This article contains all the information about hiv in marathi and the symptoms of hiv in marathi. The purpose of this information is just to share information and awarness about HIV AIDS. If you see any symptoms of aids then immediately contact with doctors and test the hiv.
Table of Contents
एच आय व्ही एड्स काय आहे ? What is HIV AIDS in Marathi
एच आय व्ही अर्थात Human immunodeficiency virus (HIV) हा एक संक्रामक वायरस आहे. यालाच एड्स (acquired immunodeficiency syndrome) देखील म्हटले जाते. हा वायरस सर्वात आधी शरीराच्या पेशींवर हल्ला करून शरीराची रोग प्रतिरोधक क्षमतेला गंभीर नुकसान पोहोचवतो. परिणामी एच आय व्ही/एड्स पीडित व्यक्तीची संक्रमणापासून लढण्याची शक्ती कमी होते. हा व्हायरस हळू हळू शरीरातील सर्व पांढऱ्या पेशी (CD 4) नष्ट करतो आणि जर लवकर योग्य औषध घेऊन उपचार केला गेला नाही तर CD 4 पेशींवर संपूर्णपणे ताबा मिळवून हा वायरस आपल्या अनेक प्रती तयार करून टाकतो.
एच आय व्ही एड्स वायरस संक्रमित व्यक्तीच्या सोबत असुरक्षित लैंगिक संबंध बनवणे, संक्रमित व्यक्तीला वापरलेले इंजेक्शन दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी पुन्हा वापरणे. इत्यादी कारणांमुळे पसरतो. सध्याच्या स्थितीला भारतात जवळपास 23 लाख 50 हजार HIV रुग्ण आहेत. एच आय व्ही एड्स ची भयावह स्थिती लक्षात येण्याकरीता हे आकडे पुरेसे आहेत.
एचआयव्ही एड्स ची लक्षणे – symptoms of HIV in Marathi
एच आय व्ही ची लक्षणे (symptoms of hiv in marathi) संक्रमणाच्या steps नुसार वेगवेगळी असतात. या रोगाचे तीन टप्पे असतात. पहिला-अॅक्युट प्रायमरी इन्फेक्शन, दुसरा – क्लिनिकल लेटेंसी, तिसरा – एड्स. अनेक रोग्यांना सुरुवातीला आपल्या अवस्थेबद्दल माहीत नसते. एचआयव्ही एड्स ची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत.
- पुन्हा पुन्हा ताप येणे
- गळा खराब होणे
- शरीरावर चट्टे
- थोड्याच कामानंतर थकवा येणे
- डोकेदुखी
- हळूहळू वजन कमी होणे
- विनाकारण तणाव आणि चिंता वाटणे
- जेवल्यानंतर लगेच उलटी होणे
- नेहमी सर्दी खोकला असणे
एचआयव्ही एड्स होण्याची प्रमुख कारणे
- लैंगिक संबंधांव्दारे
जर कोणी आधीपासून एचआयव्ही संक्रमित असलेल्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध बनवीत असेल आणि संक्रमित व्यक्तीचे रक्त, वीर्य अथवा योनी स्त्राव आपल्या शरीरात घेत असेल तर यामुळे एचआयव्ही होऊ शकतो. याशीवाय योनी, गुदाद्वार व मुखमैथुन मुळे देखील एचआयव्ही एड्सचे संक्रमण पसरते. सेक्स कसा करावा <<वाचा येथे. - इंजेक्शन
जर एचआयव्ही संक्रमित व्यक्तीला वापरलेली इंजेक्शनची सुई चांगल्या व्यक्तीला वापरण्यात आली तर एचआयव्ही पसरण्याची शक्यता असते. - रक्त संचरण
रक्त संचरण अर्थात संक्रमित व्यक्तीचे रक्त चांगल्या व्यक्तीच्या शरीरात सोडल्याने देखील एचआयव्ही होतो. - गर्भावस्था आणि स्तनपान द्वारे
जर एखादी स्त्री एचआयव्ही संक्रमित असेल तर बाळाला जन्म देताना तसेच स्तनपान द्वारे मुलाला देखील एचआयव्ही होऊ शकतो.
एचआयव्ही पासून बचाव कसा करावा ?
आजपर्यंत एचआयव्ही (symptoms of hiv in marathi) एड्स चे संक्रमण दूर करणार्या vaccine चा शोध लागलेला नाहीये. म्हणून या रोगापासून स्वतःचा बचाव करणे हाच यावरील एकमेव उपाय आहे. जर आपण स्वतः ला एचआयव्ही संक्रमण पासून दूर ठेवू इच्छित असाल तर पुढील गोष्टी कायम लक्षात ठेवा.
- असुरक्षित शारीरिक संबंध ठेवण्याआधी स्वतःची व आपल्या साथीची एचआयव्ही टेस्ट करावी.
- एचआयव्ही चे मुख्य कारण असुरक्षित लैंगिक संबंध हेच आहे. म्हणून कायम संभोग करताना कंडोम चा वापर करावा.
- असुरक्षित व एकापेक्षा जास्त सोबती सोबत सेक्स करणे टाळावे.
- शारीरिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष ठेवावे.
- डॉक्टर कडून इंजेक्शन घेत असताना, स्वच्छ आणि नवे इंजेक्शन आहे का याची खात्री करून घ्यावी.
एच आय व्ही टेस्ट कधी करावी
जर आपल्याला शरीरात एचआयव्ही ची लक्षणे – symptoms of hiv in marathi दिसत असतील तर लवकरात लवकर दवाखान्यात जाऊन एचआयव्ही टेस्ट करावी. कारण आपण जेवढा विलंब कराल तेवढे शारीरिक स्वास्थ्य बिघाडत जाईल. एच आय व्ही चे विविध टेस्ट पुढीलप्रमाणे आहेत.