कंबर दुखीवर घरगुती उपाय व कारणे | kambar dukhi upay in marathi

कंबर दुखीवर घरगुती उपाय : कंबर दुखणे फक्त वृद्धावस्थेतील दुखणे नसून हे कोणत्याही वयात होऊ शकते. आज-काल तासन्तास ऑफिसच्या खुर्चीवर बसून राहणे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातील महिला व पुरुषांमध्ये देखील ही समस्या निर्माण होत आहे. कंबर दुखीमागे अनेक कारणे असू शकतात. परंतु जर दुखणे नॉर्मल असेल तर कंबर दुखीवर घरगुती उपाय करून दुखणे कमी केले जाऊ शकते. आजच्या या लेखात आपण कंबर दुखीवर घरगुती आयुर्वेदिक उपाय आणि कंबर दुखी व्यायाम व योगासन ची माहिती प्राप्त करणार आहोत.

कंबर दुखीवर घरगुती उपाय

कंबर दुखी ची कारणे | kambar dukhi chi karne

सामान्य कंबर दुखी ची कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात-

  • अधिक जड वस्तू उचलणे.
  • अचानक एक झटका लागून उठणे.
  • चुकीच्या मुद्रेत मध्ये उभे राहणे किंवा बसणे.
  • अधिक तणाव करणे
  • एक्सीडेंट मध्ये मार बसणे.

कंबर दुखीवर घरगुती उपाय | kambar dukhi upay in marathi

आता आपण कंबर दुखण्यावर घरगुती उपाय पाहूयात. पुढील उपाय अचानक होणाऱ्या सामान्य कंबरदुखीसाठी आहेत.

1) लव्हेंडर तेल
एन सी बी आय द्वारे करण्यात आलेल्या शोधात हे लक्षात आले आहे की अरोमा थेरेपी करीत असताना लॅव्हेंडर तेलाचे उपयोग कंबर दुखी ची समस्या कमी करण्यात उपयोगी आहे. कंबर दुखी मध्ये लॅव्हेंडर तेलाचे उपयोग करण्यासाठी ज्या ठिकाणी दुखत असेल तेथे लव्हेंडर तेलाचे तीन ते चार थेंब लावुन हलक्या हाताने मालिश करावी. हा प्रयोग आठवड्यातून दोन ते तीन वेळा करावा. लॅव्हेंडर तेलाचे फायदे <<येथे वाचा

2) योग्य पोश्चर
तुमच्या बसण्याची योग्य मुद्रा पाठीचे दुखणे कमी करण्यात सहाय्यक ठरू शकते. जेव्हाही खुर्ची वर बसाल तेव्हा पाठीला सपोर्ट असायला हवा. दोन्ही हात ठेवण्यासाठी देखील टेका असावा. प्रत्येक एक तासानंतर खुर्चीवरून उठून शरीराच्या स्थितीत थोडे बदल करावे. स्ट्रेचिंग व हलक्या एक्सरसाईज करून शरीर रिफ्रेश करावे. काम करण्याची तुमची जागा आरामदायी असायला हवी. अचानक वाकण्यापासून वाचावे.

3) झोपण्याची योग्य पद्धत
आपल्या झोपण्याच्या पद्धतीत बदल करावे. शरीराचे संपूर्ण वजन पाठीवर आणि कमरेवर टाकुन न झोपता. एका कानिवर झोपावे.

4) मानसिक तणाव कमी करावा
अत्याधिक तणाव आणि टेन्शन घेतल्याने कंबर आणि पाठीचे दुखणे वाढते. म्हणून ज्या लोकांना ही समस्या असेल त्यांनी कमीत कमी तनाव करायला हवा. योग, ध्यान आणि दीर्घ श्वास घ्यावेत असे केल्याने अनावश्यक तणाव कमी करण्यास मदत मिळेल.

5) नियमित व्यायाम आणि योग करावा
शरीराला अधिक लवचिक बनवण्याकरिता नियमितपणे व्यायाम आणि योग व आसन करायला हवेत. योग शरीराचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ निरोगी ठेवण्याचे प्रभावी साधन आहे. पाठ आणि कंबर दुःखीची समस्या असणाऱ्यांनी पुढील आसन नियमितपणे करावेत.

कंबर दुखी साठी व्यायाम

भुजंगासान- भुजंगासन केल्याने पाठ कंबर व संपूर्ण शरीराची चांगलीच कसरत होऊन जाते. हे आसन करण्यासाठी पोटावर झोपावे यानंतर दोन्ही हाताचे पंजे छातीजवळ ठेवावेत. व श्वास आत घेत कंबर पासूनचे शरीर वर उचलावे. काही वेळ या स्थितीत थांबून पुन्हा खाली यावे.

कंबर दुखी साठी व्यायाम

धनुरासान- हे आसन करीत असताना शरीराचा आकार धनुष्य प्रमाणे बनतो. ह्याला करण्याकरिता सर्वात आधी पोटावर झोपावे. यानंतर दोन्ही पायांना गुडघ्यातून वाकवून वर उचलावे आणि हातांनी पायांच्या पंज्यांना पकडावे. चित्रात दाखवल्याप्रमाणे शरीराची रचना करावी. ही रचना एका धनुष्यबाणाप्रमाणे असते. हा अवस्थेत काही वेळ थांबावे व पुन्हा पूर्ववत स्थितीत यावे.

कंबर दुखी साठी व्यायाम kambar dukhi upay in marathi

शलभासन- सर्वात आधी पोटावर झोपावे. दोन्ही हात मांडीवर ठेवावेत. श्वास आत घेत सर्वात आधी उजव्या पायाला न वाकवता वर उचलावे आणि यानंतर हळू हळू डाव्याला वर करावे. हे आसन तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार करू शकतात.

5) तुळस चे पान
तुळशी चे पान अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक औषधीच्या रूपात वापरले जात आहे. कंबर दुखी चे आयुर्वेदिक औषध म्हणून तुळशीचा उपयोग केला जाऊ शकतो. यासाठी तुळशीचे पाने एक कप गरम पाण्यात उकळावे. स्वादासाठी यात मध टाकावे आणि पाणी थंड होण्याआधी प्यावे. याचे नियमित सेवन केल्याने कंबर दुखी मध्ये दीर्घकाळ आराम मिळतो.

6) गरम पाण्याची शेक
गरम पाणी तसेच हीटींग पॅड च्या शेक ने कंबर दुःखी कमी करण्यात मदत मिळते. जेथे ही कंबर दुखत असेल त्या जागी हॉट वॉटर बॅग ने 25 ते 30 मिनिटे शेकावे. ही शेक दररोज घ्यावी. शेक घेतल्याने कंबर, पाठी आणि शरीराच्या स्नायूंमध्ये असलेले खीचाव कमी होतो व दुखण्यापासून मुक्ती मिळते. जर दुखणे जास्त असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार थंड अथवा गरम शेक ची निवड करावी.

तर मित्रांनो हे होते कंबर दुखीवर घरगुती उपाय आणि kambar dukhi chi karne आम्ही आशा करतो की हे उपाय करून आपल्याला नक्की आराम मिळेल. परंतु जर ह्या घरगुती उपायानंतर ही दुखणे सुरूच असेल तर डॉक्टरांशी संपर्क नक्की करा. व योग्य वैद्यकीय सल्ला आणि उपचार घ्या. धन्यवाद

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *