Breast cancer symptoms in Marathi : स्तनाचा कर्करोग हा एका तऱ्हेचा कॅन्सर आहे, ज्याची सुरुवात स्तनातून होते. एका सर्व्हेतून लक्षात आले आहे की भारतातील 10 पैकी एक महिला स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. स्तन शरीराचा एक प्रमुख भाग आहेत, ज्यांचे कार्य टीश्शू द्वारे दूध तयार करणे असते. हे टिश्यू सूक्ष्म धमण्यांद्वारे निप्पल ला जोडलेले असतात. अधिकतर स्तन कॅन्सर च्या प्रकरणांमध्ये धमन्यांमध्ये छोटे परंतु कठोर कण जमू लागतात, ज्यामुळे स्तनाच्या टिश्यू मध्ये गाठ निर्माण होते व कॅन्सर वाढू लागते.
काही दुर्लभ प्रकरणांमध्ये स्तनाचा कर्करोग हा पुरुषांमध्ये देखील होऊ शकतो. परंतु हे देखील लक्षात ठेवायला हवे की स्तनातील प्रत्येक गाठ ही स्तन कॅन्सर नसते. स्तनाचा कर्करोग एक्स-रे द्वारे माहित केला जाऊ शकतो. याशिवाय ही स्तनाच्या कर्करोगाची पुढील काही लक्षणे आहेत-
स्तनाचा कर्करोग लक्षणे
स्तन कॅन्सरचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे स्तन आणि काखेच्या क्षेत्रात गाठ निर्माण होणे होय. याशिवाय पुढील काही लक्षणे (Breast cancer symptoms in Marathi) आहेत ची अनुभवयास मिळू शकतात.
- स्तन आणि काखेच्या क्षेत्रात सतत दुखणे
- स्तनाची त्वचा लाल होणे
- एक अथवा दोन्ही निपल्स वर लाल दाणे
- स्तनाचा आकार बदलणे
- स्तनातून रक्त येणे
- स्तनाची त्वचा कठोर होणे
- निप्पल आतील बाजूला जाणे (उलटे होणे)
जर आपणास स्तनात गाठ झाली असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही कारण प्रत्येक गाठ ही कॅन्सर असेलच असे नाही. म्हणून न घाबरता डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार घ्यावा.
स्तनाचा कर्करोग होण्याची कारणे
Breast cancer symptoms in Marathi स्तनाचा कर्करोग का होतो या मागील प्रमुख कारण अजूनही स्पष्ट नाही परंतु काही गोष्टी आहेत ज्यामुळे हा रोग होऊ शकतो. त्या पुढील प्रमाणे-
कुटुंबातील इतिहास : अनेकदा स्तन कॅन्सर होण्यामागील प्रमुख कारण कुटुंबातील रोगाचा इतिहास असू शकते. ब्रेस्ट कॅन्सर आरोग्य पिढ्यान्पिढ्या चालणारा रोग आहे. जर घरातील जवळची व्यक्ती या रोगाने ग्रस्त असेल तर कालांतराने हा रोग कुटुंबातील इतर सदस्यांना देखील होऊ शकतो.
नशील्या पदार्थांचे सेवन : दारू, सिगरेट, ड्रग्स इत्यादी पदार्थांचे सेवन महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग वाढवीत आहेत. कोणत्याही नशील्या पदार्थांचे अति सेवन केल्याने शरिरात कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
काही तज्ञाद्वारे सांगितले जाते की फक्त 5% ते 10% महिला या आनुवंशिक कर्करोगाने ग्रस्त असतात, परंतु उरलेल्या 90% ते 95% महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमुख कारण तणाव, योग्य वेळी मुलांना दूध न पाजणे इत्यादी आहेत.
वाढत्या वयासोबत स्तनाचा कर्करोग होण्याची जोखीम देखील वाढत जाते. आकाराने मोठे स्तन असणाऱ्या महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची जोखीम अधिक असते.
स्तनाचा कर्करोग उपचार
जर आपणास स्व परिक्षणातून स्तनाचा कर्करोग आहे असे जाणवत असेल तर तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन योग्य टेस्ट करावेत. स्तनाच्या कर्करोगात अनेक उपचार आहेत ज्यामध्ये किमोथेरेपी, रेडिएशन, सर्जरी इत्यादींचा समावेश आहे.
तर मित्रहो आजच्या या लेखात आपण Breast cancer symptoms in Marathi म्हणजे स्तनाचा कॅन्सर ची लक्षणे, उपचार आणि स्तनाचा कर्करोग विषयी ची मराठी माहिती प्राप्त केली. आशा आहे ही मराठी माहिती आपणास उपयोगी ठरली असेल. याशिवाय जर आपले काही प्रश्न असतील तर आपण आम्हास कमेन्ट व ईमेल संपर्क करून विचारू शकतात.
अधिक वाचा :