cough home remedies in marathi – खोकला घरगुती उपाय: वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या समस्यापैकी खोकला हीदेखील एक सामान्य समस्या आहे. अनेकदा सर्दी आणि खोकला दोन्ही समस्या एकाच वेळी निर्माण होतात. परंतु याशिवाय काही लोकांना सततचा खोकला येत असतो. ही समस्या बऱ्याचदा आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आजच्या या लेखात जवळपास सर्वच प्रकारच्या खोकल्याचे घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत. यामध्ये कोरडा खोकला, ओला खोकला, कफ पातळ करण्यासाठी उपाय, छातीतील कफ काढणे, सततचा खोकला आणि खोकला रामबाण उपाय देण्यात आले आहेत. तर चला सुरू करुया…
Table of Contents
खोकला होण्याची कारणे
सर्दी-खोकला होणे सामान्य गोष्ट आहे. वातावरणातील बदल, व्हायरल संक्रमण इत्यादी कारणांमुळे खोकल्याची समस्या निर्माण होते. खोकला होण्याची आणखी काही कारणे पुढील प्रमाणे आहेत.
- वायरल संक्रमण
- सर्दी वर फ्लू
- प्रदूषण व वातावरणातील धुळीमुळे
- अधिक प्रमाणात धुम्रपान करणे
- टीबी अथवा दमा रोग
- एलर्जी
- निमोनिया
- श्वसन संबंधी संक्रमण
- वातावरणातील बदल
- फफ्फुसांचे आजार (कॅन्सर)
- तोंड कोरडे पडणे (पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे)
- थंड वस्तू जसे आईस्क्रीम, कोल्ड्रिंक अधिक प्रमाणात सेवन करणे.
लहान बाळाचा सर्दी खोकला उपाय <<येथे वाचा
खोकला घरगुती उपाय
मीठ पाण्याच्या गुळण्या
एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मीठ टाकावे. व या पाण्याने गळगळा करावा. मीठ पाण्याने गुळण्या केल्याने गळा मोकळा होतो. खोकल्याच्या सामान्य समस्येत हा उपाय फार पूर्वीपासून केला जात आहे. नियमितपणे असे केल्याने गळा आणि श्वसन संबंधी संक्रमण दूर होते. म्हणून खोकल्याची समस्या असल्यास आपण हा उपाय करून पाहु शकतात.
हळद
हळद एक आयुर्वेदिक जडीबुटी आहे. खोकल्याच्या समस्येत हळदीचा उपयोग विशेष पद्धतीने केला जातो. यासाठी अर्धा कप गरम पाण्यात एक चमचा हळद पावडर आणि एक चमचा काळे मिरे टाकून उकळून घ्यावे. हा काढा आपण 2 ते 3 मिनिटे चांगल्या पद्धतीने उकळू शकतात. यानंतर मधाचा एक मोठा चमचा यात टाकावा. हा काढा आपण दैनिक पद्धतीने जोपर्यंत खोकला चांगला होत नाही तोपर्यंत पिऊ शकतात. cough home remedies in marathi मध्ये हळद उपयोगी आहे.
अद्रक
अद्रक हे खोकल्यासाठी लोकप्रिय घरगुती उपाय आहे. यासाठी ताज्या अद्रकला लहान लहान तुकड्यांमध्ये कापून घ्यावे. यानंतर ह्या तुकड्यांना एक कपभर पाण्यात उकळून घ्यावे. अद्रकच्या ह्या काढामध्ये आपण थोडे मध आणि लिंबुचा रस देखील टाकू शकतात. खोकल्यावर घरगुती उपाय म्हणून हा काढा दिवसातून एक वेळा प्यावा.
तुळशी चा उपयोग
खोकला घरगुती उपाय मध्ये तुळस च्या पानांचा रस काढून त्यात थोडे मध व अद्रक चा रस मिक्स करावा. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा सेवन केले जाऊ शकते. असे केल्याने खोकल्याच्या समस्येत लवकरात लवकर आराम मिळतो.
काळी मिरी
काळे मिरे खोकला च्या समस्येत आराम देण्यासाठी उपयोगी आहेत. यासाठी सर्वात आधी यांना बारीक कुटून घ्यावे. व यानंतर या पावडर ला तुपामध्ये भाजून घ्यावे. भाजलेले हे पाउडर दररोज खावे.