गुळवेल खाण्याचे फायदे आणि उपयोग | giloy & gulvel benefits in marathi

गुळवेल फायदे gulvel benefits in marathi : मित्रांनो आज कोरोना काळात प्रत्येकाला स्वतःचे रक्षण करण्यासाठी इम्युनिटी ची आवश्यकता आहे. अश्यातच रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्यासाठी एक नाव फार ऐकले जात आहे आणि ते म्हणजे गिलोय. गिलोय हा मुळात एक हिंदी शब्द आहे. याला मराठीत गुळवेल म्हटले जाते. आजच्या या लेखात आपण गिलोय अर्थात गुळवेल चे फायदे, गुळवेल चे उपयोग आणि माहिती मिळवणार आहोत तर चला सुरू करुया….

giloy & gulvel benefits in marathi गुळवेल खाण्याचे फायदे
gulvel benefits in marathi

गुळवेल काय आहे | Giloy in marathi

गिलोय चे मराठी नाव गुळवेल असे आहे. गुळवेल हा एक वेल असतो, जो खाली मैदान, रस्त्यांच्या कडेला, जंगले, बगीचे, झाडे झुडपे आणि भिंतींवर आढळतो. गुळवेल चे वैज्ञानिक नाव ‘टीनोस्पोरा कार्डीफोलिया’ (Tinospora Cordifolia) असे आहे. याला हिंदी, इंग्रजी, मराठी तसेच प्रत्येक स्थानिक भाषेत वेगवेगळे नाव देण्यात आले आहे.

असे म्हणतात की गुळवेल खूप जलद वाढतो. गुळवेल ची पाने चित्रात दाखवल्याप्रमाणे मोठी, चिकणी आणि हिरव्या रंगात असतात. गुळवेल च्या पानांचा स्वाद कडू आणि तिखट असतो. गुळवेल चा उपयोग करून वात पित्त आणि कफ चांगले केले जाऊ शकतात. गुळवेल चा उपयोग करतांना त्याचे खोड वापरले जाते. आजकाल बाजारात गुळवेल च्या खोडा पासून बनवलेल्या गोळ्या देखील उपलब्ध आहे.

गुळवेल चे फायदे | gulvel benefits in marathi

वेगवेगळ्या रोगांमध्ये गुळवेलचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग केला जातो. पुढे काही रोग व त्या रोगांमध्ये गुळवेल कशा पद्धतीने वापरायला हवी याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

डोळ्यांच्या विकारांमध्ये
10 मिली गुळवेल च्या रस मध्ये 1 ग्राम मध आणि 1 ग्राम जाड मीठ मिसळावे. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करावे. यानंतर याला एका डबीत भरून ठेवावे आणि दररोज रात्री काजळ म्हणून डोळ्यांना लावावे. असे केल्याने डोळ्यांसमोर अंधारी येणे, डोळ्यात दुखणे, डोळे लाल होणे आणि मोतीबिंदू सारखे डोळ्यांचे विकार दूर होतात.

याशिवाय गुळवेल च्या रस मध्ये त्रिफळा चूर्ण मिसळून काढा बनवावा आणि एक ग्लास काढा मध्ये एक चमचा मध टाकून सकाळ संध्याकाळ प्यावे. असे केल्याने डोळ्यांची निगा राखली जाते आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

क्षयरोगात गुळवेल चा उपयोग
ज्या लोकांना टीबी ची बिमारी असेल त्यांच्यासाठी अश्वगंधा, शतावरी, गुळवेल, दशमुल, बलामुल, अडूषा इत्यादींना बरोबर प्रमाणात एकत्रित करून काढा बनवावा. आणि रोगी व्यक्तीला दररोज एक ग्लास सकाळ संध्याकाळ पिण्यास द्यावे.

बद्धकोष्टता आणि पोट साफ न होणे
जर आपणास पोट साफ न होण्याची समस्या असेल तर गुळवेल च्या रस सोबत गुड चे सेवन करावे. असे केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

मधुमेह च्या रोगात गुळवेल चा उपयोग
गुळवेल मधुमेह चांगला करण्यासाठी देखील उपयोगी आहे यासाठी गुळवेल च्या 10-20 मिली रस मध्ये 2 चमचा मध टाकून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे. असे केल्याने डायबिटीस च्या झोपू काय लाभ मिळतो. गुळवेल मध्ये असणारे हाइपोग्लाईकैमिक एजेंट शुगर कंट्रोल करतात. म्हणून मधुमेह रोग्यांना गुडवेल चा ज्यूस पिण्याची सल्ला दिली जाते.

रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्यासाठी
जवळपास 95% रोग हे कमी इम्मूनिटी असल्याने होतात. जर एखादा व्यक्ती पुन्हा पुन्हा आजारी पडत असेल तर यामागील प्रमुख कारण त्याची कमी रोग प्रतिरोधक क्षमता आहे.

या समस्येकडे लवकरात लवकर लक्ष द्यायला हवे. रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही. दररोज गुळवेल ज्यूस अथवा गुळवेल च्या घनवटी चे सेवन केल्याने शरीरात रोग प्रतिरोधक क्षमता वाढण्यासोबतच पुढील फायदे होतात.

  1. शरीरातील टॉक्सिन आणि हानीकारक पदार्थ बाहेर निघतात.
  2. नपुसंकता दूर होते.
  3. मूत्राशय मधील संक्रमण आणि रोग दूर होतात.
  4. लिव्हर संबंधी आजार दूर राहतात.

कावीळ साठी गुळवेल चा उपयोग (jaundice)
जर एखादा व्यक्ती कावीळच्या रोगापासून ग्रस्त असेल. तर गुळवेल चे 20-30 पाने घेऊन त्यांना बारीक कुटून घ्यावे. यानंतर एक ग्लास ताक घेऊन या पानांना त्यात मिक्स करावे. हे ताक गाळून रोग्याला सकाळ संध्याकाळ दिल्याने कावीळ लवकरात लवकर चांगला होते.

डाबर गिलोय घनवटी जुनी व विश्वसनीय आहे पुढील लिंक वर क्लिक करून आपण खरेदी करू शकतात>> येथे खरेदी करा

गुळवेल चा काढा कसा बनवायचा

आता आपण पाहूया की तुम्ही कशा पद्धतीने घरच्या घरी गुळवेल चा काढा बनवून त्याच्या सेवनाने निरोगी आरोग्य मिळवू शकतात.

सामग्री
दोन कप पाणी
गुळवेल चे 1-1 इंच चे पाच तुकडे
एक चमचा हळद
2 इंच अद्रक चा तुकडा
6 ते 7 तुळशीचे पाने आणि गुड

काढा बनवण्याची विधी
सर्वात आधी एका भांड्यात दोन कप पाणी उकळावे. यानंतर उकळत्या पाण्यात वर देण्यात आलेली सामुग्री एक सोबत टाकावी. जर आपण ह्या सर्व सामुग्री ला कुटून बारीक करून टाकाल तर आपणास अधिक लाभ होईल.

जेव्हा गुळवेल चा संपूर्ण अर्क पाण्यात येऊन जाईल आणि पाणी देखील उकळून अर्धे होऊन जाईल. तेव्हा हे पाणी गाळून घ्यावे व चहा प्रमाणे याचे सेवन करावे.

महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे

गुळवेल कोठे मिळेल

गुळवेल ही जास्त करून लिंबाच्या झाडाच्या आजूबाजूला आढळते. ही भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात मिळून जाईल. याशिवाय आयुर्वेदिक दुकाने आणि मेडिकल वर देखील गुळवेल चे चूर्ण आणि घनवटी उपलब्ध आहेत.

गुळवेल कसा ओळखावा

गूळवेळ ची पाने दिसण्यात पिंपळसारखी असतात.
गूळवेळ हा एखादे झाड अथवा भिंतीच्या आधाराने च वर जातो.
गूळवेळ खाल्यावर त्याचा स्वाद सुरुवातीला कडू आणि नंतर गोड लागतो.
गूळवेळ खाल्या नंतर पानी पिले तर पानी गोड लागते.

गुळवेल पाऊडर (चूर्ण) चे फायदे

गुळवेल पाऊडर चे फायदे देखील गुडवेल ज्यूस आणि गुडवेल घनवटी प्रमाणेच आहेत.

गिलोय का मराठी नाम क्या है ?

गिलोय ला मराठी मध्ये गुळवेल म्हटले जाते.

गुळवेल चा काढा कसा बनवायचा

एका भांड्यात पानी घ्यावे आणि त्यात गुळवेल च्या खोडाला टाकावे जर आपल्याकडे गुळवेल चूर्ण असेल तर त्याचा वापर करावा. आता हे पानी चांगले उकळावे आणि पानी अर्धे झाले ती त्याला ग्लास मध्ये टाकावे व थंड करून प्यावे.

गुळवेल काढा किती दिवस घ्यावा

आजार चांगला करण्यासाठी गुळवेल चा काढा 15 दिवसांपर्यंत घ्यावा. यानंतर आठवड्यातून एकदा नियमित घेऊ शकतात.

गुळवेल कशी लावावी

गुळवेल बी तुम्हाला रोपट्यांच्या दुकानावर 30-50 रुपयात मिळून जाईल. गुळवेल चे बी लावण्याआधी त्याला अर्धा तास पाण्यात भिजून ठेवावे. यानंतर हे बी घरातील लहान कुंडीत अथवा तुमच्या बगीच्यात लावावे.

तर मित्रांनो ह्या लेखात आपण आयुर्वेदी औषध असणारे गुळवेल खाण्याचे फायदे पाहिले. आशा आहे की gulvel benefits in marathi आपणास उपयोगी ठरले असतील. अधिक आयुर्वेदिक औषधांची माहिती मिळवण्यासाठी पुढील लिंक्स पहा.

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *