Panfuti plant uses in marathi : पानफुटी एक सरळ, 1 ते 2 मी. लांब आणि सदाबहार औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात पानफुटी चा उपयोग किडनी आणि मूत्राशय संबंधी विकारांमध्ये केला जातो. याशिवाय पोटासंबंधी विकार, मूळव्याध, त्रिदोष आणि रक्तशुद्धी इत्यादी अनेक रोगांमध्येही पानफुटी उपयोगी आहे.
आजच्या या लेखात आपण पानफुटी वनस्पतीचे फायदे व उपयोग – panfuti plant uses in marathi आणि पानफुटी वनस्पती ची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर चला सुरू करुया…
Table of Contents
पानफुटी वनस्पती काय आहे
पानफूटी हे सहज आढळणारे एक लहान रोपटे आहे. आपल्यामधून अनेक लोकांनी याला आपल्या घराबाहेर व बागेत लावले देखील असेल. पानफुटी वनस्पतीला हिन्दी भाषेत ‘पत्थरचट्टा’ म्हटले जाते. इंग्रजी भाषेत या रोपट्याला Bryophyllum Pinnatum असे म्हटले जाते. bryophyllum in marathi म्हणजेच पानफूटी चे झाड होय. नावाप्रमाणेच हे रोपटे पानातून उगते. याचे कोणतेही बी नसून, पानफूटी चे रोप त्याच्या पानाला मातीत लावल्यावर उगते.
पानफूटी वनस्पती चे रोप आणि पाने आपणास सहज मिळून जातील व यानंतर आपण त्यांना आपल्या घरी कुंडीत लावू शकतात. फार कमी कालावधीत हे रोप वाढायला लागते व त्याला मोठ मोठाली पाने येऊ लागतात. पानफुटी वनस्पती उपयोग व फायदे अनेक आहेत त्याविषयीची माहिती पुढे देण्यात आली आहे.
पानफुटी चे उपयोग आणि फायदे | Panfuti plant uses & benefits in marathi
panfuti plant benefits in marathi : आयुर्वेदात पानफुटी च्या सेवनाचे विशेष नियम आहेत. जसे या झाडाचे फक्त दोन पाने तोडून, पाण्याने स्वच्छ करून सकाळी खाली पोट गरम पाण्यासोबत खावे. तुम्ही पानफुटी च्या पानांना कच्चे बारीक चावून खाऊ शकतात. याशिवाय पानांना तोडून त्यांची भाजी व पकोडे देखील बनवता येऊ शकतात. विविध रोगांवरील panphuti plant uses in marathi पुढील प्रमाणे आहेत-
किडनी स्टोन (पानफुटी मुतखडा)
पानफुटी वनस्पती चे सेवन मुतखडा बरा करण्यासाठी मोठीप्रमाणात केले जाते. पानफुटी मुतखडा बरा करणारी संजीवनी म्हणून ओळखली जाते. या विकारात पानफुटी या जडीबुटीचा उपयोग पुढील प्रमाणे केला जाऊ शकतो.