तोंड आल्यावर घरगुती उपाय व जिभेला फोड येणे उपाय | mouth ulcer home remedies in marathi

तोंड आल्यावर घरगुती उपाय : मित्रांनो आपल्याला बर्‍याचदा तोंड आल्यावर तोंडात फोड येऊन जातात. तोंडातील छाले फार असहनीय पीडा देतात. हे फोड जीभ, ओठ, गळा आणि तोंडात कोठेही होऊ शकतात. तोंडातील फोडांची समस्या सामान्य आहे. जी जवळपास प्रत्येक व्यक्तीला कधी न कधी होतेच. तोंडातील छाल्यामुळे त्या जागी जलन, सुजन आणि जेवताना त्रास निर्माण होतो. म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी तोंड आल्यावर घरगुती उपाय व ओठ आणि जिभेला फोड येणे यावर घरगुती उपाय सांगणार आहोत.

तोंडात छाले का होतात

आयुर्वेदात तोंडातील फोडांची समस्या का होते याविषयी माहिती देण्यात आली आहे. याशिवाय डॉक्टर देखील छाले होण्याची पुढील कारणे सांगतात.

 • अधिक तिखट खाणे
 • पोट साफ न होणे व बद्धकोष्ठता
 • अधिक उष्णता
 • एखादी वस्तू खाण्यापिण्याची एलर्जी
 • अधिक वेळ उन्हात व उष्णतेत राहणे
 • अधिक धूम्रपान करणे
 • पोटासंबंधी विकार
 • नियमित तोंड स्वच्छ न करणे
 • खराब लाइफस्टाइल
 • अत्याधिक तनाव
 • कमजोर इम्युनिटी
 • छाले असलेल्या व्यक्तीचे उष्टे अन्न खाणे
 • विटामिन सी ची कमतरता
 • तापामुळे
 • वातावरणातील बदल
 • तोंडाचा कॅन्सर

तोंड आल्यावर घरगुती उपाय

तोंडातील छाले दूर करण्यासाठी आहार व जीवनशैलीतील बदल आवश्यक आहे. जर आपल्या तोंडात ही छाल्याची समस्या झाली असेल तर पुढील उपाय आपल्याला 1 ते 2 दिवसात आराम देतील.

बर्फाचा घरगुती उपाय
जिभेला फोड येणे व तोंडात छाले होणे यावर एक घरगुती उपाय म्हणजे बर्फ होय. बर्फ तुम्हाला सहज कोठेही मिळून जाईल. यासाठी तुम्हाला बर्फाचा एक तुकडा घेऊन छाल्यांवर लावायचा आहे. काही वेळ हा तुकडा असाच लावलेला असू द्या. या उपायाने तोंडातील फोडांच्या समस्येत आराम मिळेल

मध आणि ज्येष्ठमध
तोंड आल्यावर घरगुती उपाय म्हणून मध आणि मुलेठी अर्थात ज्येष्ठमध चूर्ण एकमेकात मिसळून छाल्यावर लावावे. काही वेळ लावलेले राहू द्यावे व यानंतर तोंडातील लाळ बाहेर गळू द्यावी.

मिठाचा घरगुती उपाय
तोंडातील फोडांवर सर्वात सोपा आणि असरदार उपाय मिठाचा आहे. मीठ कोणत्याही घरात सहज उपलब्ध होते. यासाठी तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात 1 ते 2 चमचे मीठ टाकून त्या पाण्याने गुळण्या करू शकतात. असे केल्याने सुरुवातीला. तुम्हाला छाल्यांवर जलन होईल परंतु ह्या उपायाने सर्व फोड आधीपेक्षा कमी होऊन जातील.

तुळस
तुळशी तोंडातील फोड दूर करण्यासोबतच तोंडाच्या इतर समस्या देखील दूर करते. तोंड आल्यावर घरगुती उपाय म्हणून 5-6 तुळशीचे पाने कुटून त्यांचे पेस्ट तोंडातील फोडांवर लावावे. हा उपाय २ दिवस करावा. ह्या उपायाने लवकरच आपल्याला आराम मिळेल.

हळद
अनेक रोगांमध्ये रामबाण उपाय असलेली हळद तोंडातील फोडाच्या समस्येत देखील उपयुक्त आहे. जर तुमच्या तोंडात छाले झालेले असतील तर कोमट पाण्यात हळद टाकून या पाण्याने 10-15 मिनिटे गुळण्या कराव्यात. तोंडात पाण्याचा घोट घेऊन 1 ते 2 मिनिटे त्याला संपूर्ण तोंडात फिरवावा.

कडूलिंबाचे उपयोग
कडुलिंब अनेक औषधी गुणधर्मांनी सुसज्ज वृक्ष आहे. तोंडातील छालेच्या समस्येत 5 ते 6 कडुलिंबाची पाने तोंडात चावून खावीत.

तोंडात व जिभेला फोड येणे घरगुती उपाय

 • तिखट व मसाले युक्त पदार्थ खाणे टाळावे.
 • जर आपल्याला chewing gum खाण्याची सवय असेल तर ही सवय सोडावी. कारण बरेचदा च्युइंग गम खाल्ल्याने तोंडात छाले होतात.
 • याशिवाय एका भांड्यात कडूलिंबाची पाने टाकून पाणी गरम करावे. हे पाणी थंड झाल्यावर त्याच्याने गुळण्या कराव्यात. (कडूलिंबाचे फायदे <येथे वाचा)
 • विटामिन सी युक्त फळ व भाज्या खाव्यात.
 • दुधापासून बनवलेले खाद्यपदार्थ जसे दही, ताक पनीर, दूध इत्यादींचे सेवन करावे.
 • जेवणासोबत सलाद म्हणून कच्चे कांदे खावेत.
 • पोषक तत्वं असलेला आहार घ्यावा.
 • दररोज 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे.
 • बद्धकोष्ठतेची समस्या दूर ठेवावी. यासाठी भोजनात फळ व हिरव्या भाज्यांचा समावेश करावा.
 • ग्रीन टी चे सेवन करावे.
 • तोंडाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे.
 • दातांची स्वच्छता नरम ब्रशने करावी. जास्त टणक व जाड दाती असलेला ब्रश वापरल्याने देखील बरेचदा छाले होतात.

तर मित्रांनो ह्या लेखात आपण तोंड आल्यावर घरगुती उपाय जिभेला फोड येणे घरगुती उपाय इत्यादि विषयांवरील माहिती प्राप्त केली. आशा करतो की ही मराठी माहिती आपणास उपयुक्त ठरली असेल. व ह्या उपायांनी आपण तोंडात, जिभेवर व ओठांवरील फोड कमी केले असतील. आरोग्य, ब्युटि व लाइफस्टाईल विषयांवरील मराठी माहिती मिळवत राहण्यासाठी माझी काळजी ह्या आपल्या वेबसाइट ला भेट देत राहा.

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *