दात दुखीवर घरगुती उपाय | teeth pain home remedy in marathi | dat dukhi var upay

दात दुखीवर घरगुती उपाय : दुखणे कोणतेही असो ते पीडादायक असते. आणि दातांचे दुखणे तर अत्यंत कष्टदायक असते. दातांचे दुखणे हिरड्याना देखील कमजोर करते. दात सळसळ करणे सुरु झाले तर सर्व चित्त दातांवरच केंद्रित होते ज्यामुळे इतर कामांमध्ये देखील लक्ष राहत नाही.

आजच्या लेखात आम्ही आपल्यासाठी दात दुखीवर घरगुती उपाय (teeth pain home remedy in marathi) तसेच दात सळसळ करणे यावर उपाय घेऊन आलो आहोत. हे उपाय केल्याने तुमचे दात स्वच्छ करता येतील आणि दात दुखी देखील कमी करता येईल.

दात दुखीवर घरगुती उपाय | teeth pain home remedy in marathi

दात दुखीवर घरगुती उपाय | teeth pain home remedy in marathi

दात दुखी साठी लौग चे तेल
लौग अथवा लौगचे तेल दात दुखी मध्ये फार उपयुक्त आहे. जर तुमचे दात दुखत असेल तर त्यावर काही वेळ लौग तेल लावावे. जर तेल उपलब्ध नसेल तर तुम्ही एक लौग आपल्या दातामध्ये काही वेळ दाबून धरू शकतात.

दात दुखीसाठी लसुन चे उपयोग
लसुन चा उपयोग दात दुखी मध्ये अत्यंत लाभदायक आहे. लसूण मध्ये अनेक औषधी गुण असतात. लसुन खाण्याचे फायदे खूप सारे आहेत. दात दुखी मध्ये लसुन च्या पाकळ्या कुस्करून घ्याव्यात यानंतर यामध्ये काळे मिरे आणि थोडेसे मीठ टाकून हे मिश्रण दुखणाऱ्या दातावर लावावे. काही दिवस हा उपाय केल्याने दात दुखी कमी होते.

कपूर
दात दुखी कमी करण्यासाठी कपूरचा उपयोग देखील केला जातो. कपूरच्या मदतीने दात दुखण्याच्या समस्येत लवकर आराम मिळतो. यासाठी सुंठ च्या चूर्ण मध्ये कपूर चे चूर्ण मिसळून दुखणाऱ्या दातावर लावावे.
याशिवाय तुम्ही दुखणाऱ्या दातांच्या आत कपूर दाबून ठेवू शकतात. काही वेळ कपूर दातांच्या आत ठेवल्याने दात दुःखी आपोआप कमी होऊ लागते.

खाण्याचा सोडा (baking soda)
खाता सोडा दात दुखी कमी करण्यासाठी तसेच किडलेल्या दातांना पुन्हा सफेद करण्याकरिता वापरला जातो. जर तुम्हालाही दात दुखण्याची अथवा किडलेल्या दातांची समस्या असेल तर तळहातावर थोडा खाता सोडा घेऊन बोटाच्या मदतीने त्याला दुखणाऱ्या दातावर चोळावे. हा उपाय दिवसातून दोन वेळा केल्यास काळे दात स्वच्छ आणि पांढरे तर होतातच परंतु दातांचे दुखणे (teeth pain home remedy in marathi) देखील दूर पळते.

दात दुखत असल्यास काय खाऊ नये

 1. दात दुखी पासून ग्रस्त असणाऱ्या लोकांनी आपले खानपान पुढीलप्रमाणे ठेवायला हवे.
 2. गोड आणि चिकट पदार्थांचे सेवन करू नये.
 3. खूप जास्त थंड अथवा गरम वस्तू खाऊ पिऊ नये.
 4. जास्त तेल व मसाल्यांनी युक्त पदार्थ सेवन करू नये.
 5. काहीही खाल्ल्यानंतर दातांवर ब्रश फिरवावा आणि गुळण्या कराव्यात.

दात सळसळ करणे उपाय

 1. तोंडाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.
 2. तंबाखू, गुटखा खाऊ नये.
 3. कमी शुगर असलेली डायट घ्यावी.
 4. दिवसभरातून कमीत कमी दोन वेळा ब्रश करावा.
 5. वेफर व स्नेक्स कमीत कमी खावे.
 6. साखरयुक्त पदार्थ सेवन करू नये.
 7. धुम्रपानापासून दूर रहावे.
 8. दूध, दही व दुधापासून बनलेल्या इतर पदार्थांचे सेवन करावे.
 9. स्वच्छ पोष्टीक आहार सेवन करा.
 10. दर सहा महिन्यांनी डेण्टल चेकअप करीत राहावा
दात दुखीमध्ये डॉक्टरांशी संपर्क केव्हा करावा
 • जर दातांचे दुखणे खूपच जास्त झाले असेल.
 • जर दुखणे दोन पेक्षा जास्त दिवस सुरू असेल.
 • जर दातदुखी सोबत ताप, कानात दुखणे आणि तोंड उघडण्यात परेशानी होणे इत्यादी समस्या येत असतील तर.
 • जर दातांच्या दुखण्या सोबत श्वास घेण्यात कठीण होत असेल तर.
 • चेहऱ्यावर सूज आली असेल तर.
 • अन्नाचा स्वाद समजत नसेल तर.

तर मंडळी ह्या लेखात आपण दात दुखीवर घरगुती उपाय (teeth pain home remedy in marathi) पाहिलेत. जर आपण दात दुखण्याच्या बिकट समसयेपासून त्रस्त असाल तर हे उपाय नक्की करून पाहा. परंतु जर आपणास ह्या उपायांनी देखील आराम मिळत नसेल तर एकदा डेंटिस्ट शी संपर्क करून नेमके कारण नक्की विचारावे.

अधिक लेख वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *