए, विटामिन इ आणि antioxidant असतात. जे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करून त्वचेला चांगले टेक्सचर देतात.
  4. सनबर्न ही उन्हाळ्यात होणारी सामान्य समस्या आहे. अधिक उन्हात पुरेसे शरीर न झाकता गेल्याने sunburn आणि tanning होते. सनबर्न कमी करण्यासाठी कोरफड जेल काही तास फ्रिजमध्ये ठेवावे व थंड झाल्यावर त्याला आपल्या शरीरावर लावावे. असे केल्याने शरीराला थंडावा मिळेल व सनबर्न ची समस्या कमी होईल.

चेहऱ्याला कोरफड कशी लावायची <<वाचा येथे

korpad che fayde
aloe vera uses in marathi

केसांसाठी कोरफड चे फायदे – aloe vera uses for hair in marathi

कोरफड जेल मध्ये केसांना कंडिशनिंग करण्याची शक्ती असते. आयुर्वेदिक कोरफड जेल अनेक महागड्या कंडिशनर ला मात देते. कोरफड मध्ये proteolytic enzyme असतात. हे enzyme मृत पेशींना केसांमधून बाहेर काढतात. सोबतच नवीन पेशी तयार करतात. शाम्पू लावून केस धुतल्यानंतर आपण कोरफडचा कंडिशनर बनवून उपयोग करू शकतात. कंडिशनर प्रमाने काहीवेळ कोरफड केसांना लावून सोडून द्यावे. यानंतर स्वच्छ कोमट पाण्याने केस धुवावेत.

केसातील कोंडा दूर करण्यासाठी कोरफड चे फायदे
डोक्यातील मृत पेशी मुळे केसांमध्ये कोंडाची समस्या निर्माण होते. जर आपणही डोक्यात खाज आणि डेंड्रफ च्या समस्येने त्रस्त असाल तर ह्या समस्यांचे एकमात्र घरगुती आयुर्वेदिक औषध आहे कोरफड. केसांमध्ये कोरफड लावल्याने डेड स्किन सेल्स बाहेर निघतात व स्कल्प मधील रोम छिद्र खुली होतात.

कोरफड ज्यूस कसा बनवावा

सामग्री

  • कोरफडीचे एक मोठे पान
  • एक कप पाणी
  • एक चमचा
  • लहान कटोरी
  • चाकू

विधी

  • सर्वात आधी ताजे तोडलेले कोरफड चे पान स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे.
  • यानंतर चाकूचा मदतीने त्याला मध्यभागी कापावे.
  • कापल्यानंतर कोरफड मधून सुरुवातीला जे पिवळे पदार्थ बाहेर येईल त्याला बाजूला काढून घ्यावे.
  • यानंतर पुन्हा एकदा कोरफड चे पान धुवावे.
  • आता एका चमच्याच्या मदतीने कोरफड मधील जेल एका वाटीत काढावे.
  • ज्यूस बनवण्यासाठी दोन चमचे कोरफड जेल मध्ये पाणी टाकून त्याला चमच्याने अथवा मिक्सर मध्ये बारीक करावे.
  • जेव्हा हे ज्यूस पाण्याप्रमाणे बारीक व पातळ होऊन जाईल तेव्हा त्याला एका ग्लास मध्ये काढावे.
  • हे ज्यूस पिण्याआधी स्वाद वाढवण्यासाठी त्यात लिंबू व अद्रक टाकावे.

सर्वात चांगले एलोवेरा जेल कोणते आहे ?

बाजारात अनेक प्रकारचे एलोवेरा जेल विक्रीला उपलब्ध असतात. परंतु आपणास यांच्यापासून पाहिजे तेवढा फायदा मिळणार नाही. चांगले परिणाम मिळवण्याकरिता नेहमी कोरफड च्या रोपट्या च्या पानाचाच रस वापरावा. यासाठी तुम्ही आपल्या घराच्या बाहेर कुंडी मध्ये एक कोरफड लावून ठेवू शकतात. कोरफड चे रोप आपणास कोणत्याही लहान मोठ्या रोपट्याचा दुकानावर मिळून जाईल. याशिवाय तुम्ही त्याला ऑनलाईन देखील खरेदी करू शकतात ऑनलाईन खरेदीसाठी येथे क्लिक करा..

तर मित्रांनो हे होते कोरफड चे फायदे कोरफड औषधी उपयोग (aloe vera uses in marathi). आशा करतो की ही माहिती आपणास उपयोगी ठरली असेल ह्या माहितीला आपले मित्र व कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद..

Thanks for reading aloe vera uses in marathi, korpad che fayde and aloe vera in marathi. i hope you like this information make sure you share this with your friends and relatives. thanks

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *