केस गळतीवर घरगुती उपाय व कारणे मराठी | 4 hair fall home remedies in marathi

केस गळतीवर घरगुती उपाय : आजच्या तरुण पिढीत केस गळती ही सामान्य समस्या बनली आहे. काही लोकांच्या केसांची गळती तर खूप कमी वयापासूनच सुरू होऊन जाते. त्यामुळे वेळेआधी टक्कल पडणे या सारख्या समस्या निर्माण होतात. येथे आपण kes galti var upay आणि hair fall home remedies in marathi इत्यादींची चर्चा करणार आहोत.

केस गळण्याची कारणे काय आहेत ? आणि केस गळती वर घरगुती उपाय काय आहेत याबद्दल माहिती आपण आजच्या लेखात पाहणार आहोत. तर चला सुरु करूया…

केस गळतीवर घरगुती उपाय | kes galti var upay in marathi
केस गळतीवर घरगुती उपाय मराठी

केस गळण्याची कारणे

सर्वात आधी आपण केस गळतीची प्रमुख कारणे पाहूया-

1) अनुवंशिकता

केस गळण्या मागील प्रमुख कारण अनुवंशिकता असू शकते. जर कुटुंबातील आई वडील यांच्यापैकी कोणाला केस गळण्याची अथवा टक्कल ची समस्या असेल तर अशा परिस्थितीत मुलांमध्येही ही समस्या अनुवांशिक पणे निर्माण होते. जर तुमच्या कुटुंबातही आई अथवा वडिलांना केस गळतीची समस्या असेल तर तुमच्यात ही समस्या अनुवंशिकतेने निर्माण झाली आहे. परंतु जर असे नसेल तर पुढील काही कारणे आपल्या केस गळतीच्या समस्येसाठी कारणीभूत असू शकतात.

2) शारीरिक अथवा मानसिक चिंता

शारीरिक अथवा मानसिक तणावामुळे केस गळती होते. या पद्धतीने केस गळतीच्या समस्येला टेलोजेन एफ्लुवियम म्हटले जाते.शारीरिक किंवा मानसिक तणावामुळे केस गळण्याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत-

 • तीव्र ताप किंवा गंभीर संक्रमणप्रसूती
 • मोठी सर्जरी, अचानक झालेली रक्ताची कमतरता
 • अत्यधिक मानसिक तणाव
 • डाएट
 • काही खास गोळ्या जसे गर्भनिरोधक किंवा एंटीडिप्रेसेंट्स

जास्तकरून महिलांमध्ये केस गळतीची समस्या 30 ते 60 या वयोगटात निर्माण होते.

3) वेगवेगळे शाम्पू वापरणे

होय, जर आपण दरवेळी एका नवीन कंपनीचा शाम्पू वापरत असला तर हे देखील केस गळती मागील प्रमुख कारण असू शकते. आजकाल शाम्पू मध्ये वेगवेगळे केमिकल असते जे केसांच्या दीर्घायुष्यासाठी हानीकारक असते. म्हणून जेवढे शक्य होईल तेवढे शाम्पू वापर टाळावा नाहीतर आयुर्वेदिक शाम्पू वापरावे.

4) व्हिटॅमिन बी ची कमतरता
5) योग्य पद्धतीने आहार न घेणे
6) गरोदरपण
7) स्कैल्प इन्फेक्शन (scalp infection)
8) केसांमधील कोंडा
9) पुन्हा पुन्हा केसांमध्ये हात फिरवणे
10) थायरॉईड रोग

तर ही होती काही मुख्य कारणे ज्यामुळे केसांच्या गळतीची समस्या निर्माण होते. आता आपण पाहूया केस गळतीवर घरगुती उपाय.

केस गळतीवर घरगुती उपाय | kes galti var upay in marathi

1) नारळाचे तेल

आठवड्यातून कमीत कमी दोन दिवस रात्री झोपण्याआधी चांगल्या ब्रँड चे कोकोनट ऑइल (नारळाचे तेल) लाऊन केसांना मसाज करावी.
यानंतर दुसऱ्या दिवशी केसांना शाम्पू लाऊन धुवावे.

नारळ तेलाचा उपयोग अनेक हेअर प्रॉडक्ट मध्ये केला जातो. कारण नारळाचे तेल केसांना योग्य पोषण देऊन त्यांचा डैमेज कमी करते. ज्यामुळे केसांचे आरोग्य वाढते.

2) कांद्याचा रस

तुम्हास जाणून आश्चर्य होईल की कांद्याचा रस केसांना लावण्याचे केवढे फायदे आहेत..! केसांचा कोंडा काढण्यापासून तर केसांना दीर्घायुष्य मिळवून देण्यापर्यंतचे प्रत्येक कार्य कांदा करीत असतो. कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी विशेष मदत करते

 • खलबत्ता अथवा मिक्सर मध्ये कांदा बारीक करून त्याचा रस काढून घ्या.
 • कांद्याचा हा रस हातांच्या मदतीने केसांच्या मधील त्वचेवर लावा आणि व्यवस्थितपणे मसाज करा.
 • यानंतर अर्ध्या ते एक तासाने केसांना स्वच्छ आणि थंड पाण्याने धुऊन घ्या.

एनसीबीआई द्वारे करण्यात आलेल्या एका शोधातून सिद्ध झाले आहे की केसांमध्ये कांद्याचा रस लावल्याने केसांमधील सर्व बॅक्टरिया आणि डेंड्रफ तयार करणारे इन्फेक्शन नष्ट होते व केसांचे आरोग्य सुधारते आणि केसांची वाढ ही आधीपेक्षा जास्त वेगाने होऊ लागते. म्हणून आपली केस गळती कमी व्हावी अशी इच्छा भांडणाऱ्या प्रत्येकाने आठवड्यातून एकदा तरी केसांमध्ये कांद्याचा रस लावायला हवा.

3) आवळा आणि कोरफड

केसांना मजबूत बनवून त्यांची गळती थांबविण्यासाठी आवळा आणि कोरफड अर्थात एलोवेरा खूप उपयोगी आयुर्वेदिक पदार्थ आहेत. आवळ्यात विटामिन सी चे प्रमाण अधिक असते याशिवाय कोरफड देखील अँटी बॅक्टेरियल असल्याने केसांसाठी उपयोगी असते.

 • गरम पाण्यात आवळा आणि कोरफड टाकून पाणी काळे होत नाही तोपर्यंत उकळवा.
 • यानंतर याला थंडे होऊ द्या.
 • थंड झाल्यावर हे पाण्याचे पेस्ट हलक्या हाताने संपूर्ण डोक्याला लावा.
 • 15-30 मिनिटे केसांना लावलेले राहू द्या यानंतर थंड पाण्याने शाम्पू लावून केस धुवा.

4) अंडी

केसांच्या आरोग्यासाठी आधीपासूनच अंड्याचे उपयोग सांगितले जातात.

 • अंड्याच्या आतील पदार्थाला बदाम तेलात मिसळून घ्या.
 • आता हे मिश्रण आपल्या केसांना लावा.
 • अर्ध्या तासानंतर केसांना शाम्पू लाऊन स्वच्छ धुवून काढा.

अंडी केसांना स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रभावकारी आयुर्वेदिक औषध आहे. केस खराब होणे, तुटणे इत्यादी समस्या अंडी लावल्याने दूर होतात. अंडी आणि बदाम तेलाच्या या मिश्रणात आपण मध, दही इत्यादी देखील टाकू शकतात.

तर हे होते केसांना सुदृढ आणि निरोगी करण्यासाठी काही आयुर्वेदिक व घरगुती उपाय. आता आपण पाहूया केस गळतीवर काही नियमित केले जाणारे उपाय

केस गळतीवर उपाय सांगा

केस गळतीवर उपाय सांगा म्हणून विचारणाऱ्यांनी पुढील गोष्टी कायम लक्षात ठेवायला हव्यात :

 1. बाजारात मिळणाऱ्या हेअर कलर क्रिम मध्ये वेगवेगळे केमिकल मिसळलेले असतात. ह्या क्रीम वापरून केसांना कलर केल्याने केसांचे आयुष्य कमी होते आणि केसगळती वाढते.
 2. केसांना जास्त ताणून बांधल्याने देखील केस गळती होते. जास्त ताणून बांधल्याने केस तुटू शकतात.
 3. केस विंचरण्याचा कंगवा नियमित स्वच्छ करीत रहा.
 4. उन्हात बाहेर जाण्याआधी केसांना टोपी अथवा रुमालाने झाकून घ्या. जेणेकरून तुमचे केस सूर्याच्या हानीकारक अल्ट्रावायलेट किरणांपासून सुरक्षित राहतील.
 5. नियमित पद्धतीने व्यायामाची सवय लावा.
 6. केसांना गरम पाण्याने धुणे टाळावे. जास्त गरम पाण्याने केस धुतल्याने ते कोरडे आणि मृदू होऊ शकतात.
 7. पुन्हापुन्हा केसांमधून हात फिरवू नका.
 8. जास्त चिंता व तणाव करू नका.

चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय <<वाचा येथे

तर हे होते केस गळतीवर घरगुती उपाय. हे उपाय वापरून आपण आपल्या kes galti var upay आणि केस गळतीची समस्येपासून नक्कीच मुक्तता मिळवू शकाल. परंतु जर आपली केस गळतीची समस्या अधिकच असेल तर एकदा डॉक्टरांशी संपर्क करा आणि मगच घरगुती उपाय करावे अशी विनंती.

आम्ही अशा करतो की hair fall home remedies in marathi ही पोस्ट आपल्याला उपयोगी ठरली असेल. ह्या माहितीला आपले कुटुंबीय आणि मित्रमंडळी सोबत शेअर करून त्यांनाही जागरूक करावे ही विनंती. आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकतात. धन्यवाद…

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *