मुलतानी माती फायदे : सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी मुलतानी मातीचे फायदे खूपच आहेत. आपल्या देशात मुलतानी माती अनेक युगांपासून वापरली जात आहे. मुलतानी मातीचा उपयोग त्वचा आणि केसांच्या उत्तम आरोग्यासाठी केला जातो. अनेक ब्युटी पार्लर तसेच त्वचेच्या उत्पादनांमध्ये मुलतानी माती समाविष्ट केलेली असते. बऱ्याचदा आपणास प्रश्न पडला असेल की मुलतानी माती कुठे तयार होते ? मुलतानी माती ही पाकिस्तानच्या ‘मुलतान’ प्रदेशात आढळते. म्हणून या मातीला ‘मुलतानी माती’ म्हटले जाते.
आजच्या या लेखात आपण मुलतानी मातीचे फायदे, मुलतानी माती फेसपॅक आणि मुलतानी माती कशी लावावी यासोबतच मुलतानी माती किंमत काय आहे याबद्दलची माहिती प्राप्त करणार आहे तर चला सुरु करूया…
मुलतानी माती म्हणजे काय आहे ?
मुलतानी मातीचे फायदे वाचण्याआधी आपण या माती बद्दल थोडी माहिती प्राप्त करुया. मुलतानी मातीला इंग्रजीत Fuller’s earth म्हटले जाते. ही माती मुख्य रूपाने हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेट चे रूप आहे. या मातीत मॅग्नेशियम, सोडियम आणि कॅल्शियम सारखे धातू असतात जे त्वचा स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
मुलतानी माती चे फायदे
सर्वात आधी आपण त्वचेसाठी मुलतानी मातीचे फायदे पाहूया व चेहऱ्याला मुलतानी माती कशी लावायची याबद्दलची माहिती जाणून घेऊया…:
चकाकत्या त्वचेसाठी मुलतानी माती कशी लावायची फेसपॅक
सामग्री
- एक चमचा मुलतानी माती
- एक चमचा टमाट्याच्या रस
- एक चमचा चंदन पावडर
- अर्धा चमचा पेक्षा कमी हळद पावडर
- एक रुमाल
उपयोग करण्याची विधी
- चेहऱ्याला स्वच्छ पाण्याने धुवावे आणि रुमालने पुसून स्वच्छ करावे.
- यानंतर एका लहान वाटीत सर्व सामग्री एकत्रित करुन पेस्ट बनवावे.
- आता हे पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावावे. हे पेस्ट डोळे आणि तोंडाच्या नाजूक त्वचेवर लागता कामा नये याची खात्री करावी.
- यानंतर 15 मिनिटे हे पेस्ट सुकू द्यावे.
- 15-20 मिनिटानंतर हलक्या गरम पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.
वर दिलेले फेस पॅक आठवड्यातून एकदा नक्की लावावे. हे फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावरून मृत त्वचेला काढेल आणि नवीन चमक देईल. या सोबतच चेहऱ्यावर असलेली रोम छिद्र उघडून चेहरा शुद्ध करते. या फेसपॅक नंतर आपण बॉडी लोशन किंवा त्वचे संबंधित असलेली क्रीम लावू शकतात.
तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती फेसपॅक
सामग्री
- एक चमचा मुलतानी माती
- एक चमचा गुलाबजल
विधी
- सर्वात आधी चेहऱ्याला स्वच्छ धुवावे.
- यानंतर एका वाटीत मुलतानी माती आणि गुलाब जल एकत्रित करून पेस्ट बनवावे.
- आता हे पेस्ट चेहऱ्याच्या नाजूक त्वचेवर हळुवार लावावे.
- जोपर्यंत हे पेस्ट सुकत नाही तोपर्यंत चेहऱ्यावरच राहू द्यावे.
- सुकल्यानंतर चेहऱ्याला थंड पाण्याने धुवावे.
हा उपाय आठवड्यातून एक किंवा दोन वेळा करावा. मुलतानी माती चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलकटपणा दूर करण्यासाठी उपयोगी आहे. हा उपाय केल्याने त्वचेवर असलेला अत्याधिक तेलकटपणा कमी होतो व चेहऱ्यावरील तेल नियंत्रणात येते.
कोरड्या त्वचेसाठी मुलतानी माती फेसपॅक
सामग्री
- एक चमचा मुलतानी माती
- एक चमचा मध
- तीन ते चार द्राक्ष
विधी
- एका वाटीत द्राक्षे कुस्करून मध आणि मुलतानी माती सोबत मिक्स करावेत.
- फेस पॅक बनवण्यासाठी जेवढे आवश्यकता असेल तेवढेच मध घ्यावे. जास्त मध वापरू नये.
- आता हे मिश्रण चेहर्यावर लावावे.
- वीस मिनिटानंतर जेव्हा चेहरा पूर्णपणे सुकलेला राहील तेव्हा थंड पाण्याने चेहरा धुवावा.
- यानंतर चेहऱ्यावर मोईश्चररायझर क्रीम लावावी
हा उपाय आठवड्यातून एकदा करावा. मुलतानी माती मधासोबत एकत्रित केल्याने चेहऱ्याला नमी प्रदान करणारे घटक तयार होतात. जर कोणाची त्वचा खूप शुष्क आणि कोरडी असेल तर हा उपाय करायला हवा. हा उपाय केल्याने तुमच्या चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लॉक होईल. द्राक्षांमध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात. म्हणून चेहऱ्यावर वेळेआधी येणार्या सुरकुत्या कमी करण्यासाठी द्राक्षे उपयोगी आहेत.
पिंपल च्या समस्येत मुलतानी माती फेसपॅक
सामग्री
- दोन चमचे मुलतानी माती
- अर्धा चमचा हळद पावडर
- दोन चमचे मध
विधी
- सर्व सामग्री एकत्रित करून पेस्ट बनवावे.
- सर्वात आधी चेहरा फेस वॉश ने स्वच्छ करावा.
- यानंतर बनवलेले फेस पॅक चेहऱ्यावर लावावे.
- 15 ते 20 मिनिटे झाल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.
हा फेस पॅक आठवड्यातून एकदा नक्की करा. नियमित पणे असे केल्याने तुमचा चेहरा स्वच्छ, चमकदार आणि वांग विरहित होईल. पिंपल्स च्या समस्येपासून आपली पूर्णपणे सुटका होईल.
केसांसाठी मुलतानी माती कशी लावायची
आधीच्या काळात जेव्हा शाम्पू नव्हते तेव्हा लोक मुलतानी मातीचा उपयोग करून केस स्वच्छ करायचेत. मुलतानी मातीच्या उपयोगाने त्या काळातील लोकांचे केस घनदाट आणि केसासंबंधी सर्व समस्यांपासून मुक्त राहायचे. आता आपण केसांसाठी मुलतानी मातीचे फायदे पाहूया:
डेंड्रफच्या समस्येत मुलतानी मातीचे फायदे
सामग्री
- चार चमचे मुलतानी माती
- सहा चमचे मेथीचे दाणे
- एक चमचा लिंबूचा रस
विधी
- मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत.
- सकाळी हे दाने बारीक करुन पेस्ट बनवावे आणि ह्या पेस्ट मध्ये मुलतानी माती आणि लिंबूचा रस टाकून पॅक बनवावा.
- आता हे मिश्रण केसांच्या आत लावावे. डोक्याच्या त्वचेपर्यंत हे मिश्रण पोहोचायला हवे.
- केसांमध्ये हा पॅक लावल्यावर अर्धा तास थांबावे.
- अर्ध्या तासानंतर शावर अथवा हातानेच केसांवर पाणी टाकून स्वच्छ धुवावे.
- केस धुतल्यानंतर कंडिशनर लावावे.
हा पॅक आठवड्यातून एकदा जेव्हाही तुम्ही केस धूणार तेव्हा केसांना लावू शकता. मेथीचे बी डेंड्रफ समस्येत खूप छान उपचार आहेत. जेव्हा मुलतानी माती, मेथी आणि लिंबू एकत्रित केले जातात तेव्हा केसांचे रोम मजुबुत करण्यासाठी खूप मदत मिळते. व केसमधील अशुद्धी आणि डेंड्रफ नष्ट होतो.
चांगल्या आरोग्यासाठी मुलतानी मातीचे फायदे
- नेहमी निरोगी राहण्याची इच्छा करणाऱ्यांनी मुलतानी मातीचे पुढील उपाय करायला हवेत.
- मुलतानी माती शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करते यासाठी महिन्यातून एकदा मुलतानी मातीचा संपूर्ण लेप आपण शरीरावर लावू शकतात.
- जर उन्हामुळे तुम्हाला खूप गरम होत असेल तर हा लेप शरीराला थंडावा देतो.
- जर शरीरावर कुठे जखम अथवा एलर्जी झाली असेल तर मुलतानी मातीचा पॅक उपयोगी सिद्ध होतो.
- तनाव आणि चिंता कमी करण्यासाठी कपाळावर मुलतानी माती लावली जाऊ शकते.
मुलतानी माती चे नुकसान
- मुलतानी माती थंड असते म्हणून थंडीच्या दिवसात हीचा वापर केल्याने शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात.
- मुलतानी माती खाल्ल्याने किडनी स्टोन होऊ शकतो.
- कोरडी त्वचा असणाऱ्यांनी मुलतानी मातीचा अधिक उपयोग करू नये. कारण ही माती तुमची त्वचा अधिक कोरडी करू शकते.
- मुलतानी माती चा उपयोग केला नंतर मॉइस्चरायझर लावायला विसरू नका. कारण असे न केल्यास त्वचा कोरडी पडण्याचा धोका असतो.
- मुलतानी मातीचा उपयोग आठवड्यातून दोन वेळा पेक्षा जास्त करू नये .
मुलतानी माती खाण्याचे फायदे
बरेच लोक म्हणतात की मुलतानी माती खाण्याचे फायदे होतात. परंतु तुम्हास सांगू इच्छितो की मुलतानी माती खाल्ल्याने काहीही फायदे होत नसता. उलट ही माती खाल्ल्याने मुतखडा पोट दुखीची समस्या होऊ शकते. म्हणून मुलतानी माती खाऊ नये. ही माती फक्त बाह्य उपयोगासाठी उपयोगी आहे. मुलतानी माती खाण्याचे फायदे काहीही नव्हेत. उलट जर कोणी मुलतानी माती खात असेल तर त्याला आपण याचे नुकसान समजावून सांगायला हवेत.
मुलतानी माती ची किंमत
वेगवेगळ्या कंपनीच्या मुलतानी माती ची किंमत वेगवेगळी असू शकते. भारतात 1 किलो मुलतानी माती आपणास जवळपास 600 रुपयांपर्यंत मिळून जाईल. ऑनलाइन आमझोन सारख्या साइट वर प्रसिद्ध Herbalvilla ची 100% नैसर्गिक 200 ग्राम मुलतानी माती आपणास 150 रुपयात मिळून जाईल. पुढील लिंक वर क्लिक करून आपण खरेदी करू शकतात. येथे क्लिक करा…
तर मंडळी आजच्या या लेखात आपण जाणले की मुलतानी मातीचे फायदे काय आहेत. सोबतच त्वचेसाठी मुलतानी माती फेसपॅक कसा तयार करावा आणि मुलतानी माती कशी लावावी या बद्दलची माहिती आपण मिळवली. आशा आहे की आपणास ही माहिती उपयुक्त ठरली असेल. धन्यवाद…
अधिक वाचा